Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-festival of Holi)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-festival of Holi)

#7433

Aniketsinh Gupte
Participant

Sai the guiding spirit-festival of Holi

हेमाडपंतच्या (Hemadpant) आयुष्यातील अजून एक सुंदर गोष्ट आपल्यासमोर येते आणि ती म्हणजे होळी(Festival of Holi) सणातील बाबांचे दाभोलकर ह्यांच्या मुंबईच्या घरी आगमन. बाबा (Saibaba) स्वप्नात येउन दृष्टांत देतात कि आज तुझ्या घरी येणार आहे. स्वप्न जरी असलं तरी हेमाडपंतसाठी ती म्हणजे सद्गुरु उवाच. सद्गुरु चा शब्द हेच प्रमाण हे समजून चालणारे हेमाडपंत ह्यांच्या मनात कसलीच शंका नसते. माझे बाबा येणार म्हणजे नक्कीच येणार. इतर जन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न हि करतात की कुठे शिर्डी आणि कुठे मुंबई. बाबा शिर्डी(Shirdi) सोडून कुठेच जात नाही मग ते इतके लांब का येतिल. पण हेमाडपंत हे एका वेगळ्या रांगेतले भक्त होते. माझ्या साईने शब्द दिला आहे म्हणजे ते येणारच. आणि शेवटी तसबीर रुपात साई बाबा हेमाडपंतच्या घरी येतात ! खरच अलौकिक अशी हि गोष्ट.
आपण गोष्ट वाचतो आणि म्हणतो वाह काय नशीबवान आहेत हेमाडपंत. काय त्यांची भक्ती वगेरे वगेरे. पण आपण ह्या गोष्टीचा किती सखोल अभ्यास करतो? सर्वात पहिले म्हणजे स्वप्नात आलेले बाबा हे नुसते स्वप्न नाही तर त्यांनी प्रत्यक्ष आपल्याशी संवाद साधला हा भाव. म्हणजेच काय तर हा सद्गुरु आपल्याशी बोलतो ते फक्त समोर आल्यावरच नाही तर कुठल्याही रुपात आणि कुठेही. आपण नेहमी म्हणतो बापू आमच्याकडे बघतच नाहीत, आमच्याशी बोलतच नाहीत पण आपण किती बोलतो? किती वेळा त्याच्या तसबीर समोर किवां डोळे बंद करून त्याच्याशी संवाद साधतो. सध्या स्वस्तिक्षेम संवाद करताना ही बऱ्याच वेळेस आपलं लक्ष नसतं पण त्याचं लक्ष असलं असलंच पाहिजे ह्याला option नाही. असं का? हेच आपल्याला इथे शिकायला हवे. जेह्वा इतर जन समजूत काढतात कि शिर्डी आणि मुंबई मधला अंतर किती, बाबा कसे येणार तेह्वा हेमाडपंताची एक सुंदर बाजू आपल्यासमोर उलगडून येते. त्या सद्गुरु माउली वरचे प्रेम आणि निष्ठा. बाबांचा शब्द तो. असा कसा वाया जाईल? त्यातही बाबांनी त्या रुपात, चालत्या फिरत्या देहधारी रुपात येउन आपला शब्द पाळावा असा ही अट्टाहास नाही. म्हणजेच हेमाडपंताचे साई वरील प्रेम हे त्या देहाच्या सगुण रूपाच्या हि पलीकडले होते. तसबिरीत बाबा घरी आले ह्याचा आनंदच साजरा केला गेला. बाबा स्वताहून चालत आले नाहीत असा कांगावा केला नाही. आपण बराच वेळेस इतेच ठेच खातो. बापूंनी यायला हवे. आपण इथे जातोय सेवेला, मग बापू आले तर काय मजा येईल न? पण सेवेच्या प्रत्येक ठिकाणी बापू असतोच हे बोलत नाही. बापूंच्या पुढे मागे धावलो तर बापू आपल्याकडे बघतील, पण बापूंना ज्यांना बघायचा आहे त्याची नझर बरोबर तिथे जातेच. हे कित्येक जणांनी अनुभवला आहे. त्याला प्रत्येकाची काळजी आहे. बाप आहे तोः आपला. Our Most Loving Dad !!!
हाच भाव घेऊन आता नझर वळली आहे येणाऱ्या Kolhapur Medical Camp वर. ज्यांनी बापूंना प्रत्यक्ष पाहिलं देखील नाही त्यांचे बापूंवरिल प्रेम अनुभवण्यास जायचं. Camp सुरु होण्याच्या तीन महिने अगोदर पासून जे कार्यकर्ते अविरतपणे काम करत आहेत त्यांच्या कडून बरंच काही शिकण्यासाठी जायचंय.…
हरी ॐ