Sacrifices of Hercules and Aphrodite

#491527

Suneeta Karande
Participant

हरि ॐ.
आजचा दिनांक ०८-११-२०१५ चा अग्रलेख तुलसीपत्र ११७२ हा वाचताना श्रीसाईसच्चरितात सतत वाचलेल्या “त्येन त्यक्तेन भुञ्जीथा: ” ह्या ईशावास्य मंत्राची आठवण झाली. खरोखरच हर्क्युलिस आणि अॅफ्रोडाईट हे दोघेही पूर्णत: “”त्येन त्यक्तेन भुञ्जीथा: “(Sacrifices of Hercules and Aphrodite) ह्या मार्गाचे अत्यंत काटेकोरपणे पालन करताना आपण आजवर पाहिले आहे. स्वत:च्या प्रेमभावनांचा हर्क्युलिसने तर किती काळ उच्चारही केला नव्हता प्रकटपणे आणि ज्या प्रथम क्षणी अॅफ्रोडाईटला तिच्या हृदयात उत्पन्न झालेल्या ह्या प्रेमभावनेची जाणीव झाली होती तेव्हाही तिने संपूर्णत: त्रिविक्रमाला शरण जाऊन त्याच्याच संपूर्ण अनुमतीनंतर आपली स्विकृती व्यक्त केली होती. हर्क्युलिस तर मानवी मनाच्या अफाट संयमशक्तीचे , अचाट पुरुषार्थाचे प्रतिकच आहे, त्याने आचरणात आणलेला “पुरुषार्थ” हा खरेच “मर्यादा” पुरुषार्थाचेच यथार्थ दर्शन घडवितो. महामाता सोटेरियांने उद्गार काढल्याप्रमाणे खरेच हर्क्युलिसने आजवर अनेक वेळा त्यागांची अग्नीपरीक्षाच दिली आहे हे आपण अनुभवले.
परंतु ज्या प्रकारात अॅफ्रोडाईटने मेडयुसाविषयीचे वास्तव हर्क्युलिसला कथन केले ते वाचून बुध्दी कुंठीत झाली कारण बापूंनी आपल्याला “तुलसीपत्र ११५६ दिनांक ०१-१०-२०१५ चा अग्रलेखात ” सांगितले होते की मेड्युसाच्या ’क्रतक्षक’ कुविद्येच्या प्रभवातून निर्माण झालेल्या नागकवचापासूनही टेरी उर्फ हर्मिसला काही बाधा होत नव्हती कारण त्याच्या गळ्यात महामाता सोटेरियाने स्वत:च्या गळ्यात तीन दिवस धारण केलेली व वेगवेगळ्या खोट्या मण्यांच्या रूपात दडवलेली रूद्राक्षमाळा घातली होती. आणि आता येथे स्वत: अॅफ्रोडाईट मेडयुसाच्या सामर्थ्याविषयी जेव्हा वास्तव उघडकीस आणते तेव्हा जाणवते की हे महायुध्द ( armageddon) किती भयानक पातळीवर खेळले जाणार आहे. ज्या अर्थी अॅफ्रोडाईट सांगते की तिच्य मानवी अस्तित्त्वाला केवळ मेडयुसाच आव्हान देऊ शकते आणि तीच एकटीसुध्दा शुक्राचार्यांसह झेनु, हॉरेमाखेत, बफोमेट अशा सर्वांना शह देऊ शकते व ती म्हणजेच साक्षात मूर्तीमंत कुविद्या असल्याने तिला मृत्यु नाही.
पण नक्कीच महामाता दुर्गा आणी तिचा पुत्र त्रिविक्रम ह्यांची काहीतरी संरक्षक योजना आधीपासून तयार असणारच आहे.
आपल्याला साक्षात आदिमाता चण्डिकेचा पुत्र असणार्‍या परमात्म्याने आपल्या बापूंनीच “श्रीमद्पुरुषार्थ: तृतीय खण्ड: आनंदसाधना” मध्ये ह्या ईशावास्य मंत्राचा अर्थ समजाविताना सांगितले आहे की –
ईशा वास्यमिद सर्व यत्किञ्च जगत्यं जगत्
तेन त्यक्तेन भुञ्जीथा: मा गृथ कस्यास्विध्दनम्
हा मंत्र आम्हाला ग्वाही देतो की परमात्म्याला जगाची काळजी आहे , जगातील प्रत्येक जीवात्म्याची काळजी आहे. भगवंत स्वत: सच्चिदानंद म्हणजेच अत्य, प्रेम व आनंदमय आहे आणि म्हणूनच विश्वातील प्रत्येक मानवाने आनंदमय बनावे व सतत प्रगतिपथावर रहावे अशीच त्याची इच्छा असते. त्यामुळेच तो जे जे काही घडवून आणतो ते मानवाला प्रगतिपथावर नेणारे, त्याचा विकास करणारे आणि म्हणूनच आनंदाकडे वाटचाल करविणारे असते.
साक्षात त्रिविक्रमाने हर्क्युलिसकरवी शब्दही दिला आहेच की ही ताटातूट शेवटची असेल व त्यानंतर सर्व युगुले सुखाने एकत्र नांदतील. जरी त्यावेळच्या सम्राट झियसने हर्क्युलिसला प्रश्न विचारण्यावरून हर्क्युलिस व अॅफ्रोडाईट ह्यांना तो लागू पडत नसावा असे प्रथमदर्शनी वाटत असेल तरी त्रिविक्रमाचा शब्द म्हणजे माझ्या बापूरायाचा साक्षात परमात्म्याचा शब्द – जो त्रिकालाबाधित सत्य असतोच ! “त्या”चा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख !
बापूंनीच लिहिलेल्या “मात्रूवात्सल्यविंदानम् ” ह्या वेदात (ग्रंथात) अध्याय २७ मध्ये आपण पाहिलेच आहे की राम- रावण युध्दाच्या वेळी रावणालाही असेच मृत्युच्या बाबतीत वरदान असते. तो फक्त मानवाकडूनच मारला जाऊ शकतो. त्यावेळीही हाच दुराचारी शुक्राचार्य किती उपद्व्याप करून रावणाला सुरक्षित ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न करतो. पण शेवटे आदिमाता त्याच्या सार्‍या प्रयत्नांना कसा यथोचित समयी सुरुंग लावते. बापू लिहितात की –
हा रावण दिवसेंदिवस अधिकाधिक उन्मत्त होऊ लागला व त्याला त्याच्या अशुभकार्यामध्ये त्याची माता कैकसी हिचा पिता दैत्यराज दुर्गम ह्याचे सहाय्य होत होते. हा दुर्गम म्हणजेच शुंभाचा शुक्राचार्यांनी कावळ्याचे छद्मरूप देऊन पळवून वाचविलेला पुत्र होय. ह्या दुर्गमास शुक्राचार्यांनी शुंभाचे सर्व बळ दिले होते व रावणास मधु-कैटभाचे सर्व बळ दिले होते. त्यातच रावणाला मानवापासून धोका होऊ शकतो , हे लक्षात आलेल्या शुक्राचार्यांनी रावणाच्या मातामहास अर्थात दैत्य दुर्गमास मानवाकडून अवध्यत्वाचा वर मिळवून घेतलेला होता.
शुक्राचार्यांच्या ह्या धूर्त योजनेमुळे रावणाला मारू शकणार्‍या मानवाला दुर्गमास मारणे अशक्य झाले होते व दुर्गमास मारू शकणार्‍या देवांना रावणास मारणे अशक्य ठरले होते.
रावणाच्या देहातील अमृतकलशाचे स्थान रावणाशिवाय बिभीषणाला ठाऊक होते व शुक्राचार्यांनी त्यांच्या शापाने बिभीषणाचे ह्या गोष्टीचे स्मरण नाहीसे केले होते.
येथे सुध्दा तसे पाहता रामाला रावणाला मारणे सहज सोपे नव्हतेच. तरी आदिमातेच्या पुढे ह्या शुक्राचार्यांच्या कोणत्यच योजना सफल झाल्यच नाहीत. साक्षात श्रीहनुमंताच्या करवी आदिमातेचे अशुभनाशिनी स्तवनम् प्रभु श्रीरामांनी म्हणताच आदिमाता चण्डिका “रामवरदायिनी दुर्गा” रुपाने प्रकटली आणि तिने “श्रीरामास विजय प्राप्त होईल” असा आशिर्वाद देताच शुक्राचार्यांच्या शापाचा प्रभाव आपोआपच नाहीसा झाला व बिभीषणास हळूहळू सर्व आठवू लागले.
पुढे दुर्गम श्रीराम, लक्ष्मणांना मारण्यास येताना आधीच पाहून हनुमंताने आदिमातेचे स्तवन करताच तिचा वर अर्थात रावणाचा वध हे कार्य पूर्ण होण्याच्या आड येणार्‍या दुर्गमाचा वध करण्यासाठी तत्काळ तिथे साक्षात आदिमाता प्रकटली व तिमे तिच्या परशुने त्या काकरूपी असुरास दुर्गमास छिन्नविच्छिन्न करून टाकले. त्यानंतर आश्विन शुध्द सप्तमीच्या रात्री बिभीषणाला रावणाच्या अमृतकलशाचे स्थान पूर्णपणे आठवले आणि आश्विन शुध्द अष्टमीला त्या स्थानाचा अचूक वेध घेऊन श्रीरामांनी रावणाचा वध केला.
श्रीकृष्ण अवताराच्या वेळीही शुक्राचार्यांची कुटील नीती अशीच आदिमातेने हाणून पाडली होती.
त्या काळात देवकीचाच भाऊ राजा कंस व त्याचा श्वशुर दैत्यराज जरासंध हे सर्वांत प्रबळ सम्राट होते व मुख्य म्हंणजे ह्या दोघांनीही शुक्राचार्यांच्या ’तमाचारतंत्राचे’ (तम आचार) सखोल अध्ययन केलेले होते. ह्या दोघांना ह्या तमाचार तंत्रामुळे रावणाप्रमाणेच बल, ऐश्वर्य व शुंभाप्रमाणेच मायावी सामर्थ्य प्राप्त झालेले होते.
कंसाला तमाचार साधनेत केलेल्या एका चुकीमुळे त्याचे मानवांपासून अवध्यत्व निरपवाद राहिले नव्हते. कंसाला चौदा वर्षाखालील म्हणजे किशोरावस्था प्राप्त न झालेल्या मानवी बालकाक्डून मृत्युचे भय होते. तर कुठल्याही नवजात मानवी अर्भकाला , मग तो दैवी अवतार असला तरीसुध्दा त्या बालकाच्या जन्मानंतर पहिला सूर्योदय होण्याच्या आत नष्ट करण्याची विद्या जरासंधाला प्राप्त झालेली होते.
ह्या दोन गोष्टी लक्षात घेऊनच चण्डिकेने महाविष्णूस कंसाच्याच भगिनीच्या , पवित्र देवकीच्या कुशीत जन्म घेण्यास सांगितले व ’मी स्वत: तुझ्या जन्माच्या वेळेस प्रकट होऊन जरासंधापासून तुझे रक्षण करीन’ असे वचन दिले होते.
अर्थात पुढे ” सप्तमी , नदिनी गर्भदायिनी – श्रीकृष्णतारिणी ” बनून आदिमाता नंदिनीच्या रूपात अवतरते आणि श्रीकृष्णाचे रक्षण करतेच.
यावरून कळते की शुक्राचार्यांच्या कितीही कुटील योजना आदिमातेच्या पुढे अर्थात सावर्णी घराण्याच्या महादुर्गेपुढे कस्पटासमान ठरतात आणि फुंकरीसरशी विफल होतात.
त्यामुळेच मेडयुसाला मारणे कितीही दुष्कर सध्या दिसत असले तरी १०८ % विजय हा हर्क्युलिस व अॅफ्रोडाईट ह्या मानवी दांपत्याचाच होईल आणि मूर्तीमंत कुविद्या असणारी मेडयुसा नक्कीच निष्प्रभ होईल ह्यात तिळमात्रही शंका नाहीच.
बापूंची अफाट लेखनशैली मात्र बुध्दीला संभ्रमितही करते काही क्षणांपुरती का होईना यात मात्र वादच नाही.
म्हणूनच ” एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता बापू ऐसा” हेच सत्य मी आमरण उराशी कवटाळले पाहिजे एवढेच कळते.
दिनांक १९ जुलै २०१५ च्या “तुलसीपत्र -११३४” मध्ये बापूंनी शुक्राचार्यांना निक्सने बंदी करून लॉबेरिन्थमध्ये कैदी केलेले वाचले होते त्याचे रहस्य आज अॅफ्रोडाईटच्या मुखातून “तुलसीपत्र – ११७२ ” मध्ये उकलले गेले. पण का कोणास ठाऊक हा महाधूर्त , चाणाक्ष शुक्राचार्य सहजासहजी आपल्या लेकीच्या निक्सच्या खेळीला बळी पडेल असे वाटतच नव्हते.
आज दुसरेही एक रहस्य बापूंनी उलगडून दावले आहे की दनूने दितीला स्वत:त सामावून घेतले असे तिला वाटत असले तरी तसे घडलेले नाही व हे ही कारस्थान शुक्रचार्यांनीच घडवून आणले.
क्रॉनॉसला त्याच्या स्वत:च्या मुलीची मेडयुसाची खरी आई कोण हे ही नीट धड माहीत नाही. पण पिंडार म्हणजेच दुष्ट नागसिध्द शुक्राचार्य व त्याची कन्या पॅंडोरा म्हणजेच दिती हे रहस्य दनु, झेनु व हॉरेमाखेतला सुध्दा माहीत नाही . यावरून शुक्राचार्य काय जबरदस्त खेळी खेळतात ते दिसते.
पुढच्या अग्रलेखात अजून काय काय रहस्य बापू उकलणार आहे हे जाणून घेण्याची उत्कंठा वाढतच जात आहे…
जय जगदंब जय दुर्गे
आदिमाते तू प्रेमळ आहेस आणि माझ्या बापूंच्या कृपादृष्टीनेच मी त्यांच्या आणि तुझ्या चरणी अंबज्ञ आहे आणि सदैव अंबज्ञ राहो हीच तुझ्या चरणी प्रार्थना !

हरि ॐ. श्रीराम.अंबज्ञ.
सुनीतावीरा करंडे