Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

#820

Sailee Paralkar
Participant

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

हरी ओम दादा,
फोरम सुरु झाल्यामुळे अतिशय आनंद झाला. यानिमित्ताने आमच्याकडून श्री साईसच्चरिताची पुन्हा एकदा उजळणी होईल.

रेश्माविरा मेघाच्या पुढील कथेत हेमाडपंतानी असे सांगितले आहे कि मेघा मशिदीत आल्यावर बाबांनी अतिशय उग्र रूप धारण केले. हातात दगड घेऊन त्याला मशिदीत येण्यास अडविले व बाबा म्हणाले “तू उच्च जातीचा ब्राम्हण आहेस आणि मी तर यवन आहे तू मशिदीत आलास तर तुझा विटाळ होईल.” बाबांचे हे रौद्र रूप पाहून मेघ आतिशय घाबरला आणि त्याला प्रश्न पडला कि हा माझ्या मनातला विकल्प बाबांना कसा काय कळला? मला हा प्रश्न पडला तेव्हा मी तर खेडा जिल्ह्यात होतो. मग बाबांना एवढ्या दूर घडलेली घटना कशी काय कळली.
यावरून हेमाडपंत आपल्याला पुन्हा दाखवून देतात कि आपण केलेली प्रत्येक कृती, आपल्या मनात आलेला प्रत्येक विचार आपल्या देवाला, बाबांना कळतो.

हरी ओम