stories of Mahavishnu and Krishna

#148193

shantanu natu
Participant

लहानपणापासून आजी महाविष्णुच्या(Mahavishnu) व कृष्णाच्या (Krishna)वेगवेगळ्या लीलांच्या गोष्टी सांगायची, तेव्हा खूप मजा यायची!! व त्या देवाचं अपरंपार कौतुक वाटायचं की अत्यंत कठीणातील कठीण परिस्थितीमधून सुद्धा किती सहजपणे “तो एकच” महाविष्णु मार्ग काढू शकतो !!

आता महाविष्णुचाच एक अविष्कार म्हणजे अमृत मोहिनी, त्या अमृत मोहिनीची भस्मासुरला मारण्याची कथा देखील एकदम अजबच !!
आणि आता अमृत मोहिनीचा एक अविष्कार म्हणजे “ऍफ़्रोडाईट” (Aphrodite) – म्हणजेच बापुंनी हिंदी प्रवचनात सांगितल्याप्रमाणे अपरा-आदित्या !!
ह्या ऍफ़्रोडाईट च्या लीला वाचताना तर प्रचंडच मजा येते!! ह्या सगळ्या भयानक लोकांना “हिच एक” अक्षरश: आपल्या बोटांवर नाचवते आहे !

एकाच वेळी ड्रॅको सम्राट इष्टार (Ishtar), नुइट व पान हादित(nuit and pan hadit), अश्व मानव डुमुझिड(Dumuzid), व तसेच इथे वसुंधरेवर तर हिराम अबीफ़(Hiram Abif), निक्स (Nyx), व साक्षात शुक्राचार्यांचा देखील “ह्या एकिनेच” अगदी खुळखुळा करुन टाकल्याच ती स्वत:च म्हणते.

व त्यातुन कहर म्हणजे, ह्या प्रत्येक वाइट व्यक्तींना तिची ताकद पुर्णपणे माहीत आहे, व तसेच प्रत्येक जण तिला कंट्रोल (mind control) करायला ह्या ना त्या मार्गाने धडपडतो आहे, व प्रत्येकाला अगदी १००% खात्री देखील आहे कि त्यांनी केलेल्या कारवायांमुळे हि ऍफ़्रोडाईट (Aphrodite) त्यांच्या ताब्यातच आहे व अगदी ते म्हणतायत त्याप्रमाणे वागते देखील आहे. आणि हे अगदी शुक्राचार्य, निक्स(Nyx) च नाही, तर हिराम अबीफ़(Hiram Abiff), पान हादित(Pan Hadit) व इष्टार(Ishtar) ची देखील अगदी १००% खात्रीच आहे.
मात्र actual परिस्थीती मात्र पुर्णपणे उलट आहे, ह्या सगळ्यांना “हि एकटी” आपल्या बोटांवर नाचवते आहे , तिला पाहीजे तसेच व तिला पाहिजे त्या पध्दतीनेच घडवुन आणत आहे , हे सर्व दुर्जन काय काय करत आहेत हे तिला कळतेच आहे एवढेच नाही, तर एखाद्या video conference प्रमाणे हे तिला तिच्या यानातील पडद्यावर देखील दिसत आहे. व हे हर्क्युलीस (Hercules) देखील बघु शकतो आहे.

मात्र ह्याचवेळेस सगळ्यात height म्हणजे ती ह्या वाइट लोकांना उलट पुरावे देखील देत आहे, कि कशी हि स्वत:च त्यांच्या तालावर नाचते आहे. (निक्स ला वाटत आहे कि ऍफ़्रोडाईट(Afrodite) शुक्राचार्यांची कामे करत आहे, व तिची भासप्रतीमा निक्स ने मंत्रसामर्थ्याने तयार केली आहे, इष्टार(Ishtar) ला वाटत आहे कि त्याने दिलेल्या माळेमुळे ऍफ़्रोडाईट(Afrodite) तो म्हणेल तसच करते आहे वगैरे) म्हणजेच जे तिला काहीच कळत नाही असे समजत आहेत, त्यांना ती अधिक अधिक पुरावे देत चालली आहे कि कसं तिला काहीच समजत नाही व ती त्यांच्याच ताब्यात जात चालली आहे!!

इथे मला बापुंच एक वाक्य आठवत कि ” ज्याला अस वाटतं कि बापुला काहीच कळत नाही, त्याला मी अधिकाधिक पुरावे देत जातो कि मला काहिच कळत नाही!! ”

actually त्या महाविष्णुला , त्या ऍफ़्रोडाईट(Aphrodite)ला कळत नाही असं काहिच असु शकत नाही!! किती शांतपणे व सफ़ाइदारपणे हि ऍफ़ेरा एक एक तिचे plan execute करत चालली आहे !! जबरदस्तच !!

आणि कालच्या अग्रलेखातील ऍफ़्रोडाईटच्या लीलेचे शब्दात वर्णनच करता येत नाहीये, अतिशय अनाकलनीयरित्या ह्या ऍफ़ेरा ने साक्षात महादुर्गेच्या परवानगीने ‘श्री महादुर्गेश्वर लिंगाची’ प्रतिकृती बनवुन व अतिशय अनाकलनीय रित्या बहुवाक राजाला चोरायला देखील दिली आहे!!!!

व आता ऍफ़ेरा स्पष्ट शब्दात हर्क्युलीस ला सांगते कि हि प्रतिकृती, हि महाविष्णुची मायाच ह्या सर्व दुष्टांचा घात घडवुन आणेल !! आहाहा !!! sollid, jabaradasttt !!

ह्या महाविष्णुच्या , कृष्णाच्या व ह्या ऍफ़्रोडाईटच्या(Afrodite) प्लॅन्स ना ह्या जगात कधीच तोड असु शकत नाही !!!!

अंबद्न्य !!!!