Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit- Dr. Nikola Tesla)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit- Dr. Nikola Tesla)

#8302

ketaki. Kulkarni
Participant

हरी ओम दादा,
खरी गोष्ट सांगितली तुम्ही कि सद्गुरु वारंवार संधी देत राहतो, आणि त्याच बरोबर एक ठामपणा भक्ताकडे असावा लागतो. एक विश्वास असावा लागतो की मला माझ्या कठीण परिस्थितीतून, संकटातून सद्‍गुरुच बाहेर काढू शकतात आणि काढतील.

आणि ह्याचच एक सुंदर उदाहरण आपल्याला बाप्पाने ह्या गुरुवारी दिलं., ते म्हणजे एक थोर शास्त्रज्ञ निकोला टेसला(Nikola Tesla) ह्याचं. त्यांची अक्खी प्रयोगशाळा शत्रूंनी जाळून टाकली आणि तरी देखील त्यांनी देवाला दुषणे न देत एकदाच फक्त देवाला सांगितलं कि देवा मला मार्ग दाखव. आपण असं करतो का? जरा काही इकडचं तिकडे झालं कि लगेच देवाला जाब विचारण्यास सुरु! किती तरी वेळा आपण टी.व्ही. मालिकांमध्ये बघतो आणि आपल्या बाप्पाने पण आपल्याला एकदा हे सांगितले होते कि एखाद काम होत नसेल तर लगेच देव पाण्यात वगैरे ठेवतात, किवा जर तू खरा असशील तर माझा अमुक काम करून दे वगैरे वगैरे…. खरच! किती चुकीची गोष्ट आहे हि… जस काही देवाची भक्ती केली म्हणजे देवावर उपकारच केल्यासारखं दाखवतात किवा माझ्यामुळे देवाच देवपण अस्तित्वात आहे असा आव आणतात. पण असं करताना त्यांना हे कळत नसत कि विश्वास ठेवायची गरज आपल्याला असते, देवाला नाही. मी जर नाही त्याची भक्ती केली नाहि त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तर नुकसान माझाच होणार आहे. पण ह्यात सुद्धा तो देव आहे, माझीच माउली आहे, ती आपल्याला आपली चूक विविध प्रकारांनी समजून देण्याचा प्रयास करतेच, आता इकडे जर आपल्याला आपली चूक समजली आणि ती सुधरवण्याचा प्रयास मी केला तर हि माउली तो अपराध पण सोडून देते, कारण त्या त्रीविक्रमाला फक्त माहित आहे तो गुणाकार, जर संधी देऊन पण नाकारली, किवा चूक कळून पण अमान्य केली किवा त्याकडे कानाडोळा केला, तर मात्र अध:पतन हे निश्चित.
आत्ता गुरुवारीच बापूंनी सांगितलेल्या अल्गोरिदम मध्ये आपण बघितल कि कसा तो त्रिविक्रम माझी सगळी सोय करून देतो.
उदा. १२*९+३=१११
आता इकडे १११ मार्क मिळवण्यासाठी मला १०८ मार्क आधीच त्याने देऊन ठेवले आहेत, आता मला प्रयास फक्त ३ मार्क मिळवण्यासाठीच करायचा आहे. आणि हे ३ मार्क मला मिळणार आहेत ते त्याच्यावरच्या भक्तीने नाही तर फक्त विश्वासानेच.

अजून काय करायला पाहिजे आपल्या बापाने आपल्यासाठी! हे असे बाबा कधीतरी कोणाला मिळतील का! शक्यच नाही… कारण इतका प्रेम फक्त आणि फक्त तो एकच करू शकतो. बाकी कोणी हि नाही.
इथे मला अद्य पिपा काकांची एक ओळ आठवते:

इतुके सोपे जीवन केले
बसल्या जागी देव आले
उठून बसण्या दमलो नाही
हीच काय ती सेवा घडली

आता आपल्याला फक्त एकच करायचे आहे, किती हि काही हि झालं, अगदी कितीही मोठ्ठ संकट आलं तरीसुद्धा हा विश्वास ठेवायचा आहे कि ह्यात पण माझ्या बाबांचीच इच्छा आहे आणि ते जे काही करणार ते माझ्यासाठी उचितच असणार. माझ्यावरती आलेल्या संकटांचा तो नाश करणारच आहे. कारण माझ्या (माझ्यावर आलेल्या) संकटांपेक्षा हि माझा बापू हा खूप मोठा आहे.

आणि सीतामाई प्रमाणे प्रार्थना करायला पाहिजे
दिन दयाळू बिरीदु साम्भारी
हरहु नाथ मम, संकट भारी

अम्बज्ञ

केतकीवीरा कुलकर्णी
डोंबिवली पूर्व उपासना केंद्र