Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-hemadpant)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-hemadpant)

#7547

Sai the guiding spirit-hemadpant

अंबज्ञ अजितसिंह मला तुमचे म्हणणे पूर्णपणे पटले. खरच हेमाडपंतांना जाणून घ्यायचे असेल तर दादांनी मांडलेले पहिले तीन मुद्दे आधी ध्यानात घेतले पाहिजेच. मला हे देखिल पटले की हेमाडपंतांना जेव्हा त्यांच्या मित्राने बाबांबद्द्ल सांगितले तेव्हा त्यांनी या मित्राची हेटाळणी केली नाही.

हेमाडपंतांबद्दल विचार करताना मला नेहमी एक गोष्ट बेस लेव्हलला दिसते ती म्हणजे ते गुरुचरित्राचे ४० वर्षे पारायण करत होते. म्हणजेच त्यांना गुरुची / सदगुरुंची अनामिक आणि त्यांनी कधीही दाखविली नसावी अशी ओढ असावी. सदगुरुतत्त्वावर त्यांचा विश्वास होता आणि त्या सदगुरुच्या त्यांच्या आयुष्यातील प्रवेशासाठी ते चातका प्रमाणे तळमळत असावे. कारण या तळमळीशिवाय पहिल्या भेटीतच कुणीही “धुळभेट” घेऊ शकत नाही असे मला वाटते.

गुरु बाबत त्यांच्या मनात विकल्प आला. हे १०० टक्के. परंतु खर्‍या सदगुरुच्या दिशेनेच आपले पाऊल पडावे आणि कोणत्याही भोंदू बाबाच्या फंदात पडू नये यासाठी ते दक्ष असावेत अस मला वाटले. साईनाथांबद्दल जेव्हा कळले तेव्हा त्यांच्याकडे जाण्यासाठी त्यांनी वेळ घेतला असावा. जाऊ की नको या व्दंव्दमध्ये ते अकडले असावेत….आणि हे व्दंव्द साक्षात साईनाथांनी सोडविले असे मला वाटते. त्यांच्या मनात गुरुतत्त्वाबद्दल काही शंका असावी अस वाटत नाही. पंण आपण ज्या साईबाबांकडे जाणार आहोत ते नक्कीच आपल्याला हव असलेले अंतिम स्थान आहे का? या बाबत साशंक असावेत.

असे आपले देखील होते. अगदी सामान्य भक्ताचेही होते. बापूंकडे येण्याआधी येऊ की नको, यास सदगुरु मानू की नको अशी व्दीधा अवस्था असते.

पण बापूंना पाहिल्यावर ही व्दीधा अवस्था विरुन जाऊन आयुष्याची समिधा कधी होते हे त्या भक्ताला ही कळत नाही.

यावरुन मला एक गोष्ट कळते की हेमाडपंत कीतीही श्रेष्ठ भक्त असले तरी त्यांच्या प्रवास एखाद्या सामान्य भक्ताप्रमाणे विकल्पाचा अडथळा पार करुनच झाला. हा विकल्प ते मनातून सक्षमपणे काढू शकले

एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे पहिल्या धुळभेटीपासून ते लेखणी ठेवेपर्यंत त्यांचा विश्वास हा पूर्ण होता. पूर्ण १०८ टक्के.

खर तर काय लिहू नी काय नाही अस झाले आहे. परंतु खरच दादांनी दिलेल्या एकेका पॉईंटनुसार विचार केल्यास हेमाडपंत या भक्ताचे नवनवीन पैलू उलघडतील हे नक्कीच.