Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Sai the guiding spirit- Ratanji Story)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Sai the guiding spirit- Ratanji Story)

#8518

ketaki. Kulkarni
Participant

हरिओम,
रतनजी शेटजींची कथा.. Sai the guiding spirit- Ratanji Story
इथे बघितल तर लक्षात येइल की रतनजिंनि खेद केला नाही. ते पुत्र प्राप्तिसाठी बाबांकडे येतात, परंतु 4च मूल राहिली म्हणून ते बाबाना दोश देत नाही. त्यानी बाबांकडे मागितल पण त्यात सुद्धा बाबांची इच्छा ठेवलीच.
ह्यातून नक्कीच शिकायला मीळत की देवाकडे काय अन कस मागायच. Journey of Hemadpant ह्या मधे दादानी हेमाडपंतांकडून ही गोष्ट कशी शिकायला मीळते हे फार सुरेखपणे समजावून सांगितले आहे.
हेमाडपंत कश्या प्रकारे एक एक टप्पा ओलांडत बाबांच्या जवळ जाऊन पोचले हे अगदी व्यवस्थितपणे दाखवून दिले आहे.
आणि त्यात महत्वाच म्हणजे काय मागायला पाहिजे देवा कडून हे ते त्यांच्याच आचरणातुन दाखवून दिले.  एकदा त्यांची इच्छा होते सकाळी रामाचे नाव घेण्याची, व म्हणून ते त्यासाठी रात्रीच रामाचे स्मरण करून झोपतात, व सकाळी औरंगाबादकरांच्या मुखातून एक सुंदर पद बाहेर पडते..
।।गुरुकृपांजन पायो मेरे भाई।।
म्हणजेच सद्गुरु आपली उचित इच्छा नक्कीच पुरवतो.
भ्क्ताने मागावे पण शेवटी त्याने त्यातून काय द्यायचे हे पूर्णपणे त्याच्यावर सोडून द्यायचे, कारण आपल्याला आतून बाहेरून व अगदी जन्मजन्मान्तारापासुं ओळखणारा फक्त तो एकच आहे.
दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाबाना पाहून हेमाडपंतांचा विकल्प गळून पडतो. खरा सद्गुरु हा असाच असतो, की ज्याला फक्त एका क्षणापुरताच बघितल जरी तरी मन स्वच्छ होउन जात. आणि भक्त पण कसा तर त्याच्या सद्गुरुला पाहताक्षणीच तो स्वतःमधे न राहता त्या क्षणाला तरी पूर्ण त्याचा झालेला असतो.
इथे practical book मधे ह्याचे फार perfect उदाहरण दिले आहे. ते म्हणजे मोरांची मेघ बघून झालेली स्थिति. ज्या वेळी आकाशात मेघ दातुन येतात त्या वेळी मोर कसा आनंदाने पिसारा फुलवून नाचु लागतो. बेभान होऊन जातो. त्या प्रमाणेच मला जेव्हा माझा सद्गुरु भेटतो तेव्हा मला सुद्धा त्या क्षणापुरता का होइना पण त्याच्या मधे मिसळून जाता आल पाहिजे.
जस औरंगाबादकर म्हणतात
।राम बिना कछु मानत नाही।
म्हणजेच रामाशिवाय मी कोणा दुसर्याला मानातच नाही, आणि ही स्थिति हेमाडपंतानी गाठली होती.
आपल्यालासरख्याना नक्कीच ही गोष्ट फार कठिण आहे, पण तरीसुद्धा हेमाडपंतांच्या आचरणातुन व त्यांचा आदर्श समोर ठेउन माझ्या देवाच होउन राहण्याचे प्रयास आपण नक्कीच करू शकतो.
खुप अंबज्ञ आहे दादा… हेमाडपंतांकडून अजुन भरपूर काही शिकण्यासारख आहे आणि ते काय आणि कस हे तुम्ही Journey of Hemadpant मधे खुप छान समजावून सांगितले आहे.
अंबज्ञ……

Ketakiveera kulkarni
Dombivli east upasna center