Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Sai the guiding spirit -Hemadpant)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Sai the guiding spirit -Hemadpant)

#8245

Harsh Pawar
Participant

Sai the guiding spirit -Hemadpant

लागुदे व्यसन आम्हा गुणसंकीर्तन
होऊदे तेची आमुचे तप-साधन
स्थिरावेल त्यानेची चंचल मन
अनिरुद्ध अमृताचे नित्य प्राशन !

साईसच्चरित अति गहन
करू त्याचे नित्य स्तवन
आयुष्याचे भार-वजन
करू की साईचरणी अर्पण !

गुणसंकीर्तने येई आनंद लहरी
चराचरात साई तर अनिरुद्ध सर्वोपरी
उठता-बसता कोणत्याही प्रहरी
सदैव स्मरणी असे आता श्रीहरि !

अनिरुधच कृपासिंधु साईनाथ
तोची आमुचा शंकर केदारनाथ
तोची आमुचा सदेह लक्ष्मीकांत
तोची अमुचा आजन्म सिद्धांत !!!

श्री राम
मी आंबज्ञ आहे !!
~ हर्ष