Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Sai the guiding spirit – Sapatnekar story)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Sai the guiding spirit – Sapatnekar story)

#8432

Harsh Pawar
Participant

हरी ओम,
अध्याय ४८ मधील सपटणेकरांची कथा (Sai the guiding spirit – Sapatnekar story)आपण बघत आहोत … काय ओझपूर्ण कथा आहे ही …आपल्या समूळ आयुष्याला कलाटणी देण्याचे सामर्थ्य या कथे मध्ये आहे … सद्गुरूच्या प्रेमाला कसलीच सीमा नाही हे दर्शवणारी कथा आहे ही …कोणा जीवन मार्ग चुक्लेलेल्या मनुष्याला ही कथा ऐकवा आणि पहा या कथेची ताकत … नुसता जगण्याचा मार्गच नाही सापडेल त्याला , तर त्या वरून चालण्यासाठी लागणारा उत्साह ही आपोआप मिळेल त्याला ही कथा ऐकून …
मी ते दृश्य डोळ्यांसमोर उभं करण्याचा प्रयत्न करत आहे जेव्हा सपटणेकर अखेरीस संधी साधून बाबांसमोर जाऊन बसतात …. इथे आपण एक अश्या माणसा बद्दल बोलत आहोत ज्याचा नुकताच एकूलता एक मुलगा मरण पावला आहे , ज्याने स्वतःला या दुखातून बाहेर काढण्यासाठी तीर्थ यात्रा केल्यात पण त्याच्या मनाला शांतता नाही मिळालेली आहे , ज्याला बाबांनी वारंवार “चल हट्ट ” म्हणून दूर लोटलं आहे , ज्याची मनस्तिथि पूर्णपणे उदिग्न अशी आहे … असे हे सपटणेकर एके दिवशी बाबांच्या जवळ कोणी नाही असे पाहून , मनाचा निश्चय करून बाबांच्या जवळ जातात आणि त्यांचे चरण धरून त्यावर आपले मस्तक ठेवतात … आणि ……आणि बाबा सपटणेकरांच्या डोक्यावर लागलीच आपला कृपाहास्थ ठेवतात …. बस्स !!! इथेच सर्व संपलं !!! काय विलक्षण सुंदर असेल तो क्षण ? … मला सांगा ज्या वाक्तीने वारंवार “चल हट्ट ” ऐकल आहे बाबांकडून त्याला एवढं धैर्य कुठून आलं सरळ बाबांसमोर जाऊन त्यांच्या चरणांवर माथा ठेवण्याच ?? सपटणेकर एवढे त्रस्त झाले होते जीवनाला की त्यांनी विचार केला असावा आता जे व्हायचं आहे ते होवो मी आता नाही मागे थांबणार …. कारण त्यांच्या मानाची पूर्ण खात्री झाली होती की मला जर कोणी ह्या दुखातून बाहेर काढू शकतील तर ते फक्त आणि फक्त बाबाच करू शकतील ……. इथे बाबा ही पुन्हा त्याची परीक्षा नाही बघत … त्वरीत त्याच्या डोक्यावर आपला कृपाहास्थ ठेवतात… मला सांगा त्या साई माउलीला त्रास नाही झाला असावा का प्रत्येक वेळी सपटणेकरांना चल हट्ट ” म्हणून दूर करतांना ? नक्कीच त्रास झाला असेल … कारण तो थोडा कठोर बाप जरी असला तरी तो त्याच वेळी प्रेमळ आई पण आहेच आहे … इथे बाबांच्या शिक्षण पद्धतीचे कौतुक वातते … कोणत्या भक्ताला कश्या प्रकारे भक्ती मार्गावर खेचत आणायचं हे त्यांना नीट माहित होतं ….
धन्य धन्य माझी साई माउली ,
नित्य लाभो आम्हा तुझी साउली !!!

श्री राम ,

मी अंबज्ञ आहे !!!

~ हर्षसिंह पवार
दिंडोशी उपासना केंद्र