Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(sai the guiding spirit sapatnekar story)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(sai the guiding spirit sapatnekar story)

#8306

ketaki. Kulkarni
Participant

हरी ओम,
सपटणेकर(Sapatnekar) ह्यांच्या कथेत आपण बघतो कि बाबा त्यांना “चल हट” असे म्हणतात, परंतु तरीदेखील ते बाबांचे पाय घट्ट धरून ठेवतात. त्यांनी ती संधी साधली व बाबांचे कायमचे भक्त होऊन राहिले. आता त्यांच्या जागी जर इतर कोणी असते तर बाबांना घाबरून किवा राग येउन अश्या कोणत्याही कारणाने पाठी फिरवु शकले असते, पण त्यांनी असे केले नाही. इथे हीच गोष्ट लक्षात येते कि मला माझ्या सद्गुरु कडे माझ्या बाबांसारखे बघता आले पाहिजे. हा भाव ठेवयला पाहिजे कि माझे बाबा मला ओरडले, चापट्या दिल्या तरी सुद्धा ते माझे बाबा आहेत आणि त्यांना हा संपूर्ण अधिकार आहे, माझ्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा कारण त्यांनाच माहित आहे मी आधी कोण होतो मी आत्ता काय आहे आणि माझा पुढे कस होणार आहे.
अशीच अजून एक कथा आपण श्री साईसच्चारीतामध्ये(Shri Sai Satcharitra) बघतो ती म्हणजे श्याम्याची(Shyama).. सर्पदंश झाल्यावर बाबा म्हणतात “चल निघ जा खाली उतर ” हे शब्द ऐकून श्यामा तिथून निघून जात नाही. तिथेच थांबून राहतात. नंतर आपण बघतो कि ते श्यामाला नाही तर त्यांच्यामध्ये पसरणाऱ्या विशाला उद्देशून बाबा बोलत होते. पण जर हे वाक्य त्यांनी उलट अर्थाने घेतल असत तर!पण त्यांनी तसे केले नाही.. कारण एकाच… बाबांवर्ती संपूर्ण विश्वास!!.. म्हणूनच श्यामा, हेमाडपंत, दीक्षित काकांसारखे उत्तम भक्त होऊन गेले. आणि आपल्याला शिकण्यासाठी एक पाउलवाट बाबांनी हेमाडपंतांकडून बनवून घेतली.
आणि ह्या पाउलवाटेवर चालण्याची संधी पुरपूर उचलली ती म्हणजे मीना वैनी, अद्य पिपा काका, चौबळ आजोबा, साधना ताई ह्यांसारख्या भक्तांनी. मीना वैनीनि तर त्यांच्या साईवर एवढं जीवापाड प्रेम केल कि साईना शेवटी त्यांच्यासमोर प्रगट व्हायलाच लागल.. आपल्या सगुण साकार बापू रुपात, आणि मग हा बापू त्यांनी आपल्या सगळ्यांपर्यंत पोचवला. किती थोर व्यक्तिमत्व होत्या वैनी म्हणजे!
खरोखर मीना वैनी ह्यांच्याकडून समजतं ते देवाकडे नक्की काय मागायचं
स्वतासाठी फक्त सामिप्य मागतात..
“वैनी पहिल्यांदा मागते स्वहित, सामिप्याची ओढ पुरवावी”..

त्याच बरोबर साधना ताईन्कडून कळत कि विश्वास कसा ठेवायला पाहिजे.. ते बापूंना अगदी त्यांच्या आई-बापा सारखेच समजतात…
“सकल विश्वाचा स्वामी
साधीसाठी माय बाप”

आद्य पिपा (Adyapipa) काकांकडून समजतं ते माझ्या आयुष्यामध्ये आपण “त्या”ला कस बोलवायला हव..
“वरती छप्पर तव धाकचे घट्ट दणकट न उडणारे
आत असावे तू अन मी रे घर बांधाया येत रहा”

आता आपली वेळ आहे हि संधी साधून घेण्याची, त्याला माझा घर बांधून देण्यासाठी बोलावण्याची.
माझ्या सद्गुरूला माझ्या बापाला माझ्या आयुष्याच चालक बनवून त्याच्या कुंपणात रहायचे कि त्याचं अस्तित्व नाकारून कुंपणाच्या बाहेर असलेल्या रावणाच्या राज्यात जायचे हे सर्वस्वी माझ्यावरच अवलंबून आहे.
शेवटी “तो” मला कितीही ओरडला, माझ्यावर कितीही रागावला तरीहि आपण फक्त एकाच गोष्टीवर ठाम रहायला हव……

“नित्य नविनचि रूप, कधी दाखविसी कोप
तरी नाही घाबरत, तू माझाचि रे बाप”

अम्बज्ञ

केतकीवीरा कुलकर्णी
डोंबिवली पूर्व उपासना केंद्र