Thada, an unique personality

#93904

Ajitsinh Padhye
Participant

हरि ॐ योगीन्द्रसिंह. “थाडा”(Thada) हे व्यक्तिमत्त्व खरोखरच विलक्षण आहेच, शिवाय कथेच्या पुढील भागामध्ये हे व्यक्तिमत्त्व खूप महत्त्वाची भूमिका बजावेल असे मला वाटते. योगीन्द्रसिंह, तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये पझुझुने (Pazuzu) थाडाबद्दल केलेल्या उल्लेखाबरोबरच, मला ह्या “थाडा”बद्दल ३ महत्त्वाचे मुद्दे जे जाणवले ते असे:
१) दि. ११ जानेवारीच्या अग्रलेखात बापूंनी लिहिलय की लॅमॅसुच्या तंत्रगृहामध्ये प्रवेश करण्या अगोदर जेव्हा थाडा ओसिरिस (Osiris) व हॉरसला(Horus) प्रवेशद्वारावरील स्फटिक गोलासमोर उभे राहण्यास सांगते तेव्हा त्यावर पडलेल्या त्यांच्या प्रतिबिंबांना पाहून थाडा एकदम हसते व ती प्रतिबिंब हिरवी होताना पाहिल्यावर ती त्यांना आत घेऊन जाते. म्हणजे नक्की काय ? ती प्रतिबिंब हिरवी झाल्यामुळे काय संकेत मिळाला असावा ?
२) दि. १५ जानेवारीच्या अग्रलेखात बापूंनी लिहिलय की “थाडाने एकमेव दात विचकत डेव्हिडॉहानाला(Devidohana) नीट पारखून पाहिले व ती आनंदाने दर्शविणारे उद्गार काढू लागली.” ह्या वाक्यामध्ये काहीतरी मोठी गोष्ट लपलेली आहे असे वाटते. डेव्हिडॉहानाला नीट पारखून पाहिल्यावर थाडाला आनंद का बरं झाला असेल ?
३) त्यानंतर ह्याच अग्रलेखात उल्लेख येतो की डेव्हिडॉहानाला लॅमॅसुच्या (Lamasu)चार पत्नी व थाडा ह्यांच्याबरोबर नाचणे कठीण जात आहे हे लक्षात येताच थाडा त्या चौघीजणींना वेगळे नाचण्यास सांगते व डेव्हिडॉहानाबरोबर थाडा वेगळी नाचू लागते. त्याचप्रमाणे पुढे उल्लेख येतो की “डेव्हिडॉहानाला थाडाबद्दल, ’ही नाचता नाचता आपल्या मानेचा लचका तोडेल’ असे वाटत असले तरी थाडा मात्र प्रत्येक पावलाला डेव्हिडॉहानाला सांभाळून घेतच नाचत होती”. म्हणजे ह्या थाडाला डेव्हिडॉहानाबद्दल विशेष आपुलकी आणि विशेष माहिती असल्यासारखे वाटते. नाही का ?

परंतु काही सांगता येत नाही. नेहमीप्रमाणे वरील प्रश्नांची उत्तरं पुढच्या अग्रलेखांमध्ये काही वेगळीच मिळतील असे वाटते. पण हे थाडा व्यक्तिमत्व नक्कीच कुतुहल वाढवणारे आहे.