Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२( Sai the guiding spirit – Hemadpant)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२( Sai the guiding spirit – Hemadpant)

#8220

Sachinsinh Varade
Participant

Sai the guiding spirit – Hemadpant

हरी ओम मामा
सर्वात प्रथम तुम्हाला आणि सुचितमामांना वाढदिवसाच्या अनिरुध्द अनिरुध्द शुभेछा….
पुन्हा नव्याने या आम्हाला विचार करायची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही सर्व धून मेंबर अंबज्ञ आहोत.आज खूप दिवसांनी बापूंनी लिहायला सुचवलं त्याबद्दल मी अंबज्ञ आहे.

केतकीवीरा कुलकर्णी, संदीपसिंह महाजन,श्रद्धावीरा दळवी आणि प्रनिलसिंह टाकळे यांनी खूप सुंदर रित्या आपली मते मांडली आहेत

परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग हा परमेश्वरच स्वतः आपल्याला दाखवत असतो.म्हणजेच हा परमेश्वर आपल्या आयुष्यात त्याच्या जवळ जाण्याची संधी प्रत्येकाला देत असतो,अगदी पाप्यालासुद्धा हि संधी तो देतच असतो.पण आपण तर श्रद्धावान आहोत आणि बापू श्र्द्धावानासाठी भेदभाव करतच असतो. मग परमेश्वराकडे जाण्याच्या मार्गात आपल्यासाठी हा बापू भेदभाव करणारच ,अगदी १०८%!!!!!

हा भेदभाव कसा ?? तर बापूला आपल्या बाळांना या भक्तिमार्गात मार्गक्रमण करताना होणारा त्रास,मार्गात येणारी अडचणे सगळी माहित आहेत.आपण कुठे हताश होतो,कुठे थकतो,कुठे आपला विश्वास कमी पडतो,कुठे आपल्याला मार्ग सुचत नाही हे सगळ त्याला माहित आहे म्हणूनच त्याने या अडथळ्यातुनहि आपण सहज बाहेर पडाव म्हणून खास आपल्यासाठी सुंदर सुंदर उपाययोजना करून ठेवल्या आहेत.
आपल्या बापूने आपल्या आयुष्यात त्याच्या जवळ जाण्याची संधी आधीच दिलेली आहे आणि आपण त्या संधीचा सोन करायचा पुपेपूर प्रयत्न पण करत आहोत .परंतु आपल्या या प्रवासात आपल्याला काहीच अडचण येऊ नये म्हणून आपला बापूच अगणित प्रयास करत आहे.

१.श्रीमद्पुरुशार्थ ग्रंथराज
२.श्रॆसाइसच्चरित्र पंचशील परीक्षा
३.गुरुमंत्र
४.मातृवात्सल्यविंदानम्
५.उपनिषद
६.श्रीस्वस्तिक्षेम संवाद
७.त्रिविक्रम जल

या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी बापूंनीच आपल्या हातात दिलेलं शस्त्रच आहे.मग संकटाच्या वेळेस ह्या शस्त्रांचा योग्य वापर आपल्याला करता यायला पाहिजे.
मग ह्याचा वापर तरी मी कसा करणार????
बापूंनी आपल्याला ग्रंथाराजात अगदी स्पष्ट सांगितलं आहे

हरी ओम
मी कोण आहे?
मी योद्धा आहे आणि ज्याला ज्याला आपल्या प्राराब्धशी लढायचं आहे
त्याला युद्धकला शिकविणे हा माझा छंद आहे.

हि युद्धकला शिकणे म्हणजेच बापूंच्या प्रत्येक शब्दाच पालन करणे.आपण कितीही चुका केल्या तरी तो आपल्याला या युद्धकलेत नापास अजिबात करत नाही.उलट इथे पण start wherever you are and whatever you have च्या रूपाने आपल्यासाठी बापूने patiality केलेली आहे.

उपनिषदात आपल्याला ठणकावून सांगतो कि ह्या वृत्रासुर,महिषासुर अशे अनेक दैत्य चान्डीकाकुलासाठी कस्पटासमान आहे.अहो मग या भक्तिमार्गात येणारे तर्क कुतार्काचे काटे आपल्या चनडिकाकुलासमोर काहीच नाहीत.

तू आणि मी मिळून शक्य नाही अस या जगात काहीच नाही.

एकदा का आपण त्याचे शब्द आपल्या जीवनात उतरवले कि मग आपल्यासाठी अशक्य अशी काहीच गोष्ट राहणार नाही.मग या भक्तिमार्गावर हा आपला प्रवास अनिरुद्ध गतीने होऊ लागेल.

मी अंबज्ञ आहे.

सचिनसिंह वराडे.
कल्याण(पूर्व) उपासना केंद्र