The universal truth greek mythology

#116260

ketaki. Kulkarni
Participant

आजच्या अग्रलेखावर सर्वांनीच जे काही विचार मांडले ते उत्तम आहेत.
भयानक! हा एकच शब्द आजचा अग्रलेख वाचतांना मनात आला.एका बाजूला मागच्या अग्रलेखात लेटोने बघितलेले एक भयाण दृश्य.. जिथे सथोरोडीना(Circe) हिने एक लाख नेफिलिम तयार केले तर इथे दुसऱ्या बाजूस एकेकाचे अवशेष, त्यावर सर्व चेटू व वेटू ह्यांचे थुंकणे.. हा सर्व प्रकार मनाला एक फार मोठा धक्का देऊन जातो.
त्यातच माता ह्रियाला इतक्या वाइट पद्धतीने मिळालेली वागणूक! ह्या परिस्थितिचा विचार देखील करवत नाही. खूप वाइट आहे हे सर्व.. आणि हे वाचताना त्रास होतो.. की त्या मातेला काय यातना झाल्या असतील!!

पण एक मात्र सतत वाटते आहे की नक्कीच ही सर्व श्रद्धावान मंडळी कुठे तरी सुखरूप असतील.. आपल्या प्रत्येकालाच हेच वाटत आहे.
शेवटी जेव्हा थाडाच्या रुपात डेमेटर येते तेव्हा अक्षरशः अंगावर काटा आला.
वाटले की येस्स! कुछ तो झोल हुआ ही होगा! अफ्रोडाइट( Aphrodite), हरक्युलिस(Hercules), महादुर्गा(Mahadurga).. मोठी आई तिच्या बाळांचे नुकसान नक्कीच होउ देणार नाही.. असे मनोमन वाटते आहे.
दाखवलेली ह्रिया पण खरी ह्रियाच आहे का? कोण असेल, काय असेल, नक्की काय असेल ह्या सर्वांच्या मागे ह्याची आता उत्सुकता वाढत चालली आहे. बापू आता वाट पहावत नाही… उत्कंठा शिगेला पोचलि आहे.. पुढच्या लेखासाठी तुमची सर्वच बाळ आता डोळे लावून वाट बघत आहेत.

आम्ही अंबज्ञ आहोत बापुराया!
तुमच्यामुळे हा सर्व इतिहास आम्हाला अभ्यासायला मिळत आहे.
खुप खुप अंबज्ञ!!
अंबज्ञ
केतकीवीरा कुलकर्णी