Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Hemadpant)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Hemadpant)

#7967

Naina Tushar
Participant

Sai the guiding spirit-Hemadpant

हरी ओम दादा आणि आम्हाला आमचे विचार मांडायची संधी दिल्याबद्दल अम्बज्ञ ….

हेमाडपंत (Hemadpant)म्हटले कि पहिले दिसतात साईबाबा आणि ती धोपट वाट ज्या वाटेवरून चालून सर्व साई भक्तांनी (Sai devotee) त्यांच्या आयुष्याचे सोने केले. त्याच वाटेवरून मीना वैनी (Meena Vaini) आणि चौबळ(Chaubal) आजोबा चालले, त्यांना त्यांचा साई मिळाला तो या साई सच्चरित (Shree Saisatcharit) मधुनच.

हेमाडपंत हे उच्च शिक्षित होते त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा प्रत्यय आपल्याला ग्रंथ वाचताना येतोच येतो त्यांना प्रत्येक वेद पुराणांचे सखोल ज्ञान होते. पण त्याचा गर्व त्यांना मुळीच नव्हता. भक्ती करताना देखील ती भक्ती डोळस असावी हे त्यांच्याकडे बघितले कि आपल्या लक्षात येते त्यांना त्यांच्या मित्रांनी सांगितले साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी चाल म्हनुन.मित्र प्रेमापोटीच ते निघाले सुद्धा पण त्याच वेळी त्यांच्या मित्राचा मुलगा मरण पावला अगदी त्याचा गुरु त्याच्या जवळ बसलेला असताना सुद्धा हे घडले असे झाल्यामुळे त्यांनी साई बाबांकडे (Saibaba) जाण्याची टाळाटाळ केलि. पण साई माउली अत्यंत कृपाळू त्यांनी हेमाडपंतांना पुन्हा एकदा नानासाहेबांकडून बोलावणे पाठवतात .
इथे नानासाहेब हेमाड पंताना बोलवायच्या हेतूने मुळीच गेले नव्हते तरीही ती “त्याची” इच्चा होती कि त्याच्या बाळाला त्यांना बोलवायचे होते त्यांच्या जवळ ….
म्हणून तो बुद्धीस्फुरणदाता साई नानासाहेब यांच्या कडून हेमाडपंताना निरोप पाठवतात. जेव्हा हेमाड पंत शिर्डीला जातात तेव्हा ते नकळतच धुलभेत घेतात, का? तर त्याने त्याची खून पटवून दिलेली असते म्हणून ….
त्यानंतर पण ते सद्गुरु कशाला हवा?यावरून वाड्यात वाद घल्तत. पण ते सुद्धा साईना कोणीही न सांगता देखील कळते आणि त्यावरूनच त्यांचे नाव “हेमाडपंत” असे बाबा ठेवतात आणि ते देखील तेवढ्याच प्रेमाने ते धारण सुद्धा करतात. पूर्ण ग्रंथ आणि ग्रन्थतील प्रत्येक ओळ नव्हे प्रत्येक अक्षर हेमाड पंतांचे बाबांवरील प्रेम अनुभवून देतो जसा एकाध रसाळ आंबा आपण खात आहोत आणि त्याची आयुष्यभर आपल्या रेंगाळत रहते. प्रत्येक ओवी मध्ये त्यांनी एवढे माधुर्य भरले आहे कि कोणीही बाबांच्या प्रेमात पडेल. सद्गुरु वर कसे प्रेम करावे? तो कसा असतो हे सर्व आपल्याला त्यांच्या कडे बघून समजते.
एवढा मोठा ग्रंथ लिहिताना त्यांनी “मी” पना बाबांच्या चरणी अर्पण केला जिथे जिथे त्यांच्या कडून मी लिहिले गेले तिथे तिथे त्यांनी लगेच आपला मीपणा काबुल केला आणी लगेच तो बाबांच्या चरणी अर्पण केला.
खरच म्हणूनच बाबांनी त्यांना निवडले आणि बोलावून घेतले कारण जरी मी त्याला विसरलो तरी तो मला कधीच विसरत नसतो .

त्याचा धर्म प्रेम प्रेम आणि फक्त प्रेमच …।