Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Ambadnya discussion on forum)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Ambadnya discussion on forum)

#8165

ketaki. Kulkarni
Participant

Sai the guiding spirit-Ambadnya discussion on forum

हरी ओम दादा,
अम्बज्ञ

आता हा नवीन विषय वाचून पुन्हा जोर आला. इतके दिवस थोडे थंडावलेले सगळे आता परत नव्या जोमाने विचार करायला लागतील.
आम्हाला सर्वांना हि विचार करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप अम्बज्ञ (Ambadnya)आहोत.

खरी गोष्ट आहे, सद्गुरु (Sadguru) अनेक संध्या उपलब्ध करून देत असतो आपल्याला पण आपण त्याचा फायदा घेत नाही, किवा काही वेळा आपल्याला कळतच नाही, कि कधी संधी आली आणि कधी मी गमावली. हे अस का  होत? तर त्याच एक  कारण म्हणजे कुठे तरी आपल्याला आपल्या देवाच झालेल विस्मरण…
आपल्याकडे सगळ काही असत तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची किंमत नसते., सहजतेने उपलब्ध होत म्हणून आपण  गृहीत धरायला लागतो, पण आपल्याला हे कळत नसत कि जे काही आज आपल्याकाकडे आहे ते सगळा आपल्या देव मुळे मिळालेल आहे  आणि मग जेव्हा सगळ काहि संपत तेव्हा किंमत वाटायला लागते, आणि मग देवाची आठवण होते.
आणि ती माउली पण खूप प्रेमळ…. आईच ती शेवटी!
तिच्या बाळांसाठी सदैव वाकायला तयार…  एका पायावर…
संकट आणल जरी तरी सुद्धा ते आपल्याला खाईत ढकलण्यासाठी तर आधीच जे आपण बुडालेलो असतो त्यातून बाहेर काढण्यासाठी… आणि हीच असते ती आपल्या आईची माया, तिच प्रेम,
म्हणूनच मीना वैनी इथे म्हणतात

तुझीच सवय जात नाही आमुची कशी जाणार।

आत्ताच आपल्या बापूंनी आपल्याला प्रवचनातून सांगितलेल… कि आई कशी वाकते तिच्या बाळासाठी. बाळाची जेवणाची वेळ झाल्यावर ह्या खोलीतून त्या खोलीत जेव्हा हाक मारते, तेव्हा ती हाक म्हणजे त्या आईच वाकण असत…
आणि जेव्हा आपली हि जगन्माउलि आपल्याला संधी देत असते, सुधारण्यासाठी, स्वताच जीवन बदलवण्यासाठी तेव्हा ती वाकतच असते आपल्या प्रत्येकासाठी.
सतत जाणीव करून देत असते विविध प्रकरांनी आपल्या चुकीची, ते सुद्धा आपल्या चुका न मोजता. हे पण तिच वाकणच आहे.

इथेच मला एक गोष्ट आठवते…. ती म्हणजे  श्री साच्चारीतातल्या (Sai satcharitra) ३२व्या अध्यायात….
४ जण जे ज्ञानी असतात…ते शोध घ्याला निघतात आणि तिथे त्यांना एक वणजारी भेटतो. तो त्या सर्वांना काही तरी खाउन घ्यायला  सांगतो आणि त्याच्या बरोबर यायला सांगतो… तिथे आपण बघतो कि सगळे जण त्याच नाही ऐकत पण फक्त बाबा ऐकतात आणि मग बाबांना जे काही मिळत, त्यांनी जे काही अनुभवल ते कधी हि कोणी हि अनुभवलेल नसेल

।। काय गोड गुरूची शाळा। सुटला जनक जनानींचा लळा ।।

अश्या ह्या शाळेत प्रवेश झाला तो फक्त बाबांचा कारण त्यांनी ती मिळालेलि संधी पुरेपूर वापरलि…
ज्या वेळेला सपटणेकर (Sapatnekar) बाबाना शरण जातात पूर्णपणे तेव्हाच त्त्यांच आयुष्य सुरळीत होत.
सद्गुरु वेळोवेळी अश्या  अनेक कप्प्या पुरवत राहतो, कारण त्याच प्रेम अफाट आहे. अतुलनीय आहे.

आता जर आपला देव आपल्यासाठी एवढ सगळ करतो तर, आपली जबाबदारी आहे ते प्रेम टिकवण्याची, संधीचे सोने करण्याची, आपल्या प्रेमळ सद्गुरूंच्या शाळेत कायमची admission घेण्याची, आपल्या सद्गुरु, आपल्या आई समोर वाकून. २४ मिनिटे का होईना पण त्याला शरण जाउन….
मग आपला बाप्पा आपल्याला त्याच्या शाळेत खेचून घेऊन आणेल, कुठला हि आवाज न करता… कारण देवाच्या काठीला कधीच आवाज नसतो. कितीही चुकलो तरी सुद्धा जर मनापासून त्याला शरण गेलो तर बुडणार्या यादी मध्ये आपल नाव  “तो” कधीच येऊ देणार नाही
१०८%
अम्बज्ञ