Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Shri Saisatcharit Panchsheel Exam)

Forums Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Shri Saisatcharit Panchsheel Exam)

#7432

Sai the guiding spirit-Shri Saisatcharit Panchsheel Exam

हरी ओम

दादा तुम्ही तर खुप सुंदर सुरुवात केली आहे. हेमाडपंताचा(Hemadpant) सुरवातीचा प्रवासामधिल जे विचार आहेत ते सर्वांच्या मनातील आहेत. तसेच आपण पाहतो सद्गुरु हा सर्वासोबत आहे. फक्त प्रत्येकाची एक वेळ आहे त्या विशिष्ठ वेळेला तो आपल्याला खेचून घेतो. तसेच हेमाडपंता सोबत झाले अहे. त्यांच्या देखील मनात असे नाना विचार आले होते. अध्याय १ मध्ये ओवी क्र. ५७ श्रवणें साईगुणश्रवण । मने साईमूर्तीचे ध्यान । चित्तें अखंड साईचिंतन । संसारबंधन तुटेल ।। आम्ही अंबज्ञ आहोत यासाठी कि श्री साईसच्चरित (Shri Saisatcharit) ग्रंथ आम्हापुढे बापूनी एका वेगळ्या पद्धतीने वाचण्यास दिले. आम्ही फक्त एक ग्रंथ म्हणून तो होतो, पण आता त्यावर होणारी पंचशील परीक्षा(Panchsheel Exam) यामुळे तो ग्रंथ नसून तो तर आम्हाच्यासाठी तर तो खजिना आहे. बापूना ओळखण्यासाठी वरील ओवी मध्ये फक्त त्याच्या गुणांचा श्रवण मनामध्ये फक्त त्याच्या रूपाचे ध्यान म्हणजेच फक्त स्मरण त्याच्या रूपाचे जसे आपण पाहतो कसा चालतो कसा बोलतो कसा गोड दिसतो आपला हसताना एवढेच काय साधनाताईचा अभंग आठवतो हसला माझा देव…… अखंड त्याचे चिंतन असेल तर संसार बंधन तुटेल म्हणजेच तो समर्थ आहे आपली काळजी वाहण्यास समर्थ आहे. असेच या ग्रंथामधून आपला स्वतःचा जीवन विकास हि करू शकतो तसेच या देवावर कशी भक्ती करावी या ग्रंथामधून हेमाडपंतानी आपल्याला दिलेला एक चांगला खजिना आहे. एवढेच नाही तर बापूनी हि लावलेली एक गोडी आहे फक्त तो मधाचा बोट आपल्याला चाखण्यास देत आहे. आणि आपल्याला गुणसंकीर्तन कसे करायचे याचे बळ देत आहे. हेमाडपंतानी संपूर्ण ग्रंथामधून मधून फक्त साईचे गुणसंकीर्तनच केले आहे आणि बाबांनी देखील त्यांचीच निवड केली आहे.

हरी ओम श्री राम अम्बज्ञ