Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Sai the guiding spirit-Gravity)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Sai the guiding spirit-Gravity)

#8405

ketaki. Kulkarni
Participant

Sai the guiding spirit-Gravity

आपल्या मधे अहंकार येतो तो कधी? त्याच अजुन एक कारण म्हणजे जेव्हा मला माझ्या सद्गुरुचा धाक नसतो.

काही दिवसांपूर्वीच Gravity movieचे trailers बघितले, त्यातून अस जाणवल की हा gravity force म्हणजेच माझ्या आयुष्यात असणारा सद्गुरुन्चा धाक! जोपर्यंत gravity force आहे तोपर्यंत मी स्थिर आहे, पण ज्या क्षणी हा force नाही त्या क्षणी मी दिशाहीन होउन इतरत्र भटकायला लागतो.
जोपर्यंत मी त्याच्या धाकाच्या प्रांतात आहे, तोपर्यंत माझ Connection त्याच्याशी जोडलेल आहे. एकदा का अहंकाराने फुगुन मी वर गेलो आणि त्याचा धाक ठेवला नाही की मग मी आयुष्यात गटांगड्या खायला लागतो.
आपण पंचमीच्या practicAl पुस्ताकामधे बघतो की माझ्या मधला आणि माझ्या सद्गुरुमधला विद्युत् प्रवाह खंडित होतो जेव्हा मी त्याच्या आज्ञाकक्षाच्या बाहेर जातो तेव्हाच! आणि हा प्रवाह खंडित झाला की मग मला त्याची हाक ऐकु येत नाही व माझ्यासाठी त्याने उप्लाब्ध करून दिलेली संधि मला दिसत नाही व मी ती स्वीकारु शकत नाही.
म्हणजेच सद्गुरुच्या धाकाबरोबरच गरजेची गोष्ट आहे ती म्हणजे त्याच्या आज्ञेच पालन करणे. मात्रूवात्सल्यविन्दानम मधे आपण बघतो की ब्रम्हदेवाच्या आळसामुळे व एकाच जागी बसून राहण्याच्या कंटाळ्यामुळे तो त्याला दिलेल्या श्वेत्कामलाचा एका क्षणासाठी त्याग करतो आणि मग आपण बघतो की कसे मधु कैटभ हे दोन्ही राक्षस त्याच्या मागे लागतात.
इथे बघितले तर ते एका अर्थाने हे श्वेत्कामल म्हणजे सद्गुरुचा माझ्या आयुष्यात असलेला धाक, ज्याचा क्षणासाठी पण त्याग केल्याने म्हणजेच “त्या”च्या आज्ञेचे पालन न केल्याने मला सद्गुरुऐवजि मग आता त्या राक्ष्सांच्या/वृत्रासुराच्या धाकात अडकून रहायला लागते आणि मग माझी नको तिथे धावाधाव सुरु होते. पण इथे पण आपण बघतो की आपली ही मोठी आई, आपली सद्गुरु माउली एवढी प्रेमळ आहे की चुक समजता क्षणीच माझ्या मदतीला धाऊन येते आणि तिची भक्ति करायला लाउन, व् त्याचबरोबर क्रोध, सुड अश्या भावनांचा त्याग करायला लाउन आपल्याला तिच्या पायी स्थिर व्हायला लावते आणि मग त्या राक्षसांचा बीमोड करते.
म्हणूनच मला जर माझ्या जीवनात माझ्या सद्गुरुची कृपा अखंड ठेवायची असेल तर मला त्याच्या धाकात, आज्ञेत राहणे अनिवार्य आहे.
कुठल्याही स्तुतिने फुगून न जाता पाय जमिनीवरच ठेवणे गरजेचे आहे. कोणीही स्तुति केलि की श्री राम म्हणून ते सर्व माझ्या सद्गुरुला अर्पण करायला पाहिजे.
Spaceमधेसुद्धा असताना (प्रसिदधि मीळाल्यावरही) spacecraftमधे (सद्गुरुच्या आज्ञा कक्षामधे) राहून व फक्त आणि फक्त “त्या”चाच धाक माझ्या आयुष्यात ठेउन माझ्या आणि माझ्या बाप्पा मधल connection अटूट ठेवायचा प्रयास करायला पाहिजे मग वृत्रासुर आणि इतर राक्षस माझ्या केसालाही धक्का लाऊ शकणार नाही कारण माझ अख्ख्च्या अख्ख चंडिकाकुल माझ्यासाठी व सतत माझ्यासोबत असेल.

अम्बदज्ञ
Ketakiveera Kulkarni
Dombivli east upasna Center