Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Sai the guiding spirit-faith)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Sai the guiding spirit-faith)

#8219

Sai the guiding spirit-faith

हरी ओम मामा,

सर्वात प्रथम तुम्हाला आणि सुचितमामांना वाढदिवसाच्या अनिरुध्द अनिरुध्द शुभेछा…. समस्त चंडिका कुलाचे आशीर्वाद तुम्हाला लाभोत… बापू आणि मोठ्या आई चरणी तुमचा भाव, प्रेम, विश्वास अनिरुध्द गतीने वाढत राहो हा मोठ्या आईकडे आणि बापूंकडे “अनिरुध्द धून” ग्रुपचा प्रेमाळ हट्ट.

केतकीवीरा कुलकर्णी, संदीपसिंह महाजन आणि प्रनिलसिंह टाकळे खूप छान पोस्ट आहेत.

साईसत्चारित्रातील(Sai satcharitra) ४८ व्या अध्यायात हेमाडपंतांनी सपटणेकरांना बाबांचा आलेला अनुभव मांडला आहे.

तुमच्या शेवटच्या पोस्टमध्ये जो सपटणेकरांचा (Sapatnekar) अनुभव लिहिलात तो अध्याय पूर्ण वाचून झाला.

आपण लिहिल्याप्रमाणे, “शेवडे यांनी सपटणेकरांना बाबांबद्दल माहिती दिली. पण त्यावेळेला सपटणेकरांना श्रीसाईनाथांकडे(Sainath) जाण्याची आवश्यकता वाटत नाही. पुढे सपटणेकरांच्या आयुष्यामध्ये अशी एक अघटित, अप्रिय घटना घडते की श्रीसाईनाथांकडे येण्याशिवाय त्यांच्याकडे तरणोपायच राहत नाही. ज्यावेळेला सपटणेकरांना ’आयुष्यात राम राहिला नाही’ अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं, त्यावेळेला अशा परिस्थितीतून फक्त साईनाथच त्यांना बाहेर काढू शकतात आणि बाहेर काढतात. परमेश्वराला / परमात्म्याला दोष देणारे सपटणेकर सद्-गुरुंना शरण गेल्यानंतर, त्यांचं आयुष्य मूळ पदावर येतं.”

त्याचप्रमाणे आपल्याही आयुष्यात असे अनेक प्रसंग येत असतात जिथे आपण सद्गुरुंवर (Sadguru) पूर्ण विश्वास (faith) न ठेवता माझ्या आयुष्यात जे काही अडचणी येतायेत त्याला कुठेतरी माझा सद्-गुरुं जबाबदार आहे असा मनाचा खेळ करून घेतो. परमेश्वरावर रुसून बसून किंवा मनात कुठे तरी आढी ठेऊन आपण सद्-गुरुंचरणी जातो. तरी तो आपल्याला त्या अडचणीतून सुखरूप बाहेर काढतोच. शेवटी तो आपली काळजी घेणारा आपला मातापिता सर्वस्व असतो. जरी आपण त्याला विसरलो तरी तो आपल्याला कधीच विसरत नसतो.

ज्याप्रमाणे बापू वारंवार आपल्याला सांगात असतात कि आपल्या देहात जो परमेश्वराचा वास आहे तो आपले स्मरण प्रत्येक श्वासोउच्छ्वासाला करत असतोच. जरी आपण त्याला विसरलो तरी देखिल तो कधीच आपल्याला विसरत नाही.

प्रेमवीण शुष्क ज्ञान । तयाचे कोणा काय प्रयोजन ।
विनाप्रेम न समाधान । प्रेम अविच्छिन्न असावे ।। २६।।

साईसच्चारितरतील अध्याय क्रमांक ४८ मधील ओवी क्रमांक २६ मध्ये सांगितल्याप्रमाणे सदगुरूवर प्रेमच नसेल तर आपले ज्ञान अर्थहिन आहे. त्याचा काहीच उपयोग होत नाही. आणि जर आयुष्यात प्रेमच नसेल तर समाधान तरी कोठून मिळणार? परमेश्वावरील प्रेम हे अखंड, अभंग आणि अनिरुध्द असावे.

यावरून प्रवीणसिंह वाघ यांचा अनुभव आठवतो , परमेश्वरावर विश्वास कसा असावा आणि अल्टीमेटली त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्हावर विश्वास कसा असावा हे समजून येते. प्रवीणसिंहनि जो बापूंवर आणि त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्हावर विश्वास ठेवला तोच विश्वास त्यांना भयंकर प्रसंगातून बाहेर काढू शकला.

आपल्याला अडचणीच्या प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी परमेश्वरावरील विश्वास खूप मोठ्या प्रमाणावर उपयोगी ठरतो.

अम्बज्ञ

श्रध्दावीरा दळवी
लोणावळा उपासना केंद्र