Trivikram on earth

#89925

Aniketsinh Gupte
Participant

हरी ॐ,

पुन्हा एकदा धक्का ! आपल्या मुळ विचारांना भेदून खरे सत्य समोर ठेवले गेले. साडेसाती बद्दल आपले विचार, माहिती सर्व फोल ठरते जेह्वा आपण दि. १३.०१.२०१५ चा अग्रलेख वाचतो. “saturn” ग्रहची निर्मित्ति, त्याचे आपल्या आयुष्यातील effect, सर्व श्रद्धावान साथी ह्या त्रिविक्रमने महाप्राण बरोबर केलेली योजना व त्याच बरोबर साडेसाती मधे ह्या महाप्राणाच्या उपासनेचे महत्त्व !! अगदी सविस्ताररित्या आपल्या समोर उलगडून ठेवले आहे.
अजुन एक गोष्ट स्पष्ट जी ह्या अग्रलेख मालिकेतून होते, ती म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृतीचे महत्त्व आणि त्याची देवयानपंथवर्ची वाटचाल. हेच आजच्या अग्रलेख मधे ही सिद्ध होते जेह्वा जियस(Zeus) ही माहिती देतो की वसुंधरे वर भारतीय संस्कृती व पद्धतीचे उपासना मंदिरे बांधिले गेले आहेत. मागील काही अग्रलेख मधून ‘युद्ध’ सुरु झालेले आहे हे स्पष्ट झालेच आहे पण आता खरे वेध लागले आहे पुढच्या अग्रलेखांचे…त्रिविक्रमरहस्य साठी. (Trivikram)त्रिविक्रम कोण? ह्याची उत्सुकता सर्वांनाच आहे आणि आता हेच उलगडणार आहे.

अंबज्ञ. श्रीराम.
अनिकेतसिंह गुप्ते