The Universal Truth (Greek Mythology)

#123020

Sailee Paralkar
Participant

मंगळवार दिनांक १० फेब्रुवारीचा अग्रलेख वाचून एकदम धक्काच बसला अर्थात मनाला आनंद देणारा धक्का होता तो. काय जबरदस्त planing आहे, सम्राट झियस(Zeus)आणि पूर्ण टीमचे. अ‍ॅफ्रोडाईटने(Aphrodite) आधीच अशी पूर्व शंका मांडली होती की असे संकट येईल. व संकट यायच्या आधीच महादुर्गाने त्याचे निवारण करण्याची योजना देखील त्यांच्यापर्यंत पोचवली होती. त्यांनी सर्व नियोजन खूप अभ्यासपूर्वक केले होते. सर्कीला पकडून तिची जीभ छाटली व तिला ह्रिया बनवून शूर सम्राज्ञी बिजॉयमलाना(Bijoymalana) कुत्रीप्रमाणे घेऊन गेली. कोणालाही संशय येवूच शकला नसता की ती सर्की आहे म्हणून.
हर्मिस आणि त्याच्या ग्रुपला जे अन्न दिले होते ते सुद्धावरून त्या दुष्ट लोंकाचे जसे अन्न असते तसेच दिसत होते. यावरून, शत्रूचा बिमोड करण्यासाठी किती बारकाईने त्यांचा अभ्यास केला आहे हे दिसून येते.

आता मात्र लेटो सही सलामात कधी सुटेल ह्याचे वेध लागले आहेत.
​​