Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Durga Algorithm)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Durga Algorithm)

#7469

Suneeta Karande
Participant

Sai the guiding spirit- Durga Algorithm

हरि ओम. दादा. तुम्ही दाखविलेल्या ह्या देवयान पंथाच्या वाटेवर बापू आता कालच माघी गणेश चतुर्थीला जसे म्हणाले तसे न+मन करायचे ठरविले आणि तुम्हीच सांगितल्याप्रमाणे बापूंच्याच प्रवचनांच्या आधारे हेमाडपंताच्या ह्या प्रवासाकडे पाहताना खूपच वेगळ्या प्रकारे आनंद लुटता येतो आहे ह्याची जाणीव होऊ लागली आहे.
बापू दिनांक २३-०१-२०१४ च्या प्रवचनात दुर्गा अलगोरिद्म समजावून सांगताना म्हणाले होते की
महिषासुर हा शब्द कसा बनलेला आहे? महिष + असुर = महिषासुर. म इति मंगलम्‌ पूर्ण मंगल. ‘म’ बीज हे पूर्ण मांगल्याचं बीज आहे. जेव्हा ह्याला ‘ह’ कार मिळतो तेव्हा त्याचा अर्थ हिंसा होतो. जे जे म्हणून मंगल आहे, सर्व मंगल आहे त्याची हिंसा करणारा तो महिषासुर. ‘ष’ इति षंढत्व. षंढत्व प्रदान करणारा. failure देणारा. जे काम मनुष्यासाठी आवश्यक आहे ते त्याला मिळू न देणं म्हणजे षंढत्व, अभ्यासापासून कर्तृत्वापर्यंत सगळं काही मिळू न देणं. सर्व मांगल्याची हिंसा करून मानवाला षंढत्व देतो तो महिषासुर. महिष शब्दाचा अर्थ म्हणजे जे अशुभ आहे, जे अनिष्ट आहे ते. महिष म्हणजे evil आणि महिषासुर म्हणजे devil. evil आणणारा तो devil. महिषत्व देणारा तो महिषासुर. महिषत्व म्हणजे मंगल गोष्टी नष्ट करून षंढत्व देणारा. षंढत्व म्हणजे पुरुषार्थ नष्ट करणारा. धर्म पुरुषार्थ, अर्थ पुरुषार्थ, काम पुरुषार्थ, मोक्ष पुरुषार्थ, भक्ती पुरुषार्थ, मर्यादा पुरुषार्थ ही नष्ट करणारा.
षंढत्व म्हणजे पुरुषार्थ नसणं. पुरुषार्थ करण्याची ताकद नसणं. हे महिषासुर करतो. जे-जे पवित्र मार्गावरून चालू इच्छितात त्यांच्या जीवनात दु:ख आणण्याचं, त्यांचा नाश करण. जे हित साधू पाहतात त्यांचं अहित करणं. ज्यांना सौंदर्य हवं आहे त्यांना कुरूपता देणं, जे शुभ आहे त्याला अशुभ करणं हे त्याच काम आहे. महिष म्हणजे जे पूर्णपणे अशुभ, evil आहे ते आणि devil म्हणजे महिषासुर.

आता हेमाडपंताच्या जीवनात बघताना परम पूज्य नंदाईने शिकविलेल्या “साई = फोर मी ” ह्या पुस्तक मालिकेच्या ३ भागात प्रतिपादन केल्याप्रमाणे हेमाडपंत आणि काका दिक्षीत हे परम मित्र असतात आणि कोणालाही सत्पुरुषाचा अथवा संताचा परिचय झाल्यास त्याने दुसर्‍याला अवगत करायचे हे ठरते , जेव्हा ते दोघे रोज एकत्र भगवदगीता वाचत असत. म्हणजे गीता वाचनातून ते दोघे मांगल्याच्या बीजाकडे प्रवास करत होते. त्यावेळेस काकांची भेट श्रीसाईनाथांशी होते आणि तसे ते हेमाडपंताना कळवतात आणि शिरडीला जाऊन साईनाथांची प्रत्यक्ष भेट घेण्याबद्द्ल गळही घालतात… काकासाहेब आग्रहा पडले । शिरडीचें जाणें निश्चित ठरलें । (ओवी १०२, अध्याय २ )_आणि तेवढ्यात त्या मंगलाला “ह” कार मिळतो तो विकल्पाचा व तेही साक्षात सदगुरुंच्या विषयीचा विकल्प !!!
परम पूज्य बापूंनीच लिहिलेल्या मातृवात्सल्यविन्दानम्‌ ह्या ग्रंथाच्या १०व्या अध्यायाच्या महिषासुराच्या १४ प्रमुख सेनापतींच्या वर्णनात आपण वाचतो की ४) कराल म्हणजे जबडा पूर्ण उघडूनभय दाखविणारा म्हणजेच अख्खाच्या अख्खा गिळून टाकीन, अशी भीती घालणारा व गिळणारा अर्थात अजगर अर्थात पूर्ण विकल्प अर्थात भगवंताविषयी विकल्प आणि त्यामुळेच पुढे येणारा
२) चाम् बुध्दिं मारयति इति चामर: अर्थात बुध्दीला मारक असणारा चामर म्हणजे चंचलता.
बापू पुढे १३व्या अध्यायात स्वत:च परशुराम ह्या रुपाद्वारे सदगुरु श्रीदतात्रेयांना प्रश्न विचारुन आम्हां सर्व श्रद्धावानांना समजावतात की महिषासुराची सत्ता मानवाला नाकारायची असेल तर प्रथम त्याला ह्या महिषासुराच्या सेनापतींना ओळखावे लागते व त्यांना आपल्या जीवनात प्रवेश करण्यापासून धुड्कावून लावावे लागते.
१०२व्या ओवीच्या ह्या भागात हेमाडपंत तेच सत्य उलगडून दावतात की जावयाचे दिवशींच बदललें । मन तें फिरलें अवचित।
महिषासुराच्या विकल्प ह्या सेनापतीने कराल बनून प्रवेश करताच बुध्दीमध्ये चंचलताही घुसलीच म्हणजेच मांगल्याची हिंसा घडली आणि महिषासुराने कार्य सुरु केले म्हणजेच षंढत्व आले- पुरुषार्थ नष्ट झाला — म्हणजेच हेमाडपंताच्या जीवनात सदगुरु भेटण्याने जो आनंद आला असता, जे सुख त्यांना मिळाले असते त्यापासून ते वंचित झाले, मनाची चंचलता वाढली, गुरुविषयीच्या विकल्पाने …
बापू पुढे प्रवचनात म्हणाले होते की त्र्यंबका म्हणजे एकाच वेळी तीनही काळात बघून अहितकारक गोष्टींचा नाश करू शकणारी. म्हणून हीच महिषासुराचा नाश करू शकते. तीच दुर्गा आहे आणि तीच महिषासुरमर्दिनी आहे.

दुर्गा जी दुर्गम आहे, दुर्गम म्हणजे जी मिळण्यास अत्यंत कठीण आहे ती दुर्गा. दुर्गा म्हणजे दुर्गती नाशिनी – वाईट गोष्टी होऊच देत नाही. ती तुमच्या भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ ह्या तिघांमधल्या दुर्गतीचा नाश करणारी.
पुरुषार्थ अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी तिन्हीं काळात रिपेरिंग व्हावं लागत. तीनही काळात जाऊन चुका दुरूस्त करणं हे दुर्गम, कठीण काम आहे म्हणून ती त्र्यंबका आहे. ते ती करते म्हणून दुर्गम आहे. आणि ती महिषासुराचा नाश करते म्हणून ती महिषासुरमर्दिनी आहे.
अर्थातच हीच महिषासुरमर्दीनी हेमाडपंताच्या जीवनातही त्र्यंबका बनून कार्य करते आणि सदगुरुंच्या विषयीचा , भगवंताच्याविषयीचा विकल्प ह्या दुर्गतीपासून वाचविते ते ही प्रत्यक्ष वर्तमानकाळाचा स्वामी असणार्‍या तिच्याच पुत्राकडून म्हणजेच साईनाथ ह्या परमात्म्याद्वारे –
दादा आपल्या लेखातून बाबांचीच ही अगाध लीला असल्याचे सत्य उकलून दावल्यामुळे सदगुरुच कसे अंधाराचे रुपांतर प्रकाशात करतो हे ही प्रत्ययास आले…दादा खरेच श्रीसाईसच्चरिताचा अभ्यास करण्याची गोडी बापूंनी आम्हांला लावली पण त्याची प्रात्यक्षिक कसे करायचे, खर्‍या अर्थाने प्रचिती कशी घ्यायची हे तुम्ही आम्हांला ह्या फोरमच्या माध्यमातून शिकवित आहांत ,आता खरी कुठे सुरुवात झाली असेच वाटते… परंतु हे ही नसे थोडके… बापूंच्याच चरणी ह्या वाटेवरून पडत, झडत चालून सुद्धा नक्कीच पोहचु या कारण ही तर माझ्या अत्यंत प्रेमळ सुचित दादांचीच ग्वाही आहे….
अंबज्ञ !!!