Semiramis and Aphrodite

#208941

Sailee Paralkar
Keymaster

Semiramis and Aphrodite

हरी ओम,

दिनांक १९ एप्रिल, २०१५ रविवरच्या अग्रलेखातील निमरॉड (Nimrod) आणि सेमिरमिस (Semiramis) ह्यांच्या संवादामध्ये बरेच महत्वाचे मुद्दे उलगडले –

१. सेमिरमिस (Semiramis) म्हणते नुइट (Nuit)आणि पान हदितच्या मृत्यूचे वृत्त तर आकाशगंगेत ठाऊक आहे. याचा अर्थ ह्या लोकांकडे एवढे सामर्थ्य आहे, बळ आहे पण त्यांना हे कळू शकत नाही की अफ्रोडाइटने(Aphrodite) त्यांना जिवंत ठेवले आहे हीच ती महादुर्गेची माया आहे.

२. ‘वसुंधरा’ (Pruthvi) पृथ्वी ही सर्व विश्वांमध्ये, सर्व आकाश गंगामध्ये असे त्रिमितीतील एकमेव स्थान आहे जेथे पवित्र प्रकाशशक्ती ७व्या मितीतून थेट कार्य करत असते व ‘ती’ ह्या स्थानावर प्रकटही झाली आहे.
३. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्रीमितीना सहजपणे पार करणारा “त्रिविक्रम” (Trivikram) पुत्र जमिनीवर अनेक वेळा चाल्लेलाही आहे.
४. ६ हा अंक अंकाराने त्याचे ध्येय्य बनविला आहे कारण त्याने प्रत्येक वेळी ६व्या मितीत पोचायच्या आधीच त्याला हार पत्करावी लागली आहे.
५.पवित्रमार्गीयांच्या महाशक्तीने ह्या वसुंधरेवर एक अद्वितीय लिंग स्थापन केले आहे व त्याचा ताबा मिळाल्यावरच अंकारा ६ व्या मितीत पदार्पण करू शकतो. दृश्य जगतापर्यंत असणाऱ्या प्रत्येक विश्वाचा केंद्रबिंदू ‘त्या’ लिंगातच ठेवला आहे आणि त्याची राख करून त्यांना जहाबुलोनला जन्म द्यायचा आहे असे पुढे निमरोड सांगतो.

ह्या सर्व मुद्द्यांवरून त्यांचा किती सखोल अभ्यास आहे हे दिसून येते आणि एवढ्यावेळा हार पत्करून देखील त्यांची बुद्धी ताळ्यावर येत नाही. कोण जाणे अजूनही ते त्या “लिंगाच्या” शोधात असतील.

Hari Om & Ambadnya,
Saileeveera Paralkar
http://aniruddhafriend-saileeparalkar.blogspot.in/