Trivikram helps his devotees

#153189

Sailee Paralkar
Keymaster

॥ हरि ॐ ॥

‘तो येतोच’…..

दिनांक १ मार्च २०१५ चा अग्रलेख जबरदस्त होता. बापूंनी लिहिलेले प्रसंग श्‍वास रोखून ठेवणारे आहेत. ही कल्पित कथा नाहीये तर हा इतिहास आहे. खराखुरा घडलेला. यात काही महत्त्वाच्या गोष्टी जाणवल्या:

* सम्राट असूनही झियसने घेतलेले प्रयास, त्याची बुद्धीमत्ता आणि स्मरणशक्ती अफलातून. मात्र या गुहेत येण्यापूर्वी अ‍ॅफ्रोडाईटने त्याला सांगितलेल्या सूचना महत्त्वाच्या आहेत. मोठी आई आणि त्रिविक्रम (सद्गुरु) पुढे येणार्‍या काळाची तयारी श्रद्धावानांकडून कशी करून घेतात, याचेच हे उदाहरण आहे.

* हर्क्युलिस आणि झियसने शेवटपर्यंत केलेले प्रयास पण खूप महत्त्वाचे आहेत. आम्हाला वाचव म्हणून कोणतीही प्रार्थना महादुर्गेला न करता ते त्यांची लढाई सुरूच ठेवतात. म्हणजेच पावित्र्याच्या रक्षणासाठी हे व्रती जीवाची पर्वाच करीत नाहीत.

**** सगळ्यात थरारक प्रसंग म्हणजे हर्क्युलिस जाहबुलॉनच्या तोंडात खेचला जात असताना क्षणार्धात प्रगटलेला त्रिविक्रम(Trivikram). येस्‌………….‘तो येतोच’ ….. तो हाक न मारताही येतोच.

याआधी त्रिविक्रमाने जाहबुलॉनचे हातापाय तोडताना जागच्या जागी राहूनच आपला परशु फेकला होता. तो परशु आपले काम चोखपणे बजावून पुन्हा आपल्या जागी येऊन स्थिर झाला. मग यावेळी देखील आहे त्या जागीच राहून पाश फेकून जाहबुलॉनला बंदीस्त करणे त्रिविक्रमाला सहज शक्य होते. मात्र त्याने असे न करता त्या ‘दनुच्या गुहेत’ प्रगट होऊन आपला पाश फेकला.

म्हणजेच ‘तो’ सगुण साकार रूप घेतो फक्त आपल्या बाळांसाठी…..इतर कशाहीसाठी नाही. त्याची प्रत्येक गोष्ट, कार्य फक्त त्या बाळांसाठीच असते. ‘तो’ स्वत:साठी कधीच काहीही करीत नाही. यापूर्वी ‘त्याने’ स्वत:साठी काही केले नाही आणि यावेळीही ‘तो’ (बापू) फक्त त्याच्या बाळांसाठीच झटत आहे…..आणि इथे अजून एक गोष्ट जाणवते की ‘तो’ कायम आपल्या भक्ताबरोबरच असतो. बापू प्रवचनात नेहमी सांगतात ना की तुम्ही नरकात जात असाल ना तर तिथेही मी येईन…तुम्हाला मागे खेचायला. खरंच…आपल्या भक्तासाठी ‘तो’ कुठेही यायला तयार असतो…..मग ते दनुचे स्थान का असेना!