Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit – qualities of Hemadpant)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit – qualities of Hemadpant)

#7448

Sai the guiding spirit – qualities of Hemadpant

हरि ॐ

हेमाडपंत….
एक हुशार,बुद्धीमान आणि प्रेमळ साईभक्त..
त्यांच्या ह्याच qualities ओळखून बाबांनी त्यांचीच ग्रंथ लेखनासाठी निवड केली.

हेमाडपंत जेव्हा शिरडीत आले तेव्हा वाडयावर त्यांचा भाटयांबरोबर वाद सुरू  झाला..
मुख्य मुद्दा हा होता की…
“गुरू  कशाला  हवा,”?
कारण त्यांच्या मित्राच्या अनुभवावरून  त्यांना वाटत होते की गुरू  जर  आपल्या  अडचणीला कामी येत नाही तर काय गरज आहे गुरूची…
वाडा आणि मशीदीत तसं खूप अंतर असूनही हेमाडपंत जेव्हा दर्शनाला जातात तेव्हा बाबा हा विषय काढून हेमाडपंतांना खूण पटवून देतात..

सातासमुद्रा पलीकडेही  घडत असलेल्या गोष्टी बाबांना कळतच असतात…. अगदी up to date!!
बाबा सर्वज्ञ होते….

बाबांविषयी त्यांच्या मनात “विकल्प” होता. तो बाबांनी सहजासहजी नाहीसा केला.

मीनाई म्हणतात ना…
“सर्वसाक्षी  आहे बापू तो काय जाणेना ”
खरचं हा साई अनिरूद्ध काय जाणत नाही.. अगदी जेव्हाचं तेव्हा जाणत असूनही त्यातलं वाईटाकडे पाहतही नाही.. फक्त चांगल्या गोष्टींनाच वाव देतो.

“वैनी म्हणे बापूराया उचल तुझा सटका..
मज मार तोडूनी टाक दुर्गुनाचा भोपळा”..

हेमाडपंतांच्या मनातील दुर्गुनाचा भोपळा म्हणजे साईदर्शनात आलेला विकल्प…
तो फक्त साईच फोडू शकतो.
देवाच्या काठीला आवाज येत नाही पण “त्याला” जे अपेक्षित असतं ते “तो” करूनचं  घेतो..

११ व्या अध्यायात आपण पाहीलचं आहे, कसा बाबांनी हाजीच्या अहंकाराचा भोपळा फोडला.. आणि मगचं दर्शनासाठी मशीदीत येवू दिले..

आपल्या आयुष्या गुरू का हवा?
खरचं सोपं उत्तर आहे…
१) संरक्षण कवच म्हणून
२) योग्य मार्ग दाखवण्यासाठी
३) आयुष्या अधिकाधिक सुखी, सुंदर करण्यासाठी
४) चुकलो तर दम देण्यासाठी
५) धडपडण्या आधीच भक्कम आधार देण्यासाठी
६) दुःखात मायेने जवळ घेण्यासाठी
७) आनंदात कौतुक करण्यासाठी
ही list कधीच न संपणारी आहे.

हेमाडपंतानी बाबांना प्लेगच्या साथीवर उपाय म्हणून दळणं दळताना पाहून म्हचले की “दळणं (प्रारब्ध) दळणारा हा वेगळाच संत ”
प्रत्येकवेळी परमात्म्याचा PLAN वेगळा आणि अवर्णनीयचं असतो. १०८%.
आपल्या बाळांसाठी हा परमात्मा अगदी आधीपासूनचं कष्टत आला आहे, राबत आला आहे.. मात्र कधीच कंटाळला नाही..
१) राम जन्मात पुढील युगात रावणाचा त्रास आपल्या भक्तांना होऊ नये म्हणून १४ वर्षे वनवास आणि तोही पत्नी विरहात..
२) विठ्ठल रूपात  जनाबाईंना  घरकामात मदत, गोरा कुंभाराला मदत..

“विठ्ठला तू वेडा कुंभार…”

हा बापू फक्त प्रेमाचाच भुकेला आहे.. जणू त्याचा आत्माच प्रेमाने बनला आहे.

“प्रेम हाच आत्मा अनिरूद्धाचा… ”
आपण कितीही चुकलो तरी आपल्या मनात बापूंसाठी प्रेम असेल तर हा आपला बाप आपल्याला जवळ घेतोच..

खरचं बापू आपल्याबरोबर आहेत म्हणून आपणं खूप सुखी आणि extra lucky आहोत…

“जे आले ते तरूनी  गेले.. जे न  आले ते तसेच राहीले..
अनिरूद्धाचा झाला तो उरला, दुजा दुःखातचि रूतला… ”

अंबज्ञ….
I love u my Dad…

Pranilsinh Takale
Telugu center Dadar…्