The universal truth

#91854

हरि ॐ दादा
अम्बद्न्य
एक लहानसा प्रयास केला आहे
वैश्विक युद्धाशी(Universal truth) निगडित पोवाडा लिहिण्याचा ( बापूंच्याच कृपेने )

महादुर्गा आईची क्षमा
लेकरांसाठी हो करुणा
अखंड सहाय्य श्रद्धावानांना
न कळे कधी ते श्रद्धाहिनांना
दैवत त्यांचे हो अंकारा
क्षमा न ठाई ज़रा
न प्रेमाचा हो झरा
रुक्ष जीवन कायम त्यांचे ..हो जी ..
महादुर्गेची (Mahadurga)हो भक्ती
त्या त्रिविक्रमाची हो शक्ती
नाही कळली कोणा अधमाला
माता अफ्रोडाइट(Aphrodite) अरुला
अवतरली या वसुंधरेला
मग कशाला कोणाची भीति हो .. जी जी
त्या आंधळ्या श्रद्धाहिनांना
ना श्रद्धेचे गुपित कधी हो कळले त्यांना
त्यांच्याच दैवताने हो छळले
राजरोस फिरण्या भीति
भयाने सारे बिळातचि लपले
लपून कारस्थान ही केले
दुष्ट शनी गृहही निर्मिले
सदगुणांचे बळ खेचण्या
नाही त्यांना स्वतःची ताकद काही …हो जी जी
माझ्या त्रिविक्रमाची लीला ही कैसी
त्याची किमया हो पहा कैसी
असो कितीही मोठा शनी गृह चुम्बकीय वायुंचा
नाही “त्या”च्या सत्तेच्या बाहेरी
“पाय”अल्गोरिथम सर्व “त्या”च्या वर्तुळा आत
देव माझा त्रिविक्रम तात
काय त्याची करामात
उलटविलि चाल श्रद्धाहिनांची ..
. त्याला काळजी आपुल्या लेकरांची …हो जी जी
सम्राज्ञी बिजोयमालिनी (Bijoymalana)हो भक्त
महादुर्गेचिहो सक्त
झाली जीवावर उदार श्रद्धावानांना रक्षणास
कद्रुच्या (Longmu)बिळात जाऊन केला हो वार

आदिमातेचे स्वास्तिक अस्त्र हो जोरदार
तिने एकच केला प्रहार
कदृची दृष्टि झाली कायमचि बेकार
मोठ्या आईचा हो महिमा
बळ देई लेकरांना
अशा दुष्टान्शी हो लढन्या …हो जी जी ….
राजा झियस(Zeus) लढला दिनरात
त्याला माय दुर्गेची हो साथ
माता अरुलेने दिला हो मन्त्र
तारणार महाप्राण हनुमंत
साधु संत रक्षिण्याला माझा हनुमंत
हा आला त्या दुष्ट शनीला
शेपटीने धरून आपटान्याला
माझा हनुमंत हो आला
मग कशाला भीति त्या ड्रैको मकरांची… हो जी जी
मातृवात्सल्य गीत गाई
विश्वाचा खरा ईतिहास हो दावी
माझा त्रिविक्रम अनिरुद्ध लई भारी
एकटाच दुष्टां ललकारी
अंतिम निर्णय त्याच्या हाती
विजयश्री करती जयजयकारी
आला रावणाचा वध कराया ..हो जी जी
किती गाऊ त्याचा महिमा
बोलता शब्दही फुटेना
आम्ही राहु अम्बज्ञ त्याच्या चरणा
गाऊ निरंतर त्याचीहो गाणी
मन जडवु गुणसिंकीर्तनी
त्याच्या पाठी चालाया नेहमी … हो जी जी

डॉ निशिकांतसिंह विभुते (कांदिवली पश्चिम मुम्बई )15/1/2015 —