Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Sai niwas)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Sai niwas)

#8095

Aniketsinh Gupte
Participant

१६ मार्च २०१४ साईं निवास (Sai niwas)मधे होळीचा उत्सव साजरा करण्यात आला. सुट्टी असल्यामुळे पह्लियांदाच दर्शनासाठी गेलो होतो. रांगेत उभा असताना मनात विचारांचे चक्र सुरु झाले. बापू, साईं, हेमाडपंत, साईंसत्चरित्र असे सर्व काही. लहानपणी आई-बाबा बरोबर अनेक वेळा शिर्डिला जायचो. त्यानंतर बापूंनी जवळ घेतले. गुरुवारी साईं-बाबांची उपासना असायची. म्हणजेच साईंकडून बापूंकडे. मग बापूंनी पंचशील परिक्षेच्या मार्गाने साईं सत्चरित्र हे हाती दिले आणि ह्यातून मला नव्याने माझा साईं भेटला. ह्याच साईंने हा महान ग्रंथ दिला, आपल्याला हेमाडपंत दिले. हेमाडपंतकडून हा ग्रंथ लिहून घेतला. पण हेमाडपंत ह्यांनी फ़क्त इतकेच नाही दिले तर तस्बीर रूपी साईं दिले, ह्या होळी पूजनची परंपरा वर्षानुवर्षे नियमित चालवणारे दाभोलकर कुटुंब दिले. आणि साईं निवास ही पवित्र वास्तु मुंबई मधे आहे आणि दर वर्षी होळी उत्सव साजरा केला जातो ह्याची जाणीव आम्हाला बापूंनी करून दिली. काय सुंदर गोफ, एकमेकात सुंदर गुंफलेली. खरच साईं, बापू, साईंसत्चारित्र हे सर्व एकच घटक आहेत. ह्यांना आपण वेगळे करुच शकत नाही. हे सर्व एकत्र आपल्याला ह्या देवयान पंथाच्या महामार्गावरून कसे चालायचे हेच शिकवतात. ह्या सर्व विचारांमधेच साईं-निवास मधे पाऊल ठेवला ते बापूं चरणी अंबज्ञता ही भावना ठेवून.
अंबज्ञ
अनिकेतसिंह गुप्ते