Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit- Amir Shakkar)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit- Amir Shakkar)

#8217

Pranilsinh
Member

Sai the guiding spirit- Amir Shakkar

हरि ॐ दादा. आज पुन्हा खूप दिवसांनी forum वर लिहिण्याचे स्फुरण बापूंनी दिले त्यासाठी मी मनापासून अंबज्ञ आहे.

खरचं प्रत्येकाच्या post वाचण्यात एक वेगऴाच आनंद आणि नवीन शिकण्यासारखे बरेच आहे. मुख्य म्हणजे पंचशिल परीक्षेसाठी उत्तम platform तुम्ही आम्हाला दिला आहे.

श्रद्धावीराने मांडलेल्या मुद्दयाप्रमाणे सद्गुरू आपल्याला अनेक संधी देतच असतो.पण त्यावेळी तो श्रद्धावान ते ओळखू शकतोच असं नाही. पण बापूंनी प्रवचनात सांगितल्याप्रमाणे चंडिकाकुलाने अगदी प्रत्येकाला INDIVIDUALITY म्हणजेच एक विशेष identity (ओळख) दिली आहे आणि मुख्य म्हणजे चण्डिकाकुलाने दिलेली असल्यामुळे ती सर्वात उत्तम आणि सुंदर आहेच आहे. ही पण आपल्याला चण्डिकाकुलाने जन्मजात दिलेली संधीच आहे. जी कशी, कुठे वापरावी ह्याचे ज्ञान आपल्याला नसते व ह्याच अज्ञानातून आपल्याकडून चुका होतात. ह्याचेच उदाहरण आपल्याला २२व्या अध्यायात मिळते.

अमीर शक्कर (Amir Shakkar) नावाचा भक्त एकदा शिरडीत(Shirdi) आला. बाबांचे दर्शन घेऊन झाल्यावर बाबांनी त्याला एका चावडीत जाऊन राहण्यास सांगितले. त्याला संधिवाताचा विकार होता. ती चावडी खूप जीर्ण आणि विंचू, पाली ह्यांनी भरलेली होती. कुत्री उष्टी अन्न खात असत.मागच्या बाजूला खूप कचरा होता. पावसाच्या पाण्यामुळे ओल पकडायची. एवढे असतानाही त्याला औषध म्हणून रोज बाबांचे दर्शन मिळे. बाबा भिक्षेसाठी बाहेर पडल्यावरही आपसूक दर्शन मिळत होते. पण काही दिवसांनी अमीरला हा सगळा बंदिवास वाटू लागला. त्याला स्वातंत्र्याची ओढ लागली.
आणि त्या कल्पनेच्या भरात तो बाबांची आज्ञा न घेताच एका रात्री चावडीतून बाहेर पडला आणि एका धर्मशाळेत जाऊन बसला. तिथे एक मरणाच्या दारात असलेला फकीर तृषणेने व्याकुळ झाला होता. अमीर त्याला पाणी देणार एवढ्यातच तो मृत होतो. अमीरला भीती वाटू लागते की चौकशीमध्ये आपण पकडले गेलो तर? रात्रीच्या अंधारात प्रेतासमोर असलेला अमीर घाबरतो व धावत धावत तोंडात साई साई जप करत शिरडीत येतो आणि त्याला त्याची चुक कळते. त्याला विश्वास बसतो की बाबांनी आपल्यासाठी केलेली व्यवस्था योग्यच होती.

“काय गोड गुरूची शाळा.. सुटला जनक जननीचा लळा…….”

देवाच्या कृपाछत्राखाली आपल्याला जगातील सगळी सुखे आपोआपचं मिळत असतात. त्यासाठी खटाटोप करण्याची गरजचं नसते.
बाबांनी एवढी स्वत:च्या नजरेखाली सोय करूनही पारतंत्राच्या त्रासामुळे अमीरला ह्या संकटातून जावं लागलं पण शेवटी त्याला बाबांच्याच पायाशी यावं लागलं.
पिपादा म्हणतात ना….

“इतुके सोपे जीवन केले बसल्याजागी देव आले,
उठून बसण्या दमलो नाही हीच काय ती सेवा घडली….”

परमात्म्याने प्रत्येकासाठी त्याचा master plan केलेलाच असतो. आपल्याला वाट पहायची असते ती योग्य वेळेची. बापूंनी पण आजपर्यंत आपल्याला अनेक नवीन संधी दिल्या आहेत आणि ह्या पुढेही देतच राहणार आहेत. १.मातृवात्सल्यविंदानम्
२.उपनिषद
३. श्रीस्वस्तिक्षेम संवाद
४. त्रिविक्रम जल
ह्या आणि अश्या अनेक संध्या…
पण त्यांचा आपण कसा, कितपत चांगला वापर करतो हे आपल्यावरचं अवलंबून आहे.
मात्र ह्या संधींचा उपभोग घेताना मनात कोणतेच कुतर्क येता कामा नये. जे आपल्याला बापूंनी दिलयं ते अगदी योग्य आणि १०८% उचित आहेच. ज्यामु
ळे आपले आयुष्य सुखी होणारचं आहे.

“ह्या खोट्या कल्पना दे दे सोडूनी..
ह्या अनिरूद्धाचा धरिला हात मी…”

एकदा का ह्या अनिरूद्धाचा हात धरला ना मग आयुष्यात कोणत्याच गोष्टींची कमतरता कधीच होणार नाही. आपल्या भक्तांसाठी उकिरड्यावर राहूनही त्यांचे कल्याणच व्हावे ह्यासाठी सतत झटणारा माझा त्रिविक्रम बापू एकच फक्त एकच….

जे जे मजसाठी उचित।
तेचि तू देशील खचित।
हे मात्र मी नक्की जाणित।
नाही तकरार राघवा।।

मी अंबज्ञ आहे.

प्रणिलसिंह टाकळे.
तेलगु केंद्र,दादर.