Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai-the guiding spirit Hemadpant)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai-the guiding spirit Hemadpant)

#7642

Ajitsinh Padhye
Participant

हरि ॐ सुनितावीरा. तुमची पोस्ट खूप सुंदर आहे. तुम्ही जे बापूंचे बोल लिहीले आहेत, ते खरोखर आपल्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहेत. “आयुष्याला दिशा द्यायची असेल, तर विचारांना शिस्त हवी. शिस्तबद्ध विचार करण्याची सवय स्वतःला लावून घ्यायची. त्याने आपलं आयुष्य बदलतं.” ही शिस्त हेमाडपंतांना(Hemadpant) होती, म्हणूनच ते पहिल्या विकल्पातून बाहेर येऊन दुसरी संधी मिळताच साईदर्शनाला शिर्डीस(Shirdi) प्रयाण करते झाले असे मला वाटते.
आणि म्हणूनच केतकीवीरांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहील्याप्रमाणे नुसत्या गहू दळण्याच्या कथेवरून हेमाडपंतांनी साईनाथांचे असामान्य सामर्थ्य ओळखले व श्रीसाईसच्चरित लिहीण्याचा विचार त्यांना सुचला आणि त्यांनी ह्या ग्रंथाच्या रूपात आपल्या सर्वांसाठी एक अमूल्य ठेवा दिला…त्यांचंही आयुष्य बदललं आणि ह्या ग्रंथाने असंख्य श्रद्धावानांचं आयुष्य बदललं.
आता पूज्य समीरदादांनी हा विषय सुरू करताना तिसरा मुद्दा जो मांडला आहे, तो आपण बघूयात.

(३) हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे येण्याच्या वेळेस कशी होती? तर अतिशय उद्विग्न.

विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा पहिल्यांदा काकासाहेब दीक्षितांकडून (Kakasaheb Dixit) हेमाडपंतांनी साईनाथांचा महिमा ऐकला, तेव्हा त्यांच्या मनात गुरुतत्वाबद्दल विकल्प नव्हता. तेव्हा त्यांनी जितक्या शांतपणे साईनाथांबद्दल ऐकून घेतले, तितक्याच शांतपणे त्यांनी दुस-या वेळेस, मनात विकल्प असतानाही (उद्विग्न स्थितीत) नानासाहेब चांदोरकरांकडून साईनाथांची(Sainath) माहिती ऐकून घेतली. त्याचप्रमाणे त्याच उद्विग्न स्थितीत त्यांनी शिर्डीस प्रयाणही केले. ह्या संदर्भात समीरदादांनी जो त्यांच्या पोस्टमध्ये मुद्दा मांडला आहे तो अतिशय apt आहे असं मला वाटतं. समीरदादा म्हणतात, “हेमाडपंतांनीही मोकळ्या मनाने, प्रांजळपणे नानासाहेबांची आतुरता बघून अत्यंत शरमेने मनाची झालेली चंचलता नानासाहेबांना निवेदन केली. साईनाथांच्या स्फूर्तीने नानासाहेबांनी अत्यंत तळमळीने, प्रेमाने हेमाडपंतांच्या सर्व शंकांचे निरसन करून, हेमाडपंतांकडून ‘तत्काळ निघतो’ असे वचन घेतले.
म्हणजेच इथे हेमाडपंतांना “मनात विकल्प आला” ही चूक मान्य आहे आणि ही चूक ते “प्रांजळपणे” कबूलही करतात. आपल्या मित्रासमोर “मी चुकलो” हे म्हणण्याची हेमाडपंतांसारख्या उच्चपदस्थ व उच्चशिक्षित व्यक्तीला जराही लाज वाटली नाही हे खालील ओव्यांमधून स्पष्टपणे जाणवते.
पाहूनि नानंची आतुरता I मीही शरमलों आपुले चित्ता I
परी मनाची झालेली चंचलता I पूर्ण प्रांजळता निवेदिली I

आणि मग हेमाडपंत पुढे सांगतात,
त्यावरी मग नानांचा बोध I कळकळीचा प्रेमळ शुद्ध I
परिसतां शिरडीगमनेच्छोद्बोध I अति मोदप्रद जाहला I

जर हेमाडपंतांनी “शरमेने”, “प्रांजळपणे” “मनाची चंचलता” चांदोरकरांना सांगितली नसती, तर चांदोरकरांनी कदाचित तेवढ्या “कळकळीने”, प्रेमळपणे” हेमाडपंतांची समजूत काढली नसती.
बापू आपल्याला नेहमी सांगतात, “जीवनात परमेश्वराशी वागताना कधीही “मुखवटे” घालून फिरू नका. जो “मुखवटे” काढून “जसा आहे तसा” परमेश्वरासमोर उभा राहतो, त्याच्या चुकांची जाणीवही परमेश्वर त्याला करून देतो आणि चुकांना क्षमाही करतो.” हेमाडपंतांनी श्रीसाईनाथांच्या छत्रछायेत असणा-या एका श्रेष्ठ भक्तासमोर “जसे आहे तसे” आपल्या मनातील चंचलता (विकल्प) बोलून दाखवली आणि म्हणूनच “‘बुद्धिस्फुरणदात्या” श्रीसाईनाथांनी चांदोरकरांना हेमाडपंतांचे विकल्प काढून टाकण्याची बुद्धी दिली असे मला वाटते.