Shukracharya in Labyrinth

#346650

हरि ॐ
आजच्या दिनांक २१ जुलैच्या तुलसीपत्र ११३५ च्या अग्रलेखातून काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्या नमूद कराव्याशा वाटतात-
राजा मिनॉसची(King Minos) त्याची माता निक्सने (Nyx) तिचा स्वत:चा पिता शुक्राचार्यांना(Shukracharya)  लॅबिरन्थमध्ये (Labyrinth) ध्यानावस्थेत बसलेल्या स्थितीतही कैदी म्हणून अडकवलेले पाहून चांगलीच दातखिळ बसली आहे. निक्स जरी आपली स्वत:ची सख्खी माता असली तरी तिच्या कार्यपूर्तीसाठी अगदी कोणत्याही पातळीवर जाऊ शकते व काहीही करू शकते ह्याचा जिवंत अनुभव मिळाल्यामुळे मिनॉसला निकसच्या विरोधात जाणे , तिच्या पासून काही लपवाछपवी करणे किती प्राणघातक ठरून वेळप्रसंगी आपल्या जीवावरही बेतू शकते ह्याची आता संपूर्ण खात्रीच पटली होती. सम्राट झियसचे डेईदालसला स्पष्ट सूचना देणारे बोल एकून झियसच्या बुध्दीचातुर्याची दाद द्यावी वाटते आणि ह्या घटनेचे महत्त्वही समजते की भावी होऊ घातलेल्या युध्दाची ही सुरुवात असू शकते. झियसची शंका ही खरेच पटकन एक नवा दृष्टीकोन देते की खरेच ध्यानस्थ शुक्राचार्यांनाही लॅबिरिन्थमध्ये अडकवणार्‍या निक्सजवळ किती प्रचंड कुविद्यामंत्रसामर्थ्य असेल किंवा निक्स व शुक्राचार्यांनी संगनमताने केलेली ही दिशाभूल तर नसेल ना? कर्तव्यदक्ष असलेला झियस हा आपल्या आप्तांच्या सुरक्षेबाबतही सदैव स्वत: जागरूक असतोच असतो आणि त्या आप्तांनाही तो सुरक्षेबाबत अत्यंत सावध, जागरूक रहाण्याचा सदैव सल्ला देत राहतो. ह्याची साक्ष पटविते ते त्याने डेईदालसला अत्यंत सावधपणे प्रत्येक हालचाल टिपत राहण्याच्या केलेल्या प्रेमळ , कर्त्तव्यतत्पर व संयमी आदेशातून.
इष्टारचा काटा काढून ड्रॅकोसम्राट बनू पाहणार्‍या साक्षात अंकारापुत्र असणार्‍या राजा सॉलोमन झेलहुआ ,खुद्द शुक्राचार्यांच्याच तमाचारतंत्राची सर्वोच्च शक्ति बनू इच्छिणार्‍या निक्स आणि सॉरेथसचा काटा काढून वसुंधरेचा सम्राट बनू पाहणार्‍या राजा मिनॉस उर्फ तितान ह्या तिघांवरही अंमल गाजवणारा प्रति अंकारा बनण्याचे शुक्राचार्यांचे स्वप्न होते आणि एका ठिकाणी बोलत असतानाही तेथून दूर असणार्‍या ठिकाणाची वित्तंबातमी शुक्राचार्यांना होत असावी असे तुलसीपत्र १०६२ वरून लक्षात आले होते कारण राजा मिनॉसच्या गुंफेत निक्स व मिनॉसशी बोलता बोलता ते एकाएकी स्त्ब्ध होतात. त्यांच्या ह्या स्तब्धतेचे कारण निक्स ही कुसिध्दीच्या वापराने जाणून घेते, तेव्हा तिला कळते की कद्रू कायमची आंधळी झाल्याचे व तितानचा पिता राजा सॉलोमन झेलहुआ व त्याचा पुतण्या मारडूक हे कद्रूच्या कक्षामध्ये पुतळा होऊन राहिल्याचे शुक्राचार्यांना जाणवले आहे.
मग येथे प्रश्न उद्भवतो की हे सारे जाणू शकणारे शुक्राचार्य त्यांना निक्सने कैदी बनवून लॅबेरिन्थमध्ये अडकवले असताना गप्प थोडेच बसून राहतील. हरेन्नाखस , हिराम अबीफ , सॅथेडोरिना, कद्रू ह्या सर्वांवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवणार्‍या शुक्राचार्यांना निक्स कधी आपल्याही वरचढ बनू शकते आणि आपल्यावरही वर्चस्व गाजवू शकेल ह्याची पुसटशीही कल्पना नसेल असे वाटत नाही.
“मातृवात्सल्यविंदानम्” ह्या ग्रंथात ४४व्या अध्यायात बापूंनी आपल्याला अनसूया मातेची म्हणजेच आदिमाता चण्डिकेची,महिषासुरमर्दिनीची कथा सांगितली. त्यात क्रूरकर्मा कलिपुरूषाला जेव्हा सर्व विश्वाला, अनंत ब्रम्हाडांना व्यापून उरणार्‍या अनसूया मातेच्या पावित्र्याची, मांगल्याची जाणीव होते , तेव्हा आपले श्रेष्ठत्त्व आणि आपली सत्ता सिध्द करण्यासाठी कलिपुरूष अत्रि-अनसूया वास्तव्य करून असलेल्या आश्रमावर घाव घालण्याचे ठरवतो आणि तेथे पोहचतो. तेव्हा माता अनसूया आपल्या जीवनाचे अंतिम कार्य संपादण्यासाठी स्वत:च्या आश्रमाच्या सीमेबाहेर येऊन एका पलाश वृक्षाच्या सावलीत एका शिळेवर दोन्ही डोळे बंद करून परमेश्वराचे अर्थात दत्तगुरुंचे निश्चल ध्यान करू लागते. त्यानंतर कलिपुरूष नाना प्रकारांनी तिला छळू पाहतो, पण अनसूया मातेचे ना ध्यान भंग पावत , ना तिला डोळे उघडावे लागत आणि तिच्या केवळ संकल्पमात्रेच शेवटी मात्र कलिपुरूषाला शुध्दतेची आणि पावित्र्याची जरब बसवतेच.
येथे कळते की पावित्र्याची किती प्रचंड मोठी ताकद असते की ध्यानात बसूनही, डोळे बंद असतानाही अनसूया माता कलिपुरूषाची सर्व कुटील कारस्थाने जाणू शकते आणि त्यांना तितक्याच समर्थपणे तोंडही देऊ शकते.
ह्याचाच अर्थ ध्यानावस्थेतही माणूस सर्वकाही जाणू शकतो. आता आपण म्हणू या अनसूया माता ही साक्षात आदिमाता चण्डिकाच असल्याने तिला हे सहज शक्य आहे.
तसेच बापूंनी आपल्या “मातृवात्सल्य -उपनिषद ” ह्या ग्रंथातील अध्याय ८ मध्ये ह्याच पावित्र्याच्या ह्याच सामर्थ्याची माहिती दिली आहे. आत्मविश्वास अधिक प्रबळ झालेली नियती आणि तिचा पुत्र वृत्रासुराची अशुभ जोडी जेव्हा नैमिष्यारण्यातील ब्रम्हर्षि शौनकावर हल्ला करण्याच्या तयारीला लागतात तेव्हा ब्रम्हर्षि शौनक तर तपश्र्चर्येस बसलेले असूनही त्यांना सहजतेने हे कट्कारस्थान कळून येते. ते तपश्र्चर्या भंग न होऊ देता ह्या अशुभ जोडीच्या कारस्थांनाचा नाश करण्यासाठी परशुरामास तेथे पाचारण करतात.
ह्यावरून ध्यानावस्थेत ब्रम्हर्षि असलेल्या मानवालाही बाहेरच्या जगातील घडामोडी कळू शकतात हे सिध्द होते.
एवढेच नव्हे तर श्रीसाईसच्चरितात आपल्याला काका दीक्षित नियमानुसार सकाळी स्नानानंतर ध्यान्स्थ आसनात बसले असता विठ्ठलाच्या त्याच मूर्तीचे दर्शन पावतात जी दुपारी कोणी बाहेरगावचा छब्या विकणारा माणूस विकायला घेऊन येतो.
म्हणजेच सर्वसामान्य माणसाला ही ध्यानात बाहेरच्या जगाचे ज्ञान होऊ शकते हे कळते.
शुक्राचार्य अर्थातच पावित्र्याच्या विरोधी मार्गावर असले तरीही ते त्यांच्या वामाचार पंथाच्या, अघोरी मार्गाच्या, कुविद्या मार्गाच्या उपासना नित्यत्त्वाने करीत होते आणि त्यामुळे त्यांनाही कुविद्यांच्या ताकदीवर ध्यानावस्थेत नक्कीच बाह्य जगाचे ज्ञान होत असावे असे मला तरी वाटते. त्यामुळे निक्सने शुक्राचार्यांना कैदी केले हे तेवढेसे मनाला पटत नाही.
त्यामुळेच सम्राट झियसच्या मनात चुकचुकलेली शंकेची पाल अगदी सयुक्तिक वाटते , मनाला पटते की हा शुक्राचार्य आणि निक्स ह्यांनी मिळून शत्रू पक्षाला संभ्रमात ठेवण्यासाठी केलेला कट, कारस्थानही होऊ शकते.
पुढे वाचताना मारडूकचे निरीक्षण दाद देण्यासारखे वाटते. सम्राट झियसच्या वाडयावर हल्ला झाल्यावर उत्तानपिष्टीम सम्राट झाला होता आणि त्याआधी ८ दिवस त्याला मारडूक भेटला होता आणि नाईल नदीचा वारंवार उच्चार करून सुध्दा उत्तानपिष्टीम व राजा गिल्गामेशला “नाईल नदी ” काय आहे हे कळत नव्हते आणि एकदा तर उत्तानपिष्टीमने ” नाईल म्हणजे काय? ” असे स्पष्ट विचारलेले आठवत होते. ह्यावरून तो तर्क लढवतो की ह्या दोघांच्या मेंदूतून नाईल नदीच्या बांधकामाची घटना नाहीशी केलेली असावी. त्याला वाटते सुरुवातीला हे मंत्रसिध्दीच्या सहाय्याने कुणीतरी केले असेल आणि खोट्या सर्कीच्या अंत्यविधीच्या वेळी झालेल्या इनाकाच्या भेटीनंतर त्याला वाटते की हे तिनेच तिच्याकडील ” ऍंटिकायथेरा” वापरून हे विज्ञानाच्या सहाय्याने केले असावे.
येथे असे वाटते की प्रत्यक्षात उत्तानपिष्टीम बनून वावरणारा हा सम्राट झियसच होता हे बापूंच्या सांगण्यावरून कळले आणि जो पर्यंत सेनापती आरकॉन आणि त्याचे पुत्र नाईल नदीच्या संबंधी बातमी पुरवित नाही तो पर्यंत वास्तवात, प्रत्यक्षात उत्तानपिष्टीम रूपी झियसला हे माहीत नसल्याने त्याने “नाईल नदी म्हणाजे काय?” असे उद्गार काढले असावे, किंवा शत्रूपक्षातील मारडूकला अज्ञानात/ संभ्रमात ठेवण्यासाठी खेळली गेलेली आयोजित खेळी पण असू शकते.
पुढे हाच मारडूक त्याला जाणवलेल्या गंधावरून त्याने केलेल्या कद्रूच्या अस्तित्त्वाची आणि केवळ डोळ्यांच्या निरीक्षणावरून नुईटच्या अस्तित्वाचीच नव्हे तर जिवंत असल्याची खात्री तर अवाक करून सोडते.
येथे मला प्रकर्षाने जाणवले की आपला बापूराया आपल्याला ही असे निरीक्षण करता यावे व्यवहारात म्हणून दैनिक प्रत्यक्षच्या माध्यमातून किती पूर्वतयारी करवून घेतो आहे. सारख्या दिसणार्‍या चित्रांमधील १० फरक ओळखायला सांगून हसत खेळत ह्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीच्या अफाट सामर्थ्याचे धडेच जणूकाही बापू आपल्यालडून गिरवून घेतात असे मला वाटले. हेच ते काळा सोबत पावले टाकायला शिकणे असावे नाही का?
त्यामुळेच मारडूक त्याची पितामही कद्रू व आत्या नुईटला आपल्या कटात सामील करून घेण्याची तयारी करतो हे ही त्याच्या सभानतेचे प्रतिकच म्हणावे लागेल.
आता नुईट जिवंत आहे हे सत्य बापूंच्या लेखन शैलीने आपल्याला आधीच बापूंनी सांगितले होते की अफराड्रॉईटच्या अफाट खेळीने ती कसे पान हादित व नुईटला वाचवते आणि स्वत:च्या कार्यासाठी त्यांचा हेतूपूर्वक वापरही करून घेते.
पुलिकाने काढलेल्या चित्र हे केरिडवेनचेच प्रत्यक्ष प्रतिक असते अणि तिचे पूजन ह्याच रूपात केले जाते ह्यावरून असुर पंथीय , कुमार्गी लोकही प्रतिक चिन्हांचा वापर त्यांच्या पूजनात करतात हे जाणवले. त्यात दाखवलेले दोन घुबडाचे डोळे हे खरेखुरे निन्कूचे डोळे होते आणि ते दाखवूनच सेमिरामिसने पुलिकाला मनोनियंत्रित केले होते . मला वाटते हे हायपेरिऑनला माहीत असावे नक्कीच , म्हणून तो तिच्यावर पवित्र मंत्र उच्चारून पवित्र जलाचे प्रोक्षण करतो.
एवढेच नव्हे तर नंतरही स्वत: त्या चित्रांकडे “त्रिविक्रममंत्र” म्हणत पाहत राहतो आणि एक सत्य/रहस्य त्रिविक्रमाच्याच कृपेनेच उजागर होते की निन्कू हीच केरिडवेन आहे. येथे बापूंनी तुलसीपत्र १०९२ मध्ये दिलेल्या ग्वाहीची खूण पटते की महादुर्गेच्या नातवंडाना आणि त्रिविक्रमाच्या अपत्यांना कुमात्रिकांपासून आणि कुशास्त्रांपासून कधीच भय नसते. ज्या चित्रातील निन्कूचे डोळे वापरून सेमिरामिस पुलिकाला मनोनियंत्रित करीत होती ते चित्र हायपेरिऑनला त्रास देऊ शकत नाही.
आता वाट बघायची बापू कधी ’ शेवटची खूण – दुसरी किल्ली – विहिरीतून पाणी काढणे आहे ’ ह्याचे रहस्य उलगडून दावतात.
हरि ॐ. श्रीराम . अंबज्ञ.