Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Hemadpant)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Hemadpant)

#7471

Pranilsinh
Member

Sai the guiding spirit-Hemadpant

हरि ॐ…
आज पुन्हा बापूंना अंबज्ञ आज परत काही सुचवलसं…
हा ग्रंथच असा आहे की लांब जावसं वाटणारचं नाही…. अंबज्ञ…
“हेमाडपंताना बाबांनी करून दिलेला अनुग्रह…..”
बाबांनी हेमाडपंताना माधवरावांकडे जाऊन १५रू
दक्षिणा आणायला पाठवतात.
त्यानुसार ते माधवरावांकडे गेले असता माधवराव नुकतेच स्नान
करून नित्यपुजा करत
असतात. हेमाडपंतांना पाहून ते त्यांचे आदरतिथ्य करून
साईंच्या गोष्टी सांगू
लागतात.
** दोन श्रध्दावान एकत्र आले तर ते १०८% साई बापूंविषयीच
बोलतात.
बोलता बोलता माधवराव हेमाडपंतांना देशमुखीण
बाईंची कथा सांगतात. वयाने वृद्ध
असलेल्या देशमुखीण बाईं शिरडीत येतात आणि बाबांकडे कानमंत्र
द्या असा हट्टच
धरतात. जोपर्यंत कानमंत्र मिळत नाही तोपर्यंत अन्न
पाण्याला शिवणारचं नाही असं
ठरवतात. मग शामा बाबांना जाऊन सांगतात की, बाबा म्हातारीवर
कृपा करा. उगाच
वृद्धापकऴाने मृत झाली तर साईदर्शनाला आली आणि मरण
पावली अस लोकं म्हणतील..
आपल्या परमेश्वराला कोणत्याही गोष्टीने गालबोट लागू नये
म्हणून सतत काळजी
घेणारा “शा”=शाळा “मा”=मास्तर.
शेवटी बाबांनी तिला समजावलं.. “अगं आई, काय गं तू असा हट्ट
धरला आहेस? का गं
आपल्या जीवाचे हाल करून घेत आहेस::?”
“मलाचं माझ्या गुरूने कधी कानमंत्र नाही दिला मग
मी तुला काय कानमंत्र देऊ?”
नेहमी श्रद्धा(समीरदादा= बापू हा एकच लक्ष्य)
आणि सबूरी(सुचितदादा= बापूचं
सगळं नीट करणार हा विश्वास मनात जागृत करणारा) ठेव.
त्याचाच फायदा आयुष्यात
परमार्थ साधण्यासाठी होतो. श्रद्धा व
सबूरी ह्या सख्ख्या बहिणी आहेत.फक्त
गुरूचे मुख आवडीने पहावे. त्यातच सगळ्या जगाचे सुख आहे
हा ठाम विश्वास असला
पाहिजे.
** अमृताहूनी गोड नाम तुझे देवा…!
** मनामध्ये वसे ज्याच्या अनिरूद्धानाम, चोहो बाजूं रक्षा करे
अनिरूद्धराम !
** तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख,
पाहीन श्रीमुख आवडीने…!
ज्याप्रमाणे कासवी पिले पलीकडे असूनही अलीकडूनही फक्त
नजरेने पिलांना बळ पुरवत
असते तेच बळ, तीच तृप्तता गुरूच्या मुखावलोकनातून मिळते.
साईवचन=
“तू मजकडे अनन्य पाही!
पाहीन तुजकडे तैसाची मी.! ”
(अध्याय १९वा, ओवी ७३)
अनन्य= माझ्यावाचून(बाबा) दुसरा कोणीही नाही फक्त लक्ष्य
एकच “साई”.
आपला ज्याप्रमाणात भाव, प्रेम त्याचप्रमाणात
देवाची कृपा आपल्यावर होतचं असते.
आणि कधी एक दिवस आपण देवाकडे पाहण्यास
विसरलो तरीही “तो” आपल्याकडे अकारण
कारूण्यामयी नजरेने पाहतचं असतो.

त्यासाठी आपला विश्वास गाढा असला पाहीजे.
“एक विश्वास असावा पुर्ता।
कर्ता हर्ता गुरू ऎसा।”
(अध्याय १९वा, ओवी ७४).
मग बाबा दक्षिणेची आठवण करतात
तेव्हा माधवरावांनी सांगितलेल्या देशमुखीण
बाईंची गोष्ट हेमाडपंत बाबांना सांगतात.हेमाडपंत म्हणतात.. खरचं
ती कथा ऎकताना
मी स्वतःला त्या कथेत पाहत होतो. बाबांची केलेली ही एक
लीला होती. बाबांनी
त्यांना विचारलं, मग किती गोष्ट आत्मसात केलीस?
गुरूंची सवयचं असते शिष्याला नीट समजलं का ते परत परत
विचारण्याची, हे
दिसून येते.
मग जोगांनी अर्पिलेली खडीसाखर मूठभर घेऊन
हेमाडपंतांच्या हातात देऊन आशीर्वाद
दिला की, ह्या साखरेप्रमाणेच तुझे आयुष्य असेच गोड होइल.
आणि खरचं हेमाडपंतांचं आयुष्य मधूर झालं. त्यांचं नाव
सुवर्णाक्षरात साईपदी
आणि साईभक्तांच्या मनी लिहीला गेला.
त्यांचीच नातसून असलेल्या आपल्या मीनावैनीचं उदाहरण इथे
आवर्जून द्यावसं
वाटतं…
त्यांनीच म्हटलयं ना…
“गोड झालं मनं माझं, गोड झालं जीवन।
बापू बापू म्हणताना उरात फुलला ऊस।। ”
(“मी”= मीपणा, “ना”= नसलेल्या)
ऊसापासूनचं साखर बनते. ही साखर तर साक्षात साईंकडून
पूर्वापार ह्या घरात आलेली
आहेच.
बापू बापू हाच सतत जप करत संपूर्ण आयुष्य
मीनावैनींनी अमृतमृयी केल.
“आता कैसी अमावस्या नित्य अनिरूद्ध पौर्णिमा ।”…
अंबज्ञ…

I love you my DAD….

प्रणिलसिंह टाकळे
तेलगु उपासना केंद्र, दादर