Uranus introduced as Serapis Anubis

#178510

Sailee Paralkar
Keymaster

॥ हरि ॐ ॥

तुलसीपत्र १०९३ मधील सम्राट युरॅनसची (Uranus) ‘सेरापीस अनुबीस’ (Serapis Anubis) म्हणून झालेली ओळख भन्नाट होती! पावित्र्याच्या रक्षणासाठी स्वत:च्या ‘इमेज’ची…..सम्राटपदाची पर्वा न करता वाईट माणसांमध्ये मिसळण्याचे सम्राट युरॅनसचे धैर्य पाहून स्तब्ध व्हायला होते. खूप मोठी जबाबदारी सम्राट युरॅनसने पेलली असल्याचे दिसते. ही गोष्ट फक्त त्याची माता सोटेरिया (Matriarch Soteria) हिलाच माहित होती. ‘शेवटची खूण सुमेधस’ हा मंत्र जपतच त्या प्रयोगशाळेत शिरलेला हर्क्युलिस (Hercules) देखील आपल्या पित्याचे हे रूप पाहून स्तब्ध होतो. मात्र त्याच क्षणाला हर्क्युलिसला स्वत:च्या पित्याचा प्रचंड अभिमानही वाटतो आणि तो महादुर्गेपाशी कृतज्ञता व्यक्तही करतो.

सम्राट युरॅनसने हर्क्युलिसला सांगितलेल्या घटनांवरून युरॅनसचा प्रवास आपल्याला कळतो. सम्राट युरॅनस ६६ प्रकारच्या कुविद्यांमध्ये निष्णात होतो. शुक्राचार्यांचा अपवित्र ’तमाचारग्रंथ’ ब्रम्हर्षि अगस्ति व ब्रम्हर्षि वसिष्ठ पवित्र मार्गाने सम्राट युरॅनसला शिकवितात, याचेदेखील आश्‍चर्य वाटले. ब्रम्हर्षि अगस्तींनी सम्राट युरॅनसला मणिद्विपात नेऊन त्याच्या कुविद्यांना माता शिवगंगागौरीकडून बंधन घालून घेतले, तेथे त्रिविक्रमाशी (God Trivikram) झालेली भेट, अ‍ॅफ्रोडाईटची (Aphrodite) खरी ओळख या घटना वाचताना अतिशय आनंद होत होता. त्याचबरोबर आपले चण्डिकाकुल (Chandikakul) किती प्रेमळ आहे याची क्षणाक्षणाला जाणीव होत होती.

सम्राट पदापासून वाईट लोकांच्या साम्राज्यातील सर्वोच्च स्थान मिळविण्यापर्यंतचा सम्राट युरॅनसचा प्रवास थक्क करणाराच आहे. सम्राज्ञी अल्केमिनीबरोबरील त्याचा संवाद, त्याने कुविद्या तंत्रांचा केलेला सफाईदार वापर यामुळे सॉलोमन झेलहुआसारख्या (King Solomon) (ज्याला इष्टारसुद्धा घाबरतो) सामर्थ्यशाली व्यक्तीची देखील फसगत झाली….तर इतरांचे काय! थॉथ देखील, या प्रयोगशाळेत तू आलास म्हणजे विजय अंकाराचाच आहे, अशी ग्वाही देतो. इतका प्रचंड प्रभाव सम्राट युरॅनसने सर्व कुमार्गी लोकांवर पाडला आहे. तसेच चण्डिकाकुलाच्या प्रेमाची, त्यांच्या योजनांची माहिती देखील सम्राट युरॅनस हर्क्युलिसला देतो. आपण मानवांनी पवित्र मार्गावर जाण्याचा निश्चय करून तीन पावले चालताच, माता चण्डिका व त्रिविक्रम त्यांची योजना कार्यान्वित करतात. ही महत्वाची गोष्ट सम्राट युरॅनस हर्क्युलिसला सांगत आहे.

आपली आहे तीच ओळख ठेवून (सम्राट हे सर्वोच्च पद) वाईट लोकांच्या नाशासठी त्यांच्याच साम्राज्यातील सर्वोच्च स्थान मिळवणं….हे फक्त ‘महादुर्गेच्याच’ (Mahadurga) राज्यात होऊ शकतं.