Ways of Chanting God’s name

#495926

Suneeta Karande
Participant

हरि ॐ.
Ways of Chanting God’s name

दिनांक १०-११-२०१५ चा अग्रलेख ११७३ वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की कुविद्येला किती बंधने आहेत. कुठलाही कुविद्येचा मंत्र मोठ्यानेच उच्चारणे आवश्यक असते त्यामुळे आयसिस ओसिरिसचा शोध तिच्या ’झोहर” (Zohar) कुविद्येच्या सहाय्याने त्या क्षणी तरी घेऊ शकत नव्हती. मागील अग्रलेखात हेच बंधन सेमिरामीसला तसेच सर्कीलाही आडवे आल्याचे आपण वाचले होते.
याउलट मातृवात्सल्य उपनिषदात आपल्याला बापूंनी दाखवून दिले की २७ व्या अध्यायात असुरांचा राजा पिप्रू कपटाने दुष्ट व दुर्जन अव्रती नागरिकांना भडकवून कर्णश्रुत वासिष्ठ ऋषींवर जोरदार हल्ला चढवितो व त्यांचे हातपाय बांधून व त्यांच्य तोंडात बोळा कोंबून त्यांचे मंत्रोच्चार थांबवितो. तेव्हा हातपाय बांधलेल्या व मुखात बोळा घातलेल्या कर्णश्रुताने साध्यासुध्या माणसांनी जोरजोरात म्हटलेली चण्डिकेची साधी गाणी , हे आदिमाते , तू मंत्र म्हणून स्वीकार असा मानसिक जप करण्यास सुरुवात केली आणि ती वत्सला आदिमाता अंधारातून अवकाशात प्रकटली व तिने तिच्यावरील व तिच्या श्रीकुलावरील पवित्र गाण्यांना “भजन” म्हणून ती स्विकारेल आणि मंत्र व स्तोत्राएवढेच भजनरूपी प्रार्थनाही तिला प्रिय असेल असे वचन दिले.
म्हणजेच आपली अत्यंत कनवाळू , शरणागत वत्सल आदिमाता सतत संकटात तिला साद घालताच धावून येते मग तो भले मानसिक जप असो, मंत्र असो वा स्तोत्र असो.
एवढेच नव्हे तर पुढे लगेच २८व्या अध्यायात आदिमातेने नित्यगुरु याज्ञवल्क्य ह्यांनाही वचन दिले आहे की ,” माझ्या ज्येष्ठ पुत्रांनी ह्या श्रध्दाळू मानवांच्या सहाय्यासाठी आताच व्यवस्था निर्माण केली आहे. आता माझ्या ह्या डाव्या उर्ध्व हस्तातील शंखामध्ये हा माझा द्वितीय पुत्र किरातरुद्र श्रध्दावानांच्या भावाला, भावमय प्रार्थनेला, शब्दांच्या व शब्दोच्चारांच्या मर्यादा ओलांडून वायुरूपाने पोहोचवीत राहील व माझा वामकर्ण असणारा माझा तृतीय पुत्र महाविष्णु तो भाव माझ्या अंत:करणात गार्‍हाणे म्हणून मांडेल आणि माझ्या दक्षिण कानात हाच माझा पुत्र परमशिव बनून मनुष्याने अजाणतेपणेही केलेले चांगले विचार , माझे नामस्मरण व मला घातलेली साद आकर्षून घेत राहील. ”
खरेच आदिमाता चण्डिका आणि तिचे पुत्र श्रध्दावानाचे कशीही साद ऐकण्यास सदैव तत्परच असतात फक्त मला साद घालता यायला हवी प्रेमाने, विश्वासाने आणि संपूर्ण शारण्याने !!!

जय जगदंब जय दुर्गे

हरि ॐ. श्रीराम.अंबज्ञ.
सुनीतावीरा करंडे