Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guding spirit-Journey of hemadpant)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२(Sai the guding spirit-Journey of hemadpant)

#7609

ketaki. Kulkarni
Participant

Sai the guding spirit-Journey of hemadpant

हरिओम

अजितसिंह, रेश्मावीरा, सुनितावीरा, अनिकेतसिंह, हर्शसिंह… सर्वांच्या सुंदर विचरानी ह्या प्रवाहाला एक वेगळच सुन्दरसं वळण मिळाल आहे. सर्वांना अम्बज्ञ
हर्शसिंह, तुमच्या मताशी सहमत आहे. खरोखर हेमाडपंतानी अवघ्या ८ वर्षांमध्ये खूपच मोठा पल्ला गाठला होता.
गुरुवरचा अविश्वास ते एक असामान्य असा अपौरुषेय ग्रंथ.. हा प्रवास त्यांनी फक्त ८ वर्षान मध्ये केला. आणि त्यांच्यामुळेच आपणा सर्वांना हा साई समजला.
आज आपल्याला आपल्या बापूंकडे जाउन किती तरी वर्ष झाली आहेत, मग एवढ्या वर्षात आपण कुठे आहोत, आपल्या मध्ये किती सुधारणा झाली आहे हे बघता आला पाहिजे, जर नसेल झाली तर त्या मागचा कारण शोधून त्यावर सुधारणा करायला पाहिजे. हेमाडपंतानकडून अजून एक गोष्ट शिकता येते ती म्हणजे त्यांचा साई सर्वान पर्यंत पोचावा हि त्यांची तळमळ… आणि त्यांनी जो साई अनुभवला तोच सर्वान्पर्यन्त पोचावा हीच त्यांची इच्छा त्यांनी ह्या श्री साइसचरित मधून व्यक्त केली आहे.
हा ग्रंथ म्हणजे हेमाडपंतांनी त्यांच्या साईन्चे केलेले गुणसंकीर्तनच आहे. आणि किती सहजपणे त्यांनी ह्याचा विचार सुचला. गहू दळण्याची कथा बघून त्यांना, त्यांना आलेले अनुभव आणि इतर भक्ताना आलेले अनुभव लिहावेसे वाटले.
एवढ्या सुंदर प्रकारे गुणसंकीर्तन खरच तेच करू शकतात.
आज आपल्याला सुद्धा आपला बापू सगळ्यांपर्यंत पोचवायचा आहे. आणि ह्यासाठी गुणसंकीर्तन करण्यासारखा दुसरा मार्ग नाही. आपल्या देवाच गुणगान, तो आपल्याला कसा भावला, त्याच आपल्या आयुष्यात सर्वात महत्वाच स्थान असण्याच कारण, हे लोकांपर्यंत पोचवायच, माझा बापू वेगळा का आहे हे इतर लोकांना पटून द्यायच, हेच आपल्या कडून अपेक्षित आहे.
आणि ह्याच सर्वात सुंदर सुरुवात करण्याची संधी म्हणजे पंचशील परीक्षा. पाहिजे तेवढ लिहा आपल्या साई बद्दल, आपल्या बापूंवर, प्रत्येकाचा भाव हा शेवटी त्याच्य पर्यंत पोचतोच. आणि ह्यामुळे होत अस कि हि परीक्षा जस जस आपण देत जातो, तस तस आपल त्याच्या वरच प्रेम वाढतच जात… त्याच प्रमाणे जेव्हा आपण गुणसंकीर्तन करतो, अनुभव कथन किवा कोणत्याही प्रकारे आपल्या देवाच गुणसंकीर्तन करतो तव्हा त्या समोरच्या व्यक्ती बरोबर आपला देखील फायदा होत असतो. त्या व्यक्तीला बापू समजतो, आणि हे अनुभव ऐकून, सांगून आपला आपल्या देवा वरचा विश्वास अधिक दृढ होत जातो; त्याच्या वरच प्रेम वाढत राहत.,
त्याच्यावरचा विश्वास आणि त्याच्यावरच प्रेम वाढवण हे एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत. जोपर्यंत विश्वास नाही तोपर्यंत प्रेम नाही आणि जोपर्यंत प्रेम नाही तोपर्यंत विश्वास नाहि. आणि हे प्रेम आणि हा विश्वास बघायला मिळतो तो म्हणजे कोल्हापूर मेडिकल कॅम्प मध्ये…
ती लोक म्हणायला फक्त अडाणी आहेत पण आपल्या सुशिक्षित लोकांच्या किती तरी पटीने जास्ती समजूत तर त्यांच्या मध्ये आहे. गुणसंकीर्तन कस कराव हे खर तर त्या लोकांकडून शिकायला पाहिजे. ज्यांनी बापुना बघितला देखील नाही अशी लोक बापूनवर एवढ सुंदर छान अभंग रचू शकतात, ते खरच किती मोठी गोष्ट आहे, अगदी सरळ सोप्प्या भाषेतले रचलेले अभंग आणि कविता पण त्याचा अर्थ किती सखोल असतो, आणि ह्याचा कुठे हि जरा देखील अभिमान नाहि.
बापू खरोखर आम्हाला सगळ सहज पद्धतीने मिळत म्हणून त्याची जाणीव नाही आणि किंमत नाही.
त्याचबरोबर आपल्याला हि गोष्ट सुद्धा आपल्या बापूंनी शिकवून दिली आहे. गुणसंकीर्तन कसा करायच, हे सुद्धा बापूच आपल्याला शिकवतो; गुरुक्षेत्रम मध्ये मोठ्या आईची केलेली स्थापना, त्याच बरोबर मोठ्या आईचा केलेला उत्सव श्री वरदा चंडिका प्रसन्नोत्सव; मातृवात्सल्य विन्दानम आणि उपनिषद, राम रसायन, आणि आता प्रवचन मधून मोठ्या आईच्या कारुण्याचा झरा आपल्या पर्यंत पोचवत आहेत. ह्यातून आपल्याला बाप्पाने दाखून दिले आहे कि गुणसंकीर्तन कसे करयचे.
आता आपल्याला दादांनी सांगितल्या प्रमाणे गुणसंकिर्तनवर भर द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला सुद्धा जेवढ जमेल तेवढ ह्यावर विचार करून आपल्या क्षमतेनुसार खारीचा वाटा उचलून आपल्या बाप्पाच्या कार्यामध्ये सहभागी होऊन स्वतःचे आयुष्य यशस्वी करुन आपल्या देवाला खुश केल पाहिजे.
बापू माझा कडून तुझ गुणसंकीर्तन कायम घडतच राहू दे आणि त्याचबरोबर तुझावरच प्रेम हे कायम असाच वाढत राहू दे. तुझाशिवाय हि अवस्था कधीही अनुभवायला नको देउस. बापू तू आहेस म्हणून मी आहे.
हे आदिमाते तू प्रेमळ आहेस आणि मी अम्बज्ञ आहे,
बापू तू खूप प्रेमळ आहेस आणि मी अम्बज्ञ आहे

Love you my Dad forever

Ketakiveera Kulkarni
Dombivli East