Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२Sai the guiding spirit-Hemadpant a journey full of Bhakti

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२Sai the guiding spirit-Hemadpant a journey full of Bhakti

#7546

Ajitsinh Padhye
Participant

Sai the guiding spirit-Hemadpant a journey full of Bhakti.

हरि ॐ दादा. हेमाडपंतांचा विषय घेऊन तुम्ही पुन्हा एकदा ह्या श्रेष्ठ भक्ताबद्दलचा तुमचा भक्तियुक्त आदर व्यक्त केलात आणि तुमचे विचार मांडून आम्हा सर्वांच्या मनातही तो आदर वृद्धिंगत केलात, त्याबद्दल मनापासून अंबज्ञ. संदीपसिंह, अंजनावीरा, केतकीवीरा आणि इतर सर्वांनी पोस्ट केलेले त्यांचे त्यांचे विचारही खूप भक्तिप्रधान आहेत. श्रीराम.

दादा, तुम्ही सुरुवातीला जे ३ मुद्दे मांडले आहेत, तेच मला खूप भावले:
(१) हेमाडपंत ‘रेसिडेंट मॅजिस्ट्रेट’ म्हणून काम करत होते; म्हणजेच ते ‘उच्चपदस्थ’ होते.
(२) हेमाडपंत साईनाथांकडे जाण्याचे श्रेय काकासाहेब दीक्षित व नानासाहेब चांदोरकर यांना देतात. (संदर्भ अ.२/ओ. १०१)
(३) हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे येण्याच्या वेळेस कशी होती? तर अतिशय उद्विग्न.

(१) समीरदादांनी लिहील्याप्रमाणे हेमाडपंतांच्या कथा वाचताना, ते ‘उच्चपदस्थ’ होते हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. हेमाडपंत उच्चपदस्थ होते ह्याचाच अर्थ ते उच्चशिक्षित असणारच. अशा ‘उच्चपदस्थ’ व ‘उच्चशिक्षित’ व्यक्तीला त्यांच्या एका मित्राने (काकासाहेब दीक्षित) त्याच्या सद्गुरुंबद्दल माहिती सांगितल्यावर, हेमाडपंतांनी त्या मित्राची हेटाळणी केली नाही. शांतपणे त्या मित्राचे ऐकून घेतले, त्याच्यावर प्रथमत: विश्वास ठेवला. इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात येतो की हेमाडपंत ‘उच्चपदस्थ’ असले तरी ते विनम्र होते, त्यांचे पाय जमिनीवर होते. नाहीतर एखाद्याने ऐकताच अविश्वास दाखविला असता, मित्राच्या बोलण्याची खिल्ली उडविली असती. काकासाहेब दीक्षितांचे बोलणे ऐकल्यावर हेमाडपंतांनी शिर्डीला येण्याचे निश्चितही केले.
मात्र त्यानंतर हेमाडपंतांच्या एका दुस-या मित्रावर वाईट प्रसंग येतो. त्या मित्राचा एकुलता एक, सुदृढ, गुणवंत असलेला मुलगा शुद्ध हवेच्या ठिकाणी वास्तव्य असतानाही अचानक ज्वराचे कारण होऊन मरण पावतो. त्याआधी अनेक मानवी उपाय करून सुद्धा, त्या मित्राच्या गुरुंनाही मुलाच्या जवळ आणून बसवलं जाऊन सुद्धा तो मुलगा मरण पावतो. मग अशा वेळेस, ज्या हेमाडपंतांनी साईनाथांना पाहिलेलेही नाही, नुसत्या ऐकीव माहितीवर त्यांनी साईनाथांकडे जाण्याचा निश्चय केला आहे, अशा हेमाडपंतांच्या मनात सद्गुरुतत्वाबद्दल विकल्प येणं साहजिकच आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे हेमाडपंत कुठेही साईनाथांचे नाव घेऊन दोष देताना आढळत नाहीत. समीरदादांनी लिहील्याप्रमाणे हेमाडपंतांना ‘गुरुविषयी’, म्हणजेच ‘गुरुतत्वाबद्दल’ विकल्प निर्माण होतो, आणि हेमाडतांच्या मनाची अवस्था बघता हा विकल्प येणं स्वाभाविकच आहे…आणि म्हणूनच दयाघन साईनाथ हेमाडपंतांसमोर नानासाहेब चांदोरकरांमार्फत दुसरी संधी उपलब्ध करून देतात आणि इथे मात्र हेमाडपंत संधीचे सोने करतात.
परमपूज्य बापूही आपल्याला प्रवचनात वारंवार सांगत असतात, की आलेली संधी कधीही फुकट घालवू नका. सद्गुरु कायम जीवनात असेच प्रसंग वारंवार उभे करतो की ज्यामुळे जीवनात आपलं भलं होईल, मात्र संधीचा फायदा करून घेणं की आलेली संधी गमावून बसणं हे मात्र आमच्याच हातात असतं. अंबज्ञ, श्रीराम.
– अजितसिंह पाध्ये, खार