Stem cell Banking and Umbilical Cord

#348053

हरि ॐ ! श्री राम ! अंबज्ञ !

तुलसीपत्र ११३४ वाचतांना मनात अनेक विचार आले.
केरीडवेन ह्या संपूर्ण विश्वातील सर्वात श्रेष्ठ चेटकीण, हिच्या २ गर्भनाळी (टायफॉन व सेमिरामीसच्या) स्फटिकनलिके मध्ये ठेवल्या होत्या. तसेच केरीडवेन, तितान, झीरॉन (हेडीसपुत्र), ह्यांच्याही नाळी (Umbilical Cord) स्फटिकनलिकेत ठेवल्या होत्या.
हे वाचत असताना सध्या Stem cell Banking करतो हे आठवले. परंतु ते तामाचारी लोक त्याचा (Umbilical Cord) वापर कुविद्देसाठी करत होते.
केरीडवेनचे कुविद्यासामर्थ्य तिच्या नाळीमध्ये ओतप्रोत भरलेले आहे व ह्या नाळीच्या उपयोगाने कुविद्ध्यासामर्थ्य सतत वाढते ठेवता येते व त्या मूर्ख लोकांच्या मते “महादुर्गेश्वर लिंगाची” राख करण्यासाठी होतो.
काय कुबुद्धी, महादुर्गेश्वर लिंगाची राख कुमंत्राच्या सहाय्याने करून मग ती राख जेव्हा जाहबुलॉनला जन्म देऊ शकणाऱ्या गर्भाशयात जाईल, तेव्हाच जाहबुलॉनचा जन्म होऊ शकेल
अतिपवित्र महादुर्गेश्वर लिंग, तमाचारी अपवित्र लोकांच्या हाती कदापीही लागणार नाही १०८% सत्य.
इकडे मारडूक ह्या नाळी मेड्युसा कडे आहे हे समजून तिला येऊन भेटतो व म्हणतो “आपल्या कुविद्दयाच्या जगतात कुणीच कुणाशी एकनिष्ठ नसतो.”
 ही नीच माणसे नेहमी स्वार्थाबरोबरच असतात. आधीच्या तुलसीपत्रामध्ये बापूंनी लिहले होते, कुविद्याधारकांना माता, पिता, पुत्र, बंधू, अशी कुठलिही नाती नसतात. द्रुइड, Drako, व इतर कुविद्याधारक कधीच कुणावरही विश्वास ठेवत नाहीत व एकमेकांशीही कधीच प्रामाणिक राहत नाही.
 चेटकीणींना एकही नैतिक मूल्य जिवंत ठेवायचे नसते. टायफॉनला तर नीती, न्याय, धर्म, पावित्र्य, ह्या शब्दांची सुद्धा घृणा होती. हि नीच मंडळी संशयी स्वभावाचीच असतात

इथे शुक्राचार्य, निकस, मिनॉसला, ध्यान करून सुद्धा काही ज्ञात होत नव्हते. तेव्हा शुक्राचार्यची खात्री होते की हे काम कुणा मान्त्रीकाचे असते तर मला कळले असते. ह्याचाच अर्थ हे काम विज्ञानाच्या साह्याने कुणा राजकारणी व्यक्तीने घडवून आणले आहे व हि व्यक्ती पवित्र वंशातील असावी आणि ती व्यक्ती हर्क्युलिस (अल्केमिनीचा पुत्र) असावा. तो वाराणसीत असावा व वाराणसीतील घटना शुक्राचार्य पाहू शकत नाहीत.
विज्ञानाच्या सहाय्याने पवित्र वंशातील व्यक्ती नेहमीच चांगले काम करतात. आजच्या युगात गर्भनाळेचा उपयोग medical science चांगल्या प्रकारे करीत आहे (Stem Cells)
STEM CELLS : Stem Cells derived from Umbilical Cord and Cord Blood are naïve in nature and can be used for treatment of life threatening diseases not only for the baby but also for the immediate family members. Stem Cells are mother or master cells which can repair or replenish different tissues or organs in our body through transplant or therapy. It has the potential to aid the next generation treatment through regenerative medicine.
प्रगत विज्ञान ह्याचा उपयोग Cancer, Cerebral Palsy, Autism Spectrum disorder, इत्यादी अनेक व्याधींपासून रोग्यास मुक्तता मिळावी म्हणून प्रयोग व प्रयत्न करीत आहेत. आज Stem Cell Banking उपलब्ध आहेत.
आजहि गर्भानाळीचा तुकडा बरेच patient मागतात.म्हणजेच आजही अश्या कुविध्या व कुमंत्रांचा वापर करीत असावेत असे वाटते.
महादुर्गेच्या नातवंडाना व त्रिविक्रमाच्या अपत्यांना कुमांत्रीकांपासून व कुशास्त्रांपासून कधीच भय नसते.(१०९२ तुलसीपत्र)
शुक्राचार्यांची खात्री पटते कि पवित्रवंशातील हर्क्युलिसचे काम आहे व शुक्राचार्याला वाराणसीतील काहीही दिसत नव्हते.
(तुलसीपत्र १०९४ मध्ये आपण हर्क्युलिसची ताकद ,साहस व भक्ती पाहिली व त्रिविक्रमाने हर्क्युलिसला कशी मदत केली.)माता सोटेरियाहि विजयी हास्य करीत म्हणाली होती “हे नीचानो तुमचे सर्व प्रयत्न विफल ठरले आहे .माझ्या वंशाचे रक्षण करण्यास मी स्वतः समर्थ आहे व आमची रक्षणकर्ती महादुर्गाही.
वाराणसी सोनडुंग गुफांमध्ये व्रतनाम(व्हिएतनाम)देशात सर्व गरुड राजांचे व गरुडवस्ती प्रमुखांचे दुसरे संमेलन भरले होते .
ह्या वसुंधरेवरील सर्व गरुडपंथीय कुठल्याही प्रदेशात राहत असोत ,तरीदेखील आपली मूळ “गरुड परंपरा “ कधीच विसरत नाहीत व त्या परंपरेनुसार भारतवर्षातील वाराणसी हे आम्हा सर्व गरुडांचे मूळ तीर्थक्षेत्र आहे.ब्रम्हर्षी कश्यप हेच आमचे एकमेव सर्वोच्च गुरु आहेत
“ट्रायइश्चीमस “ अर्थात “ त्रिविक्रम “ आमचे समान आराध्य दैवत आहे.त्यामुळे ज्या राजास,ज्या घटनेस ,ज्या कार्यास त्रिविक्रम व ब्रम्हर्षी कश्यापांचा पाठींबा आहे त्यालाच आम्हीसुद्धा वाहूनच घेणार.आम्ही सर्व गरुडवंशीय स्वतःला वसुंधरेवरील सनातन धर्माचे सैनिक मानतो व त्याच्या कार्य्रासाठी आम्ही सर्व उद्धुक्त झालो आहोत .
“पावित्र्य हेच प्रमाण” हे त्रिविक्रमाचे बोधवाक्य आम्ही गरुड कधीच विसरत नाही.
आज आम्हीहि परमपूज्य सद्गुरू अनिरुद्ध बापू, नंदाई,सुचीतदादा,चंडिकाकुलाची लेकरे असेच कुठील्याही प्रदेशात असलो अगदी परदेशात असलो तरी बापू जे सांगतात तेच प्रमाण मानतो व ते पाळतोच .आम्ही श्रद्धावान सर्व बापू भक्त प्रेमाने भक्ती व सेवेत भाग घेतो “ बापूच” आमचे आराध्य दैवत आहे व “श्रीगुरुक्षेत्रम” हेच आमचे मूळ तीर्थक्षेत्र आहे.
हर्क्युलिस संपूर्ण निःस्वार्थी ,अत्यंत देखणा ,पावित्र्य हेच प्रमाण हा एकमेव निकष ,मातृधर्म व मातृभूमिवरील आत्यंतिक निष्ठा व त्याचा सतत चालणारा महादुर्गेचा मनोमय जप ह्यामुळे त्याला त्रिविक्रमाणे दिव्यत्व बहाल केले आहे .आज तो मानव असूनही दिव्यकोटीतील आहे. सदैव सर्व जाणणाऱ्या महादुर्गेने हर्क्युलिसच्या अस्तित्वाला दिव्यत्व बहाल केले म्हणून हर्क्युलिस पूर्णपणे मानवकोटीतीलहि आहे व दिव्यकोटीतीलहि आहे. तो एकमेव आहे व एकमेवच असेल कारण तो दिव्य मानवहि नव्हे तर मानवी देहातील दिव्य भावहि आहे व असेल. .डेमेटर म्हणते ध्ये दिव्यत्व हर्क्युलिस कधीच स्वीकारणार नाही .कारण त्याला सदैव त्रिविक्रमाचा अत्यंत भक्त व मित्र म्हणून राहायचे असते.
परमपूज्य अनिरुद्ध बापू साक्षात परमात्मा मानव रुपात आले आहेत.बापू म्हणतात मी तुमचा मित्र आहे.मी कुणाचाही अवतार नाही.पण आम्हा श्रद्धावानांना अगदी नीटपणे माहित आहे बापू आई दादा आमचे देव आहेत व ते मर्यादापालन ,सत्य प्रेम ,आनंद हि त्रिसूत्री व पावित्र्य हेच प्रमाण मानतात .आम्हीं अनिरुद्धारामाचे वानार्सैनिक आहोत.अम्बज्ञ .
वारंवार अपंग झालेल्या जाहबुलॉनला मानवी स्त्रीच्या पोटी जन्मास आणण्यासाठी द्र्याको द्रुइदपंथीय ,शुक्राचार्य प्रयत्न करीत आहेत .परंतु ह्या कुमार्गीयाचा कधीच विजय होणार नाही.
युरयानस –चंडिकादास सुमेधसला दिले गेलेले एकमेव कार्य जाहबुलॉनचा मानवी जन्म होऊ नये हेच आहे व त्याच्या कार्यात त्याचा पुत्र हर्क्युलिसहि आहेच.
नेहमी पावित्र्य हेच प्रमाण व प्रामाणिक असणाऱ्यांचाच विजय होतो.
 आपण मानवांनी पवित्र मार्गावर जाण्याचा निश्चय करून ३ पावले चालताच माताचंडिका व त्रिविक्रम त्यांची योजना कार्यान्वित करतात व मग आपल्याला फक्त नेटाने कशाचीही पर्वा न करता ,वैयक्तिक लाभ-हानिचा विचार न करता त्यांच्या आदेशानुसार वागायचे असते .श्रद्धावानांसाठी बाकी सर्व ते करतच असतात .अंबज्ञ !
 श्री महादुर्गा विजयते ! त्रिविक्रम अंबज्ञ !
अंबज्ञ डॉ.ज्योतीवीरा मोहन.