Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Abhang of Adyapipa)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guiding spirit-Abhang of Adyapipa)

#7439

Sai the guiding spirit-Abhang of Adyapipa

हरी ओम

आपण आद्यपिपाचे(Adyapipa) एक अभंग ऐकतो बापूला माझ्या प्रेमाची तहान… बापूला माझ्या भक्तीचिच भूक. यामध्येच एक सुंदर असे कडवे आहे खरे तर आपण विचार करू तितके त्याचे अर्थ निघत जातील. ज्या वेळेस दादांची हि post वाचली या forum मध्ये तर सुरवातीला हा अभंग आठवला तसेच हे कडव देखील,
झोपलो होतो ढोंग करुनी,
बहिरा हि झालो होतो बोळे घालूनी,
कवाडी बंद होती चारी बाजूला,
तरी कसा बापू माझा येतची राहिला ।।२।।
खरेच आहे आपल्याला ज्यावेळेस बापू बद्दल कोन्ही सांगत होते त्यावेळेस आपली हि स्तिथी अशीच होती. जर आपला मित्र सांगत असेल तर नाना कारणे देऊन त्याला तो विषय टाळण्यास सांगत होतो. नाही तर त्याला सरळ सांगत असू कि जर बापूंच्या बद्दल सांगत अशील तर मी काही भेटणार नाही. जरी भेटलो मग तो सांगत असेल तर ऐकून घेत असे खोटे भाव आपल्या चेहऱ्यावर आणत असू. अश्याप्रकारे आपण सगळे मार्ग आपल्या मित्राचे बंद करत असतो आणी त्याला टाळायचे देखील प्रयत्न करत असायचो. मग आपण हरतो आणि सरते शेवटी एक चेहऱ्यावर एक आनंद देखील असतो जिंकलेला कसा ? हा प्रश्न नक्कीच आपल्या पडला असेल. इथे आपण हरतो म्हणजे आपला अहंकार हरतो आणि बापूंनी आपल्याला शेवटी खेचून घेतलेले असते. इथे तर आपलाच विजय होतो बापूंनी आपल्याला कोणत्या न कोणत्यातरी मार्गे आपल्याला खेचले म्हणून. कितीही आपण टाळण्याचा प्रयत्न करत असू तरी बापू आपल्याला कधीही टाकणार नाहीच कारण बापूंचे तर वचन “मी तुला कधीच टाकणार नाही “.
दादांनी देखील हेच सांगितले आहे हेमाडपंताच्या मनातील स्तिथी काय होती. तरी देखील बाबा त्यांना त्यांच्याकडे ओढून घेतलेच ना. हेमाडपंत देखील सांगतात ना कि बाबांनी त्यांना त्यांच्या पाशी खेचून घेतले
जयाचे जैसे अर्जित| नको म्हणता चालून येत|
होणारापुढे काहीही न चालत| नेले मज खेचीत शिरडीसी॥
(संदर्भ अ. २/ओ. ११४)

हेमाडपंत ज्यावेळेस शिरडीत पोहचले आणि साठ्यांच्या वाड्यात राहण्यास उतरले स्वतः सांगतात कि, टांग्यातून उतरल्यावर मनामध्ये दर्शनाची उत्सुकता वाढली होती कधी एकदा जाऊन बाबांचे चरणावर डोके ठेवेन अशी त्यांच्या मनात आनंद लहरी उसळत होत्या
तांग्यातुनि उतरल्यावरी । दर्शनौत्सुक्य दाटले अंतरी ।
कधी चरण वंदिन शिरी । आनंद-लहरी उसळल्या ।।
(संदर्भ अ. २/ओ. १३३)
पुढे त्यांना बाबांचे परम भक्त तात्यासाहेब नूलकर (Tatyasaheb Noolkar) मशिदीतून (Masjid)नुकतेच येतात आणि सांगतात लवकर दर्शन घ्या सर्व मंडळीसोबत बाबा वाड्याच्या कोप्र्यापाशी आले आहेत आधी धुळभेट (हातपाय धुवून तयारीने देवदर्शन करण्यापूर्वी प्रथम दुरुनच – रस्त्यातूनच देवाचे दर्शन घेणे ; देवाला केलेला नमस्कार.) घ्या . बाबा लेंडीस निघाल्यानंतर मग तुम्ही स्नान करून घ्या. बाबा माघारी परत येतील मशिदी मध्ये पुन्हा आरामात दर्शन घ्या. यापुढे अध्याय २ मधील ओव्या जश्या आहेत तश्याप्रकारे लिहित आहे जो धुळभेटीमधिल त्यांचा जो आनंद आहे त्यांच्याच शब्दात वाचण्यात एक वेगळाच आनंद आपाणास हि मिळतो.
ऐसें ऐकुनी घाईघाई । धावलो बाबा होते त्या ठाई । धुळीत घातले लोटांगण पाई । आनंद न माई मनात ।।१३७।।
नानासाहेब सांगुनी गेले । त्याहुनी अधिक प्रत्यक्ष पाहिलें । दर्शनें म्या धन्य मानिले । साफल्य झाले नयनांचे ।।१३८।।
कधी ऐकली नाही देखिली । मूर्ती पाहुनी दृष्टी निवाली । तहान भूक सारी हरपली । तटस्थ ठेली इंद्रिये ।।१३९।।
लाधलो साईचा चरणस्पर्श । पावलो जो परामर्ष । तोचि या जीवाचा परमोत्कर्ष । नूतन आयुष्य तेथुनि ।।१४०।।
ज्यांचेनि लाधलो हा सत्संग । सुखावलो हा मी अंग-प्रत्यंग ।तयाचे ते उपकार अव्यंग । राहो अभंग मजवरी ।।१४१।।
ज्यांचेनि पावलो परमार्थाते । तेचि की खरे आप्त भ्राते । सोयरे नाहीत तयांपरते । ऐसे निजचित्ते मानी मी ।।१४२।।
केवढा तयांचा उपकार । करू नेणे मी प्रत्युपकार । म्हणोनि केवळ जोडूनी कर । चरणी हे शीर ठेवितो ।।१४३।।
साईदर्शनलाभ घडला । माझिया मनीचा विकल्प झडला । वरी साईसमागम घडला । परम प्रकटला आनंद ।।१४४।।
साईदर्शनी हीच नवाई । दर्शने वृत्तीसी पालट होई । पूर्वकर्माची मावळे सई । वीट विषयी हळूहळू ।।१४५।।
पूर्वजन्मीचा पापसंचय । कृपावलोकने झाला क्षय । आशा उपजली आनंद अक्षय करितील पाय साईचे ।।१४६।।
भाग्यें लाधलो चरण-मानस । वायसाचा होईल हंस । साई महंत संतावतंस । परमहंस सद्द्योगी ।।१४७।।
पाप – ताप – दैन्यविनाशी । ऐसिया साईच्या दर्शनेसी । पुनीत आज जहालो मी बहुवसी । पुण्यराशी समागमे ।।१४८।।
पुर्विल कित्येक जन्मांच्या पुण्यगांठी । ती हि साईमहाराज – भेटी । हा सी एक मीनलिया दृष्टीं । सकल सृष्टी साईरूप ।।१४९।।

हरी ओम श्री राम अम्बज्ञ
श्रीकांतसिंह नाईक
मिरज