Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Hemadpant’s transformation)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Hemadpant’s transformation)

#7444

Suneeta Karande
Participant

Sai the guiding spirit-Hemadpant’s transformation

हरि ओम. दादा हेमाडपंताच्या जीवनात सदगुरु श्रीसाईनाथांना भेटल्यानंतर जो आमूलाग्र बदल घडला त्याच्या अभ्यासाने ह्या फोरमची सुरुवात करणे ह्यापरती दुसरी APT सुरुवात असूच शकत नाही. विशेषत: परम पूज्य बापूंनी मागच्याच गुरुवारी दिनांक ३०-०१-२०१४ ला प्रवचनात ह्याविषयी खूपच उद्बोधक मार्गदर्शन केले. बापूंनी जी सर्वसामान्यत: माणसाच्या हातून चूक घडते ती कोणती आणि ती कशी टाळायची असते ह्याबाबत जे सांगितले त्यावरुन हेमाडपंताच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात येतात –
(१) स्वता:ची आणि सदगुरुची (देवाची )चुकीची परीक्षा घेणे – काकासाहेब दिक्षित हेमाडपंतांना भेटतात, साईबाबांचा महिमा सांगतात व त्यांना साईनाथांकडे येण्याचा आग्रह करतात आणि हेमाडपंत शिरडीस जाण्याचे निश्‍चित करतात. परंतु हेमाडपंताच्या मित्राचा मुलगा अचानक निवर्तल्याने हेमाडपंताच्या मनात गुरुची आवश्यकता काय ह्यावरच शंका ,तर्क-कुतर्कांचा खेळ चालू होतो आणि येथेच हेमाडपंत स्वत:च स्वता:ची आणि सदगुरुची (देवाची )चुकीची परीक्षा घेणे ह्या चुकीच्या वळणावर पाऊल ठेवतात.
बापू म्हणतात अर्ध्या तयारीने परीक्षेला जाणं म्हणजे स्वत:ची चुकीची परीक्षा घेणं, स्वत:च्या क्षमतेला त्रास देणं. आम्ही नेहमी आमच्या स्वत:च्या चुकीच्या परीक्षा घेत असतो. कारण आमचा कशावरच विश्वास नसतो. आमचा सगळ्यावर तात्पुरता विश्वास असतो. हेमाडपंतानी काका दिक्षित ह्या आपल्या मित्राने साईबाबांविषयी सांगितलेली गोष्ट ऐकली आणि तात्पुरता विश्वास ठेवला. पण मनात आलेल्या विकल्पामुळे काकांच्या बोलण्यावर आणि पर्यायाने साईबाबांवर विश्वास ठेवला नाही. परंतु सदगुरु साईनाथ हा लाभेवीण प्रेम करणारा अकारण कारुण्याचा महासागर हेमाडपंत ह्या चिडीला पायाला दोर बांधून खेचू ईच्छित होता आणि म्हणूनच साईनाथ त्यांना नियमाच्या प्रांतात जाऊ न देता पुन्हा नानासाहेब चांदोरकरांना धाडतात.
बापू म्हणतात मनापासून त्याच्यावर प्रेम करत असाल तर तुम्ही इच्छेच्या प्रांतात येता. तो तुमच्यासाठी पार्शलिटी करतो. हे स्वत:चा शोध घेतल्याशिवाय जमणार नाही.
(२) स्वत:चा शोध घेणे – हेमाडपंताना नानांनी शिरडीला जाण्याचा उशीर का करता असे स्पष्ट्च विचारतात , कोठेही आडपडदा न ठेवतां केव्हां निघणार साईदर्शना | किमर्थ आळस शिरडीगमना | दीर्घसूत्रता कां प्रस्थाना | निश्चिती मनां का नाहीं | (संदर्भ – अध्याय २ – ओवी ११९) . आपण पाहतो की माणसाला स्वता:च्या मनाचाच थांगपत्ता लागणे किती दुष्वार असते आणि येथे नाना ठामपणे हेमाड्पंताना त्यांच्याच मनाची स्थिती सांगून मित्रत्वाचा अधिकारही गाजवतात हा ठामपणा येतो तो केवळ साईंवरच्या ठाम विश्वासातूनच कारण येथे कार्य करतो तो ” बुध्दीस्फुरणदाता साई आणि नानांचा त्यांच्या साईवरील पर्यायाने स्वत:वरील विश्वास.
आता हेमाडपंत येथे स्वत:चा शोध घेतात म्हणजे नानांची आतुरता पाहून स्वत:च्या मनाची उडालेली खळबळ, चंचलता पूर्णपणे मान्य करतात आणि प्रांजळपणे कबूलही करतात आणि मग अर्थातच साईमाउली आपल्या चुकलेल्या बाळाला नानांकरवी बोध घडविते कारण “तुम्ही कोणी ही कुठेही असा काहीही करा एवढे नित्य स्मरा तुमच्या कृतीच्या निरंतरा खबरा मज लागती ” हे तर त्या अंतर्यामी साईनाथाचे बोलच आहेत.
अर्थातच पुढील लीला “तो” लीलाधारी घडवून आणतोच आणि हेमाडपंताचे १ पाऊल “त्या”च्या दिशेने उचलेले जाते…म्हणजेच सद्गुरुमाऊली कशाप्रकारे घटना घडवून आणू शकते, ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पहायला मिळते. आपल्याला पूर्ण प्रयत्न करायचे असतात यश किती द्यायचं हे त्याचं काम आहे. प्रयत्न करणे माझे काम । यशदाता मंगलधाम ॥
जेव्हा हेमाडपंताच्या आयुष्यात ‍गरज + मी = दुर्बलता, दुर्बळ + मी = फालतू, फालतू + मी = अपयशी, अपयशी + मी = नैराश्य हा वृत्रासुराचा अल्गोरिदम काम करत होता फक्त अपयश हाती आले , नैराश्य, विफलता मनात घुसली पण ज्या क्षणी नानांमार्फत मिळालेल्या “त्या साईंवरच्या” विश्वासाचे पाठबळ मिळाले आणि विश्वासू मी + गरज = सामर्थ्य आणि सामर्थ्य कसं तर सतत वाढत जाणारं ह्या अनिरुद्ध अग्लोरिदम आला सर्व काही सुफल झाले आणि मग घडते ती अविस्मरणीय जीवनाचा कायापालट करणारी “धूळभेट” म्हणजेच – “आले हे ह्रुदय चौफाळूनियां त्यावरी बसवू सदगुरुची पाऊले” हीच ती साईनाथांची अगाध लीला!!!
हरी ओम.
अम्बज्ञ !!!