Shocking news about Aphrodite

#91887

१५ जानेवारीच्या अग्रलेखातील दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे अफ्रोडाईटचे (Aphrodite)आणि नुईटचे(Nuit) संबंध…..नुईटची मैत्रिण अफ्रोडाईट हे वाचून आश्चर्याचा जोरदार धक्का बसला. पण जेव्हा हळू हळू शेवटापर्यंत पोहोचलो तेव्हा अफ्रोडाईट काय आहे ते जाणविले….ही अफ्रोडाईट नक्कीच सर्वश्रेष्ठ शक्ती आहे…. ती कीती फोकस आहे. हे कळते. कॉसमॉस डोअरवे वर इष्टार हल्ला करणार आहे आणि त्यास रोखण्यासाठी आपली शक्ती न वापरता श्रद्धाहींनांची कापालिक विद्या वापरण्यास अफ्रोडाईट भाग पाडत आहे….काय सॉलीड युद्ध निती आहे….ती खरच माया आहे….सगळ्यांना गुंगवून ठेवले आहे….काट्यानेच काटा काढावा हे इथे कटाक्षाने पाळलेले दिसते….आणि एक गोष्ट महत्त्वाची कळते…माझ्या परमेश्वराचे कार्य अडत असेल तर मला कमीपणा घेऊन ते कार्य पुढे नेण्यास काहीच हरकत नाही..तसच काहीच अफ्रोडाईट्ने केले आहे. तीला नुईटशी मैत्री आणि मदत करण्यास काहीच प्रोब्लेम नाही आला. नीच लोकांशी कसे तीने सराईतपणे जुळवून घेतले आणि त्यांना खिश्यात घातले..आणि कुठेही त्यासाठी आपली देवयान पंथाची तत्त्वे मोडीस घातली नाही….कसली स्मार्ट आहे…..

आता इथे पण एक मज्जा आहे ती म्हणजे शत्रुचा शत्रु हा मित्र हे तत्त्व कुठेतरी वापरले गेले आहे असे वाटते…तेही अफ्रोडाईटने मग ते चूक आहे का? हा प्रश्न मला पडला आणि याचे उत्तरही बापूंनी देऊन ठेवले आहे….त्यांनी सांगितल्याप्रमाणे….कोणत्याही कृतीमागचा हेतू कारण जास्त महत्त्वाचे असते…जर आईने बाळाला अभ्यास केला नाही म्हणून मारले तर ते मारणं त्याच्या फायद्याचेच असते. तसेच अफ्रोडाईटने जे केले ते समस्त श्रद्धावान व विश्वाच्या हिताचेच आहे….त्यामूळे तिच्या कृतीवर शंका येऊच शकत नाही….एक मात्र खर नीच कपटी श्रद्धाहीनांना हे कळू शकत नाही….

एकीकडे अफ्रोडाईट नुइटच्या पंथाला म्हणते की तुम्ही विश्वासघातकी नाही मैत्रीचा आदर करणारे आहात….तर शेवटी मनात त्यांना नीच व कपटी म्हणते….इथे मला फार हसायला आले आहे…नीच आणि कपटी लोक विश्वासघातकी असतात. कपट करणे म्हणजे कुणाचा तरी विश्वासघातच करणे नाही का? आणि अफ्रोडाईट या सर्वांना चांगले ओळखून आहे….
आता ती दालनात गेली आहे….आणि तिथे काही होणार आहे का? ही जाम उत्सुकता लागली आहे.

– रेश्मा नारखेडे……