Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Hemadpant,a great devotee)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Hemadpant,a great devotee)

#7466

ketaki. Kulkarni
Participant

Sai the guiding spirit-Hemadpant, a great devotee

हरि ओम

हेमाडपंतांचा प्रवास बघितला तर लक्षात येत कि आधी ते बाबांकडे जायच्या संपूर्ण विरोधात होते, पण ज्या वेळी त्यांनी बाबांना बघितला त्यांनी बाबांची धुळ भेट घेतली. त्या नंतर सुद्धा थोड फार वादावादी होते, पण ज्या वेळी त्यांना बाबा कोण हे लक्षात येते त्या वेळी ते त्यांच्या संपूर्णपणे शरण जातात. कुठल्याही प्रकारची आडकाठी न ठेवता ते बाबांनाच आपला सर्वस्व मानतात.

त्यानंतर एकदाही कधी त्यांच्या डोक्या मध्ये कुतर्क निर्माण झाला नाही. त्यांचा त्यांच्या बाबांवर विश्वास एवढा दृढ झालेला कि आपण बघतो कि जेव्हा होळी पौर्णिमेच्या वेळी बाबा त्यांच्या स्वप्नात येउन सांगून जातात कि मी घरी जेवायला येईल, तेव्हा त्यांचा त्या शब्दांवर संपूर्ण विश्वास असतो व ते जेवणासाठी थांबून राहतात. आणि बाबा छबी रूपाने त्यांच्या घरी येतात, आणि ते सुद्धा कायमचे.

हा असा विश्वास आपण आपल्या गुरु माउली वर कधी ठेवतो का! जरा काही मना विरुद्ध घडल कि लगेच आपल चंचल मन सैरभैर होऊन इकडे तिकडे धावायला लागत. आणि मग आपले बापू सांगतात त्याप्रमाणे दहा ठिकाणी डोकं ठेवायला लागतो . पण आपल्याला तेव्हा हे समजत नसत कि ह्यामधून मिळणार सुख हे शाश्वत नाहि. आणि मग त्याच दलदली मध्ये आपण खोलवर रुतत जातो.

आणि ह्यासाठीच आपल्याला गरज असते ती हेमाडपन्तांप्रमाणे आपल्या गुरुमाउली प्रती संपूर्ण शराण्य!

काही हि होवो हा विश्वास पाहिजे कि त्यामध्ये मझा गुरूची इच्छा आहे, आणि त्याच बरोबर गुरूने केलेली आज्ञा पाळणे, ते सांगतात तस वागायचा प्रयास करणे.
प्रत्येक गोष्ट करताना “माझा बापू माझाकडे बघतोच आहे, त्याला कळत नाही अस ह्या जगात काहीच नाही” हा विश्वास दृढ करत जायला पाहिजे.
माझी नंदाई, मोठी आई, माझी प्रेमळ अनसूया आई हि सतत माझ्या सोबत आहेच अगदी प्रत्येक क्षणाला आणि तीचा प्रेम सतत माझ्यावर ओसंडून वाहतच आहे हि खात्री असणे,
हा सतत येणारा प्रेमाचा प्रवाह कधीही थांबू नये ह्यासाठी प्रयास आपल्यालाच करायला पाहिजे, कारण बापू म्हणतात तस श्वास हा आपल्यालाच घ्यावा लागतो, भूक लागली कि अन्न हे आपल्यालाच खाव लागत.…

शेवटी एकच गोष्ट महत्वाचि…

बापू पायी ठेऊ एकविध भाव
नको धावाधाव अन्य कुठे

नको येरझार्या बहु मुर्तिपाशि
अनिरुद्ध एकची भार वाही

बापू माझ तुझ्यावरच प्रेम कायम वाढतच ने आणि तुझा वरचा विश्वास कधीही डगमगू नको देउस हीच तुझ्या चरणी प्रार्थना…

अम्बज्ञ
I love you my Dad forever.

Ketakiveera Kulkarni
Dombivli East Upasna Center