Saturn planet and 12 zodiac signs

#90075

साडेसातीमागची खरी उकल बापूंनी आजच्या १३ जानेवारीच्या अग्रलेखात केली आहे. जेव्हा आधीच्या अग्रलेखात शनिग्रहाचा(Saturn) उल्लेख झाला तेव्हाच बापूंनी जागृत केलेल्या विवेकबुद्धीने मला संकेत दिला की आता साडेसातीचे कनेक्शन कदाचित उलघडले जाईल आणि आजच्या अग्रलेखात तसेच झाले. शनि या ग्रहाचे इंग्रजी नाव Saturn असे आहे. ज्यात Satan सैतान या शब्दाचा उच्चार होतो. हे यापूर्वी कधीही ध्यानात आले नव्हते. ते ११ जानेवारीच्या अग्रलेखात जाणवले. “तुझी साडेसाती सुरु होत आहे..” ही गोष्ट अनेकदा ऐकली आहे. आणि मग या साडेसातीमध्ये अनेक अडचणी सुरु होतात. या शनिला हनुमंताने धडा शिकवला त्यामुळे साडेसाती सुरु झाली की हनुमंताची उपासना करावी असेही सांगण्यात येते….पण हे सारं मुळात का? आणि कुठून आले हे सर्व १३ जानेवारीच्या अग्रलेखात स्पष्ट झाले.

ह्या सैतानी(Satan) प्रवृत्तींनी भोळ्याभाळ्या श्रद्धावानांच्या आयुष्यात हाहा:कार उडवून त्यांना आपले गुलाम करण्याचा सॉलीड प्लॅन केलेला होता. “अंकारा व इष्टारच्या योजनेनुसार दर २९ वर्षांनी सर्व वसुंधरावासियांना एकाच वेळेस साडेसात वर्षे कमीतकमी पवित्र स्पंदनांत जीवन चालवावे लागले असते. हे अव्याहत चालू राहीले असते.” याचाच अर्थ या सैतानांचा काय भयानक प्लॅन होता ते पहा. एकाच वेळी प्रत्येकाला साडेसाती लागली असती. म्हणजे अगदी प्रत्येकाच्या पवित्र स्पंदन मिळविण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला असता…तसेच पवित्र स्पंदन उत्पन्न होण्याच्या प्रक्रियेवर देखील कदाचित परिणाम झाला असता. आणि त्यामुळे ह्या सैतानांना अपवित्र स्पंदने पसरविण्यास त्या स्पंदनांच्या अधिपत्याखाली वसुंधरावासियांना आणून गुलाम बनविणे शक्य होते. ही रेख सैतानांनी Already मारली. पण रेखेवर मेख मारणार्‍या, सदगुरु तत्त्वाचे प्रतिक असणार्‍या श्री त्रिविक्रमाने ह्या सर्व प्रकाराला मर्यादा घातल्या. त्यामूळे मानवांचे त्यांच्या जन्मक्षेत्रावरुन १२ विभाग पडतील व प्रत्येक विभागास २९ वर्षांनी साडेसात वर्षे त्रास सहन करवा लागेल व त्यावेळेस बाकीचे मनुष्यविभाग सुरळीत काम करू शकतील. अशी ही मेख आहे.

हे बारा विभाग म्हणजे कदाचित बारा स्थाने आहेत…जे कुंडलीमध्ये (Zodiac signs)मांडतात. ह्या स्थानांमध्ये ग्रह फिरत असतात असे मी ऐकले होते. ही बारा स्थाने हे बारा विभाग खुद्द श्री त्रिविक्रमाने मनुष्याच्या हितासाठी केले. ह्या्तील एकेका स्थानाला दर २९ वर्षांनी साडेसातीचा त्रास होतो. हे मला तरी स्पष्ट झाल्यासारखे वाटते.

इथे त्रिविक्रमाचे त्रिविक्रमपण सिद्ध होते. एकाच वेळी सैतानाचे मनसुबे खोडून काढले…मनुष्याला मोठ्या हानीतून वाचविले आणि त्याच वेळी या मनुष्यावर शनिचा धाक उत्पन्न केला. श्री त्रिविक्रमाच्या असीम प्रेमामुळे शनिची भितीच्या ऐवजी “शनिचा धाक” आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अवतीर्ण झाला. तोही श्रद्धावानांच्या भल्यासाठीच…What a transformation….पण आपण समजून घेतले पाहीजे.

आणि हे सर्व त्रिविक्रमाने (Trivikram)घडवून आणले ते महाप्राणास आवाहन करुन. त्यामुळे या साडेसात वर्षाच्या बिकट काळातसुद्धा जो श्रद्धावान महाप्राणाची आराधना करेल त्याच्या उर्जेचा पुरवठा ड्रॅको खेचू शकणार नाही. आणि हे श्रद्धाहीन देखील साडेसातीच्या प्रांतात आणले. म्हणजे श्रद्धाहीनांचे शस्त्र त्यांच्यावर उलटवले. कारण श्रद्धाहीन असल्याने हनुमंताची उपासना करणे ते शक्य नाहीत. त्यामूळे शनिची पीडा त्यांचा साडेसात वर्ष छळ मांडेल व त्यांचीच अपवित्र स्पंदने त्यांचाच घात करतील. This is absolute BOOMERANG. हे त्रिविक्रमच करु शकतो. आणि जो श्रद्धावान हनुमंताची उपासना करेल त्याची पवित्र स्पंदने राखली जाऊन त्यामध्ये वाढच होणार मग त्याच्या वाट्याला साडेसातीचे भोग येणार नाही आणि जरी अडचणी आल्या तरी त्याचा “गुरु” प्रभावी ठरेल….हे निश्चितच

ह्या संदर्भावरुन एक अजून एक गोष्ट क्लिक झाली… ती म्हणजे सूर्यमालेची संरचना आणि त्यांचे भारतीय, ग्रीक तसेच इतर सर्व अध्यात्मातील त्यांचे स्थान. शनि या ग्रहाच्या आधी कोणता ग्रह आहे. तर गुरु. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे आणि पृथ्वी आणि शनिच्या मध्ये आहे. मी अनेकवार माझ्या आईकडून ऐकले होते की तुझा गुरु प्रबळ आहे. गुरु चांगल्या स्थानात आहे. त्यामुळे आता तुझे चांगलेच होणार..माझे तीला प्रांजळपणे उत्तर असायचे की माझा सदगुरु प्रबळ आहे आणि तो माझ्या मनात आहे. त्यामुळे माझे नेहमीच चांगले होणार. पण आज आईचे ते शब्द इथे आठवतात आणि ह्या गुरु ग्रहाची रचना किंवा अस्तीत्व श्रद्धावानांना बळ देण्यासाठी आणि शनिच्या प्रभावाने झालेले अथवा होणारे नुकसान टाळण्यासाठी असावी का असा मला प्रश्न पडला आहे?

कारण माझ्या वाचनात आले की या गुरु ग्रहाला आणि त्याच्या भोवताली असणार्‍या लघु ग्रहांच्या पट्ट्याला ग्रीक व रोमन संस्कृतीमध्ये विशे़ष महत्त्व आहे. रोमन संस्कृतीमध्ये ज्युपीटर देवाच्या नावावरुन गुरु ग्रहाला “ज्युपिटर” हे नाव दिले गेले होते. हा रोमन संस्कृतीमधला प्रमुख देव होता. गुरुचे खगोलशास्त्रीय चिन्ह (♃, ) हे ज्युपिटरच्या(Jupiter) हातातील वज्रास्त्र सारखे दिसणारे असून भारतीय संस्कृतीत वज्र हे इंद्राचे अस्त्र आहे. तसेच ग्रीक देवता झीअस सुद्धा गुरुशी संबंधीत आहे. त्याचे ही अस्त्र वज्रास्त्र असून गुरुसाठी वापरण्यात येणारे “झिनो” हे विशेषण झिअस वरुन आलेले आहे. हिंदू धर्मात या गुरुला “बृहस्पती” अर्थात देवांचा गुरु असे म्हटले जाते. तसेच या गुरु ग्रहाला मित्र ग्रह असे देखील म्हणतात, असे वाचले होते.

पण मुद्दा असा की सध्या सुरु असलेल्या ग्रीक मिथककथेतील(Greek mythology) झीअसचा संदर्भ हा गुरु ग्रहाशी जोडलेला दिसून येतो. आता पुढे बापू काय सांगणार याची पराकोटीची उत्सुकता लागलेली आहे. कारण वाचलेले काहीही असो…पण आजच्या घडीला बापूंचे अग्रलेख वाचल्याशिवाय आपण वाचणार नाही हे मला तरी स्पष्ट झालेले आहे.

आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात येते आहे की बहुतेक पहिली साडेसाती ही झीअसला लागली आणि स्वतः अफ्रोडाइटने त्याच्या कानात महाप्राणाच मंत्र सांगितला. झीअस हा या साडेसातीवर कशी मात करायची याचे मूर्तीमंत प्रात्याक्षिक बहुतेक आपल्याला देणार. कारण आता इथे युद्ध सुरु झाले आहे आणि झीअसवर संकटांची मालिकाच कोसळणार आहे व त्यातून झीअस कसा मार्ग काढणार यातूनच आपल्याला बरेच काही शिकावयास मिळेल असे मला वाटते.

अधिव्रत आता पुढच्या लेखात त्रिविक्रम रहस्य सांगणार आहे. याची देखील पराकोटीची उत्कंठा लागली आहे. हे रहस्य पुढील “गुरु”वारच्याच अग्रलेखात येणार….हे विशेष.

अंबज्ञ
रेश्मावीरा नारखेडे
http://www.aniruddhafriend-reshmashaileshnarkhede.com