Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Hemadpant)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Hemadpant)

#7465

Sai the guiding spirit-Hemadpant

हरी ओम दादा,

साई-द गाइडिंग स्पिरिट या फोरमची सुरुवात केल्याबद्दल खूप खूप श्रीराम

श्री साई सच्चरित्र रचनाकार हेमाडपंत यांच्याबद्दलची माहिती सर्वात आधी जाणून घेणे खरचं खूप महत्वाचे होते.
गुरु काय करिती कर्मासी म्हणजेच प्रारब्धकर्मप्राबल्यता ही मानवाच्या जीवनात त्याच्या गुरूच्या सानिध्यात जाण्याच्या मध्ये येत असते. येथे मानवाचा अहंभाव कारणीभूत ठरतो.

हेमाडपंतांना दोन व्यक्तींनी साईनाथांकडे येण्याचा आग्रह केला म्हणजेच त्यांना दोन वेळा गुरूकडे जाण्याच्या संधी प्राप्त झाल्या.

गुरु स्वतः त्याच्या बालकाला जवळ बोलावत असतो. परंतु आपण आपल्याच कर्माने या संधी दवडत असतो. तरी गुरु आपल्या बालकावर न रागावता, न दूर ढकलता ” तो” त्याच्या बालकाला त्याच्याजवळ बोलावण्याचे अनेक मार्ग तयार करत असतो.

गुरुपासून आपण कसे लांब पळत असतो याचे उत्तम उदाहरण स्वतःद्वारे दिले आहे

आपल्या आयुष्यात पण अशा अनेक संधी “तो” तयार करतो त्याच्या जवळ जाण्यासाठी. पण आपण जे होत आहे ते “त्याच्या” इच्छेनेच असे न समजता , न मानता, आपल्या सोबत जे काही होत आहे त्यात गुरु करणार ? हे माझ्या कर्माचे भोग आहेत. आणि मला कोणत्याही गुरूची गरज नाही असे म्हणत बसतो .

पण “तो” अशा संधी, परस्थिती निर्माण करतो कि आपण अपोआपच निश्चांक मनाने त्याच्या जवळ जातो . आपल्यासाठी काय योग्य अयोग्य, कधी की द्यायचे आणि घ्यायचे हे जाणणारा माझा “तो” सर्वसमर्थ आहे.

यावरून सुंदर अभंग पंक्ती आठवतात

झोपलो होतो ढोंग करुनी
बहिराही झालो होतो बोळे घालूनी
कवाडे बंद होती चारी बाजूनी
तरी कसा बापू माझा येतची राहिला
बापूला माझ्या प्रेमाची तहान
बापूला माझ्या भक्तीचीच भूक

खरचं या ओळींचा अनुभव आपण सगळेच बर्याच वेळा घेत असतो . सहज, सरळ , सोपं असतानाही आपण आपल्याच कर्माने ते अवघड करून घेतो.

आपण जरी कान बंद करून बसलो कि गुरुबद्दल काहीच ऐकायचे नाही तरी “त्याचे” गुणसंकीर्तन कानी पडणार नाही असे कधीच होत नाही.

झोपलेल्याला जाग करता येत पण झोपेच सोंग घेतलेल्याला जाग करता येत नाही. असचं आपले होत असते. गुरु कडे जाण्याच्या अनेक सुसंधी आपण डावलत असतो. त्यापासून दूर जाण्याचा निष्फळ प्रयत्न करतात असतो. पण आपल्यावर निरंतर प्रेम करणारी मोठी आई आणि तिचा पुत्र आपल्या या अज्ञान , अविश्वास रुपी झोप मोडतोच. ते हि आपल्या भल्यासाठी .

जेव्हा आपण त्याच्या कुशीत जातो तेव्हा होणारा आनंद , समाधान , शाश्वती याची जाणीव देखील तोच करून देतो. आपण किती अनमोल संधी दवडल्या गुरुकडे येण्यासाठी याची जाणीवच आपल्याला अधिकाधिक गुरु जवळ घेऊन जाते .

अंबज्ञ

मामा , तुमच्या पुढील पोस्टची आम्ही सर्व अनिरुद्ध धून मेम्बेर्स अतुरेतेने वाट पहात आहोत

i love u my dad

all is well when you are there for us Ambadnya

Shraddhaveera Dalvi.