Titan can be King Minos by chanting a mantra 6 times

#83639

Aniketsinh Gupte
Participant

हरी ॐ,

आज दैनिक प्रत्यक्ष (०६.०१.२०१५) मधील अग्रलेखमधे आपण वाचतो शुक्राचार्य तितानला (Titan)सांगतात, ” जेह्वा जेह्वा तुला ‘मिनॉस’ रूप(King Minos) आवश्यक असेल, तेह्वा तेह्वा तू मी तुला दिलेला मंत्र ६ वेळा म्हणताच तू पूर्ण ‘मिनॉस’ बनशील व ती ताकद वापरू शकशील”.

इथे शुक्राचार्य, जे अंधाराचे उपासक आहेत ते सांगताना ६ वेळा मंत्र म्हण, असा उपदेश देतात. खरच, हे अंधाराचे उपासक देवयान पंथाच्या अगदी उलट दिशेने प्रवास करतात हे एक जिवंत उदहारण ! देवाची उपासना करताना, जप-स्तोत्र पठन करताना बहुतांश वेळी १/३/५/११..अशी आवर्तने घेतो. मराठी किंवा भारतीय लिपी मधील ६ आणि ३ समोरासमोर ठेवले तर दोघेही एकमेकांच्या एकदम उलट दिसतात. जणू काही आरसा मधे ठेवला आहे जे ३ हां आकड़ा उलट करून ६ दर्शवितो. ३ :: ६….
३ हा आकड़ा त्रिविक्रमशी जोडला जाऊ शकतो. त्रिविक्रम, तीन पाऊल, ब्रह्मा-विष्णु-महेश, बापू-आई-दादा !!
तर ६६६ (666) हा शैतान चा आकड़ा आहे असे बरेच जन मानतात. आपल्याला भक्तिमार्ग वरून दूर लोटू पाहणारे षड्रिपू ही ६ !!
एखाद्याचे मन अशांत असेल तर आपण त्या व्यक्तिस ३ वेळा किंवा ५ किंवा ११ वेळा देवाचा जप कर म्हणजे मनःशांती मिळेल, सामर्थ्य मिळेल असे सांगतो. पण इथे अंधाराचे उपासक असलेल्या तितानला सामर्थ्य (अर्थात वाईट शक्ति) मिळावे त्यासाठी ६ वेळा मंत्र म्हण असा उपदेश दिला जातो !
चंडिकाकुलाचे (chandikakul)श्रद्धावान आणी त्यांचा प्रकाशमय मार्ग तर संपूर्ण उलट आणि अंधारमय असलेला शैतानचा मार्ग आणि त्याचे उपासक ह्याची मुळ जाण करून देणारे हे अग्रलेख आणि हे वास्तव आपल्यासमोर ठेवणारा (त्यातून आपण शिकवे हे मुळ हेतु ठेवणारा) आणि सदैव आपले हित जपणारा आपला खरा आप्त म्हणजेच चंडिकापुत्र आणि माझा डैड खरच खुप खुप ग्रेट आहे !!