Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit – Adyapipa)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit – Adyapipa)

#8301

Harsh Pawar
Participant

हरी ओम दादा … तुम्ही वर लिहिल्या प्रमाणे ” सद्‍गुरुंचा, बापूंचा आपल्या जीवनात प्रवेश झाल्यानंतर आपलंही आयुष्य असंच “नूतन” झालंय” ही गोष्ट अगदी १०८% खरी आहे …आपण आज जसे आहोत व बापूंकडे येण्या अगोदर कसे होतो ह्यात प्रत्येकाला जमीन आसमानचा फरक दिसून येईल. चूक काय आणि बरोबर काय हे बापूंकडे आल्यावर कळलं … धर्म काय आणि अधर्म काय ह्याची ओळख बापूंनी करून दिली … बापूंनी जर आपल्या जीवनात प्रवेश नसता केला तर आपण ही चिखलात अडकून राहिलो असतो …
आद्यपिपा (Adyapipa) त्यांच्या अभंगात सांगतात :
माझा अनिरुद्ध प्रेमळा
त्याला माझीया कळवळा ….
ह्या कळवळे पोटीच तो आपल्याला अनेक संध्या उपलब्ध करून देत असतो …
सपटणेकरांच्या कथेतून आपल्याला हे ही कळतं की एखादा दुखाचा डोंगर जेव्हा आपल्यावर कोसळतो तेव्हा आपली वर्तणूक कशी असायला हवी , त्या आलेल्या संकटावर माझी प्रतिक्रिया कशी असायला हवी … कितीही मोठं संकट आलं तरी मी माझ्या देवाला दुषणे देता कामा नये …. ” देवा हे तुझ्यामुळेच घडलं , तू काहीच कसं नाही केलंस ?” असे प्रश्न नाही विचारायला हवे … ह्या उलट माझी अशी प्रतिक्रिया हवी ” ठीक आहे , माझा साई , माझा अनिरुद्ध आहेच माझ्या बरोबर , जर मला एवढे दुख झाले आहे तर माझ्या साई-अनिरुद्धाला ही मला असे पाहून दुप्पट दुख होत असेलच , तो नक्कीच आणि लवकरच मला ह्या परिस्तिथितुन बाहेर काढेलच ” … आणि ही १०८ % खरी गोष्टं आहे…. माझ्या बापूंना मला निराश पाहून दुखच होतं !! बापू अनेकदा प्रवचनातून बोलले आहेत “राजांनो मला तुमचे असे दुखी , रडके ,अंबट चेहरे पाहायला नाही आवडत ” …बापू म्हणाले होते की तुम्ही जेवढे रामा वर प्रेम करता त्याच्या दुप्पट पटीने राम तुमच्यावर प्रेम करत असतो…. ह्याच नियमाने त्या साई-अनिरुद्ध-रामाला मला दुखात पाहून दुप्पट दुख होत असेलच …
जेव्हा मी संकटा मध्ये POSITIVE प्रतिक्रिया देतो , POSITIVE वर्तणूक ठेवतो तेव्हाच मी अर्ध युद्ध जिंकलेले असते … परमात्मा मग माझ्यासाठी १० नवीन मार्ग मोकळे करतो , मदत अगदी माझ्या पुढ्यात आणून ठेवतो कारण त्याला माहित असतं माझं बाळ ह्या क्षणाला थोडं Weak झालंय तरी तो संघर्ष करायला तय्यार आहे … त्याला आपलं नेहमीच कौतुक असतं … जेवढं आपण त्याचे नाव नाही घेत त्याहून जास्त तो आपले नाव घेत असतो …
निवड आपल्या हातात आहे … संकटामध्ये सपटणेकरांसारखं देवाला दोष देत बसायच आणि सद्गुरूच्या “चल हट्” ला सामोरे जायचं की दुखाला लढा देत संपूर्णपणे आस्तिक्यबुद्धी ठेवून सद्गुरुतात्त्वाला शरण जावून त्याचा कृपाप्रसाद मिळवावा …. ४८व्या अध्यायात हेमाडपंत म्हणतात :

आस्तिक्यबुद्धी श्रद्धस्तिथि ! हीच भक्ताची ह्रुदयपणती !
प्रेमस्नेहे उजळीजे वाती ! ज्ञानज्योती प्रकटेल !
( ओवी क्रमांक २५ )

श्री राम
मी अंबज्ञ आहे
हर्षसिंह पवार
(दिंडोशी उपासना केंद्र )