Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva-Nashik Vani

#834

Suneeta Karande
Participant

Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva-Nashik Vani

हरि ओम. ३० व्या अध्यायांत नाशिक (Nashik) येथील वणीच्या सप्तशृंगी (Vani-Saptshrungi)  देवीचे उपाध्ये काकाजीच्यां कथेत उल्लेख येतो तो त्र्य़ंबकेश्वराचा ! देवी दृष्टांतात बाबा (शिरडीच्या) भेटावयास सांगते काकाजींना , परंतु ते स्वत:ची बुद्धि चालवुन बाबा म्हणजे त्र्य़ंबकेश्वर असावे असा ग्रह करुन घेतात. आणि मग नाशिकला जाउन पोहचतात. त्र्यंबकेश्वर म्हणजे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक. येथील ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट म्हणजे एकाच ठिकाणी भगवान शिव, भगवान विष्णु, आणि भगवान ब्रह्मा ह्यांचे वदन (चेहरे) एकत्रित स्वरूपात आढळतात.
१० दिवस रहातात, नित्य प्रात:स्नान करुन लिंगावर रुद्रावर्तन ही करतात, संततधार अभिषेक ही करतात. पण ना त्यांच्या मनाची दुश्चितता जात, ना चंचलता शमत. मला वाटते हाच तो खेळ परमशिव, सदाशिव आणि नित्यशिव तत्वाचा असावा.