Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru (“एक विश्‍वास असावा पूर्ता, करता, हरता गुरु ऎसा”)

Forums Sai – The Guiding Spirit The Importance of Having Complete Faith in the Sadguru (“एक विश्‍वास असावा पूर्ता, करता, हरता गुरु ऎसा”) Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru (“एक विश्‍वास असावा पूर्ता, करता, हरता गुरु ऎसा”)

#8303

The Importance of Having Complete Faith in the Sadguru

साईसत्चरीतात (Sai satcharitra) अनेक कथा आहेत ज्यात आपण बघतो कि भक्तांचा साईनाथांप्रती (Sainath) असणारा ठाम विश्वासच त्यांना अनेक संकटातून बाहेर काढू शकला .
एकाला डोळ्यांचे दुखणे होते त्यावर बाबांनी बिब्बे ठेचून डोळ्यात घातलेय़ गोष्टीचा विचार केल्यावर असा वाटता कि तो भक्त डोळ्यात बिब्बे घालून घ्यायला कसा काय तयार झाला असेल? त्याचा विश्वास किती जबरदस्त असेल कि हा माझा बाबा माझा देव जे काही करेल ते माझ्यासाठी उचितच असेल.
बापुगीरला बाबा सांगतात जाताना जामनेरला जा तिथे चान्दोरकरणा उदि आणि आरती दे आणि मग पुढे जा . त्या वेळेस त्यांचाकडे त्या प्रवासापुरते पैसे नवते पण बाबा सांगतात जा तुझी सगळी सोय होईल तेव्हा ते कशाचाच विचार न करता निघतातं मग साईनाथांना टांगेवाला बनून जावच लागत.
काकासाहेब दिक्षितनचि कथा तर विलक्षण आहे . जे कडक दोन्हीवेळा संध्या करणारे आहेत.त्यांनी कधी किटक पण मारला नसेल असे. पण बाबा सांगतात म्हणून त्या मरायला टेकलेल्या बोकडाला मारायला हत्यार उगारतात. काय ती गुरुभक्ती आणि काय तो विश्वास कि हा माझा देव आहे हा माझ्याकडून जे काही करून घेईल ते माझ्यासाठी उचितच असेल. त्याचा फळाची चिंता करायची मला आवश्यकता नाही.शाम्याला साप चावतो पण ते विरोबाकडे न जाता त्यांच्या देवाकडे धावतात बाबा त्यांना मशिदीची पायरी चढून देत नाहीत तरी पण ते तसेच पायरीशी बसून राहतात.त्यांना पूर्ण विश्वास आहे कि हा माझा देव मला मारेल कि जगवेल याची मला फिकीर नाही पण मी याला सोडणार नाही.
हा असाच पुरता विश्वास बापू आपल्याला आनायला सांगतो आणि वारंवार आपल्या भक्तांना त्याची प्रचीती पण देतो.सो बिर्जेंचा अनुभव ऐकून पण हेच जाणवत कि त्यांचा त्या बापुप्रती असणारा ठाम विश्वास त्यांना त्यांच्या सगळ्या संकटातून त्यांना बाहेर काढू शकला.
बापुराया मी अम्बज्ञ आहे .