Thanks for providing Family tree

#445621

shantanu natu
Participant

Thanks for providing Family tree

हरि ओम दादा,

सध्या येणारे अग्रलेख हे अतिशय उत्कंठा वाढवणारे आहेत आणि त्याचप्रमाणे आता प्रत्येक character आणि त्यांनी ह्या वाइट लोकांना संपवण्यासाठी घेतलेली वेगवेगळी रुपे बघुन तर अवाक व्ह्यायला होतं.
तसेच ह्या सगळ्या चांगल्या लोकांनी त्यांची त्यांची कामगिरी एवढ्या उत्तम रित्या पार पाडली आहे, कि आता ह्या वाइट लोकांचे ग्रुप तुटायला लागले आहेत, आणि प्रत्येक जण आपापसात शत्रुत्व घेउन त्यांच्या आधिच्या शत्रुंना मित्र बनवत चालला आहे.

अशा वेळी ह्या सगळ्यांच्या नात्यांचा पुरा गोंधळ होऊन बसला होता.
मात्र तुम्ही गेल्या काही दिवसात दिलेल्या वेगवेगळ्या family tree‘s मुळे हा गोंधळ सुटायला खुप मदत झाली.
उदा. पान हादित हा निमरॉड चा मुलगा असणे,
शुक्राचार्यांच्या सर्व अपत्यांची नावे,
हायपेरिओन; इपेटस; आणि एरॉस हि मिनाक्षी आणि सुर्यारुण ची मुले असणे इ.

ह्या गोष्टी थोड्या विसरायला झाल्या होत्या.
पण ह्या फ़ॅमिली ट्री मुळे ह्या सगळ्या गोष्टींची आपोआप revision झाली.

आता अजुन ह्यापुढे एक step जाउन आपण ह्या ट्री मधील प्रत्येकाचा अत्ताचा role काय आहे हे देखील नोट करु शकतो, जेणेकरुन अग्रलेख वाचताना नीट समजेल. आणि वाचायला अजुन मजा येइल.

खरोखरीच अशा पध्दतीने हे family tree जतन केले तर येणार्या अग्रलेखांसाठी हे एका अनोख्या Dictionary सारखेच कामाला येतील.

अंबद्न्य दादा !!