Shukracharya and his cult

#149414

Sailee Paralkar
Participant

हरी ओम,

दिनांक २६ फेब्रुवारीच्या अग्रलेखात आपल्याला दिसून येते की शुक्राचार्य(Shukracharya) आणि त्यांचा ग्रुप(cult) किती कट
कारस्थान रचत आहे त्यांच्यामध्ये कोणीच प्रामाणिक नाहीत सगळेच जण एकमेकांना फसवत आहेत
आणि महादुर्गेने त्यांच्यावर असे आवरण टाकले आहे कि त्यांना वाटते तेच ग्रेट आहेत आणि अफ्रोडाइट त्यांच्या ताब्यात आहे एवढ्या वेळा तोंडावर आपटून देखील त्यांना ‘त्या’ त्रिविक्रमाची power समजत नाही

परवाच्या अग्रलेखात मला आढळलेले काही ठळक मुद्दे :-

१. अपोरोजाट्सला त्याच्या महामस्तिष्काच्या पडद्यावर ‘भारतवर्ष’ दिसत नाही तिथे बर्फमय पडदा दिसतो. याचा अर्थ ते कितीहि प्रगत असले तरी भारतवर्षापर्यंत सहजासहजी पोचू शकत नाहीत.

२. हर्क्युलिस(Hercules) आणि अफ्रोडाइट (Aphrodite)यांच्या संवादातून आपल्यला ‘महादुर्गेश्वराचा’ अर्थ कळतो, – हा ‘महादुर्गेश्वर’ म्हणजेच साक्षात महादुर्गा अर्थात सर्व शिवपरंपरेचे व शक्ति (शिवा) परंपरेचे एकरूपत्व.

३. अफ्रोडाइट उवाच – “हे ‘महादुर्गेश्वर(Mahadurgeshwar) लिंग’ असुरांच्या ताब्यात कधीच जात नसते. शुक्राचार्यांना बहुवाकने चोरून आणून दिलेले लिंग हे फक्त त्या लिंगाची प्रतिकृती आहे व तीदेखील मी माता दुर्गेच्या संमतीने घडविलेली मायाच आहे व ही विष्णुमायाच त्या सर्वांचा घात घडवून आणेल आणि परत महादुर्गेच्या चरणांत जाऊन विलीन होईल.”

४. माता अल्केमिनी आशियाला (Asia) समजावताना सांगते, अफ्रोडाइटचे मार्ग हे नेहमीच स्थळ, काळ, वेळ, व्यक्तिविशेष व परिस्थिती ह्यानुसार वेगवेगळेच असतात. ती मानवांनी सर्व प्रयास नीट सुरु केल्यावरच तिचे सहाय्य सुरु करते. जोपर्यंत मानवी मर्यादांना झेपू शकते, तोपर्यंत त्रिविक्रमाकडून अफ्रोडाइटला सहाय्याचा संकेत मिळत नाही व म्हणूनच हिचा किंवा त्रिविक्रमचा ‘प्रत्यक्ष’ हस्तक्षेप मानवी मर्यादांच्या पलीकडेच होत असतो.

५. पुढे माता अल्केमिनी (Alkemini) पोसायडॉनला(Poseidon) सांगते, श्रीचंडिकाकुलातील सर्वच सदस्य श्रद्धावानांना त्यांच्या संकटावर मात करताना अप्रत्यक्षपणे शक्तीसहाय्य व साधनसहाय्यसुद्धा पुरवीतच राहतात व जेव्हा श्रद्धावानांची ताकद अपुरी पडू लागते, तेव्हा निश्चितपणे स्वतः सर्वकाही करू लागतात.

अम्बज्ञ.