Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit – Why Guru is reqired?

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit – Why Guru is reqired?

#7641

Sachinsinh Varade
Participant

Sai the guiding spirit – Why Guru is reqired?

हरी ओम
सर्वप्रथम सगळ्यांना श्रीराम आणि अंबज्ञ …
सुनितावीरा,रेश्मावीरा,अजितसिंह,केतकीवीरा,हर्शसिंह यांनी खूप सुंदर गोष्टी मांडल्यात …
अंबज्ञ अजितसिंह मला तुमचे म्हणणे पूर्णपणे पटले. खरच हेमाडपंतांना(Hemadpant) जाणून घ्यायचे असेल तर दादांनी मांडलेले पहिले तीन मुद्दे आधी ध्यानात घेतले पाहिजेच …
हा बापू मला एक एक गोष्टी समजावत जात आहे …
म्हणजे बघा ना
आधी मला एवढच माहित होत कि हेमाडपंत उच्चशिक्षित होते पण एक नवीन गोष्ट बापूंनी कळवली आणि ती म्हणजे हेमाडपंत मागच्या ४० वर्षांपासून गुरुचरित्रच (Gurucharitra) पारायण करत होते …

म्हणजेच जी व्यक्ती मागच्या ४० वर्षांपासून गुरुचरित्रच पारायण करत होती त्या व्यक्तीला सद्गुरु तत्वाच अकारण कारुण्य आधीपासूनच माहित असेल,पण त्याच बरोबर ज्या प्रमाणे रेश्मावीरा नी त्यांच्या पहिल्या पोस्ट मध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात
१. जागृकता,२. डोळसपणा ,३. निरक्षण , ४. आकलन ,५. अनु्भव ,६. विश्वास
हे गुणधर्म हि त्यांच्यात होतेच

पण जेव्हा हेमाडपंत यांना साईनाथ पहिल्या खेपेस बोलावतात तेव्हा त्यांच्या एका मित्राच्या मुलाचा मरण होत त्या वेळेस त्या मुलाच्या सोबत त्यांचा गुरु असताना देखील त्या मुलाचा मृत्यू होतो …याच वेळी हेमाडपंत यांना प्रश्न पडतो कि गुरूची(Guru) आवश्यकता काय????

पण इथे माझ्या मते तरी हेमाडपंत यांचा सद्गुरु तत्व वरचा अविश्वास दिसत नाही …कारण हेमाडपंत गुरुचरित्रच पारायण करत होते आणि ते खूप विचरिहि होते शिवाय सावधानता हा गुण त्यांच्या अंगी असल्या कारणाने त्यांनी त्या मुलाच्या गुरूला सद्गुरु म्हणून मानले नसाव,त्या ऐवजी त्यांनी त्याला दुसराच कोणी भोंदू बाबा मानले असावे आणि त्याच दृष्टीकोनातून ते साईनाथ यांना बघत असावे …ं…

दुसर्या खेपेस नानासाहेब स्वतः साईनाथ याचं गुणसंकीर्तन करतात आणि त्यांच्या कडून शिर्डी ला येण्याच वचन घेतात… त्याच्या दुसर्याच दिवशी हेमाडपंत शिर्डी ला निघतात …. दुसर्या दिवशी ९-१० वाजता शिर्डीला पोहचतात

हेमाडपंत ज्यावेळेस शिरडीत पोहचले आणि साठ्यांच्या वाड्यात राहण्यास उतरले स्वतः सांगतात कि, टांग्यातून उतरल्यावर मनामध्ये दर्शनाची उत्सुकता वाढली होती कधी एकदा जाऊन बाबांचे चरणावर डोके ठेवेन अशी त्यांच्या मनात आनंद लहरी उसळत होत्या
तांग्यातुनि उतरल्यावरी । दर्शनौत्सुक्य दाटले अंतरी ।
कधी चरण वंदिन शिरी । आनंद-लहरी उसळल्या ।।
(संदर्भ अ. २/ओ. १३३)
पुढे त्यांना बाबांचे परम भक्त तात्यासाहेब नूलकर मशिदीतून नुकतेच येतात आणि सांगतात लवकर दर्शन घ्या सर्व मंडळीसोबत बाबा वाड्याच्या कोप्र्यापाशी आले आहेत आधी धुळभेट (हातपाय धुवून तयारीने देवदर्शन करण्यापूर्वी प्रथम दुरुनच – रस्त्यातूनच देवाचे दर्शन घेणे ; देवाला केलेला नमस्कार.) घ्या . बाबा लेंडीस निघाल्यानंतर मग तुम्ही स्नान करून घ्या. बाबा माघारी परत येतील मशिदी मध्ये पुन्हा आरामात दर्शन घ्या.

ऐसें ऐकुनी घाईघाई । धावलो बाबा होते त्या ठाई । धुळीत घातले लोटांगण पाई । आनंद न माई मनात ।।१३७।।
नानासाहेब सांगुनी गेले । त्याहुनी अधिक प्रत्यक्ष पाहिलें । दर्शनें म्या धन्य मानिले । साफल्य झाले नयनांचे ।।१३८।।
कधी ऐकली नाही देखिली । मूर्ती पाहुनी दृष्टी निवाली । तहान भूक सारी हरपली । तटस्थ ठेली इंद्रिये ।।१३९।।
लाधलो साईचा चरणस्पर्श । पावलो जो परामर्ष । तोचि या जीवाचा परमोत्कर्ष । नूतन आयुष्य तेथुनि ।।१४०।।
ज्यांचेनि लाधलो हा सत्संग । सुखावलो हा मी अंग-प्रत्यंग ।तयाचे ते उपकार अव्यंग । राहो अभंग मजवरी ।।१४१।।
ज्यांचेनि पावलो परमार्थाते । तेचि की खरे आप्त भ्राते । सोयरे नाहीत तयांपरते । ऐसे निजचित्ते मानी मी ।।१४२।।
केवढा तयांचा उपकार । करू नेणे मी प्रत्युपकार । म्हणोनि केवळ जोडूनी कर । चरणी हे शीर ठेवितो ।।१४३।।
साईदर्शनलाभ घडला । माझिया मनीचा विकल्प झडला । वरी साईसमागम घडला । परम प्रकटला आनंद ।।१४४।।
साईदर्शनी हीच नवाई । दर्शने वृत्तीसी पालट होई । पूर्वकर्माची मावळे सई । वीट विषयी हळूहळू ।।१४५।।
पूर्वजन्मीचा पापसंचय । कृपावलोकने झाला क्षय । आशा उपजली आनंद अक्षय करितील पाय साईचे ।।१४६।।
भाग्यें लाधलो चरण-मानस । वायसाचा होईल हंस । साई महंत संतावतंस । परमहंस सद्द्योगी ।।१४७।।
पाप – ताप – दैन्यविनाशी । ऐसिया साईच्या दर्शनेसी । पुनीत आज जहालो मी बहुवसी । पुण्यराशी समागमे ।।१४८।।
पुर्विल कित्येक जन्मांच्या पुण्यगांठी । ती हि साईमहाराज – भेटी । हा सी एक मीनलिया दृष्टीं । सकल सृष्टी साईरूप ।।१४९।।

पण इथे सुद्धा आपण बर्याच वेळेला आपण गोंधळात पडतो कि नेमक हेमाडपंत काय विचार करत होते
म्हणजे बघा जी व्यक्ती पहिल्या वेळेस शिर्डीस येण्यास नकार देते पण नानासाहेबांच्या वचन घेऊन हि व्यक्ती दुसर्याच दिवशी शिर्डीस निघाली … शिर्डीस धुळभेट झाल्यावर हीच व्यक्ती खूप आनंदी होते पण त्याच नंतर वाड्यात वादविवाद सुरु होतो आणि हिच व्यक्ती गुरूची आवश्यकता काय याच विचारावर ठाम असते

ज्या प्रमाणे माझ्या मते हेमाडपंत यांनी पहिल्या वेळेस मित्राच्या गुरूस कोणीतरी भोंदू बाबा मानले असावे त्याच प्रमाणे त्यांनी साईनाथ बद्दल हि असाच काहीस मत बनवलं असाव …. पण इथे साईनाथ नानासाहेबांना पाठवतात आणि हेमाडपंत यांना शिर्डीत बोलावतात..
या ठिकाणी खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे कि नानासाहेब भेटल्यावर हेमाडपंत दुसर्याच दिवशी निघतात . या वेळेस हा अमुलाग्र बदल होतो कसा …… तो होतो फक्त नानासाहेबांनी केलेल्या गुणसंकीर्तनमुळे ………

आताच काही दिवसांपूर्वी पंचशील ची वेब साईट चालू झाली आहे
त्यात पहिल्याच मेन पानावर २ ऑगस्ट २००२ च्या बापूंच्या प्रवचनाची एक छोटीशी विडीओ आहे … त्यात बापूंनी सांगितलं आहे कि ज्यांनी ज्यांनी राम जन्म कथा दरवर्षी ऐकली त्यांच्या साठी प्रत्येक वर्ष हा नवा जन्म ठरला आणि ज्यांनी कंटाळा केला त्यांच्या तो जन्म एका क्षणापुरता ठरला …

इथेही हेमाडपंत यांच्या बाबतीत हेच घडल
१. नानासाहेब यांनी केलेल्या गुणसंकीर्तन मुळे हेमाडपंत यांना साईनाथची ओढ लागली
पण इथे सुद्धा त्यांचा गुरुचरित्र वरचा विश्वास ,श्रद्धा कमी झाली नव्हती ……
२.धुळभेट झाल्यावर वाड्यात हेमाडपंत यांच्या वादविवाद व्हायला लागला …. कि गुरु ची आवश्यकता काय पण तरी सुद्धा विरुद्ध बाजूने सद्गुरु तत्व बद्दलच बोलला जात होत म्हणजेच एक प्रकारे गुणसंकीर्तन होत होत ……

जो तिसरा मुद्दा समीर दादानि सांगितला कि हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे येण्याच्या वेळेस कशी होती? तर अतिशय उद्विग्न
हि उद्विग्न स्थिती म्हणजे माझ्या मते तरी गुरुचरित्र आणि साईनाथ यांच्या मधल नेमक काय घेऊ हा असेल… म्हणूनच गुरूची आवश्यकता काय यावर हेमाडपंत ठाम होते
पण सद्गुरु तत्व कडे प्रत्येक गोष्टीच उपाय असतो … बाबांची भेट घेताना बाबा म्हणतात “काय वाद चालला होता रे वाड्यात ” या बाबांच्या एका प्रश्नाने हेमाडपंत यांच मन साईनाथ चरणी स्थिर झाल आणि गुरुचरित्रात वर्णिलेल्या सद्गुरु तत्वाची ओळख पटली

मी अंबज्ञ आहे
I Love You My Dad Forever
Sachinsinh Varade
Kalyan East