Transformation of Bahuwak by Soteria

#395508

Sailee Paralkar
Keymaster

Transformation of Bahuwak by Soteria

राजा बहुवाकाला (Bahuwak) शेवटी महामाता सोटेरिया (Matriarch Soteria) व तिच्या गटाने आपल्या गटामध्ये सामील करून घेतलेच. बहुवाकाला त्या दुष्ट लोकांची कारस्थाने दाखवून देऊन सत्य परिस्थिती त्याच्यासमोर उलगडून दाखविली. त्याचवेळेस त्याचे हितचिंतक असणारा त्याचा मित्र राजा इंद्रवर्धन व त्याची पत्नी राणी शरावती यांना बहुवाकाची किती काळजी आहे, हेदेखील त्याच्या समोरच स्पष्ट केले. राणी शरावतीने आपला मृत पती व बहुवाकाचा मित्र असलेल्या राजा इंद्रवर्धनची इच्छा सांगून बहुवाकाला देवयान पंथावर यायला भाग पाडले. महामाता सोटेरियाने आपल्या लोकांना हाताशी धरून ही योजना आखली. मात्र त्यांनी कोणीही बहुवाकाला थेट सत्य सांगितले नाही, कदाचित असे केले असते तर बहुवाकाचा विश्‍वास बसला नसता. महामाता सोटेरिया, झियस (Zeus) व अन्य जणांनी त्याच्यासमोर फक्त सत्य उलगडून ठेवले आणि शेवटी त्यालाच विचार करायला लावला. आणि स्वत:च्या बुद्धीचा वापर करून बहुवाकाने पश्‍चात्ताप व्यक्त केला व यापुढे कायम देवयान पंथावरच राहण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर महामाता सोटेरिया व अन्य सर्वांनीच राजा बहुवाकाचा स्वीकार केला. ज्याला पश्‍चात्ताप झाला त्याला चण्डिकाकुलाची क्षमा मिळतेच. बहुवाकाचा झालेला बदल ही अत्यंत महत्त्वाची घटना ठरते.