Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Hemadpant and Sainiwas)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Hemadpant and Sainiwas)

#7431

Aniketsinh Gupte
Participant

Sai the guiding spirit-Hemadpant and Sainiwas

हेमाडपंत….हे नाव जरी ऐकलं कि समोर येते ते म्हणजे साई सत्चरित्र(Shri Saisatcharit), वांद्रे येथील साईनिवास(Sainiwas), बाबांची ती तस्वीर. असे काही चित्र आपोआप डोळ्यांसमोरून पटकन निघून जातात. इथे संदीपसिंह, हर्षसिंह, अंजनावीरा, केतकीवीरा ह्यांनी आधीच इतक्या सुंदररित्या विचार मांडले आहेत कि पुढे काय लिहावे ह्याचाच विचार करावा लागतोय. हर्षसिंह ह्यांनी उपस्थित केलेला ‘का’ हा प्रश्न आपण खरच स्वतःला विचारायला हवा. आपण फक्त पारायण करतो, वाचन करतो पण हा प्रश्न कधीच विचारात नाही. हेमाडपंतच का? त्यांच्या गुणांची यादी आधीच उत्कृष्टपणे मांडलेली आहे म्हणून ती परत इथे टाकत नाही. पण साई सत्चरित्र वाचणाऱ्या कोणत्याही भक्ताला जर हा प्रश्न पडलाच तर त्याचे उत्तर हा ग्रंथच देतो. शिर्डी ला जाण्याचे ठरवणे, मग विकल्प येणे, पुन्हा शिर्डीला जाण्याची संधी येणे ह्यावरून ही त्याचीच लीला हे तर स्पष्ट होतंच, पण ”यदृच्छेने जे जे घडणार असेल, ते ते सुख वा दुःख भोगू – गुरुच्या कडे जाऊन काय होणार आहे?” असा विचार करणारी व्यक्ती अगदी पहिल्याच भेटीत (ज्याने कधी साई ला बघितला देखील नव्हते) एकदम धूळभेट घेतात. अशी क्रिया करणारी व्यक्ती कधी साधारण असू शकते का? पहिलीच भेट आणि तीही सरळ धूळभेट !! कसला हि पुढचा मागचा विचार न करता हि कृती हेमाडपंत करतात. एक involuntary हालचाल. ज्याला विचार करावा लागत नाही. श्वास घेताना आपण विचार करत नाही, इथेहि असाच काहीसं. म्हणजेच हेमाडपंतच्या आयुष्यात, त्यांच्या ‘शैल-धी’ मधून साईने ‘शीर-धी’ मध्ये कधीच प्रवेश केला होता.हाच तो अशी ओळख पटवून घेण्याची पाळी फक्त ह्यांच्यावर होती.….
आणि ती ओळख पहिल्याच भेटीत झाली. त्यांनी सर्व विचार बाजूला सारून साईला आपलंस केलं. हीच एका उत्तम भक्ताची खूण. अश्या ह्या भक्तास, ज्याने त्यांच्या अथक परिश्रमाने आपल्याला साईंचा हा अफाट खझिना मोकळा केला त्यांना मनापासून वंदन आणि त्रिवार अंबज्ञ.